सातपुडा साहित्य मंच आयोजित
उपक्रम क्र- ६९
विषय - रम्य पहाट !
सूचक - सौ.पुष्पा पी.पटेल " पुष्पम्"
-----------------------------------------------------------
वाट चाले नर नारी
पंच पंच उषःकाळी
भक्ती भावे आळवती
गाऊनिया हो भूपाळी
आले सोडून वेंकुंठ
वृंदावनी वनमाळी
खेळ खेळे राधासंगे
हरी यमुनेच्या जळी
प्राची हसते आकाशी
पहाटेच्या रम्य काळी
प्राजक्ताचा गंध दाटे
शांत शांत तरुतळी
रवि किरणांचे कुंकू
शोभे अवनिच्या भाळी
पहा पाखरं निघाली
उंच प्रसन्न सकाळी
©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"
अप्रतिम रचनाविष्कार सरजी ✍️👌👌
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर लिखाण आहे सरजी
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌 👌👌
उत्तर द्याहटवा