सिमेवरचा दहशतवाद
भीती घालतो सीमावर्ती
क्षणा-क्षणाला हादरते
बंदुकीचा गोळ्यांनी धरती
कुठून येतील अतिरेकी
कळत नाही कुणा काही
क्षणभरात पसरे अशांती
लोकं पळतात दिशा दाही
भौतिक सुखापोटी आज
माणसांत जन्मला दानव
निष्पाप ,लोकांप्रती हृदयी
नसे त्यांना तिळभर कणव
देवा संपू दे रे हा हव्यास
जळू दे माणसातला स्वार्थ
मानव तितुका मेळवावा
कळू दे सकला जगण्याचा अर्थ!
©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा