अभिनेता,विनोदी वक्ता , महाराष्ट्रभुषण पु.ल.देशपांडे यांच्या आज जन्मदिवस (जयंती) निमित्ताने केलेले " विनोदी काव्य लेखन "
--------------------------------------------------------
माझी जाणू [ अष्टाक्षरी ]
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
कॉलेजला असताना
होतो की मी प्रेमाळू
एक होती लाडबाई
तिचा होतो मी काळू ।।१।।
माझ्या स्वप्नी येई एक
नाव होते तिचे माया
खूप आवडायची हो
मला तिची गोरी काया।।२।।
मैत्री केली कल्पनाशी
लग्न करावे म्हणून
पण जुळलेच नाही
तिचे माझे तन मन।।३।।
मग भेटली मजला
रुपवती नाव रंभा
जिथे जाई तिथे तिचा
क्षणोक्षणी सुरु दंगा।।४।।
कॉलेजात आली एक
सुंदरशी छान परी
पण.... हाय माझे दैव
होती परक्याची नारी।।५।।
मन माझे म्हणायचे
शोध एखादी करिश्मा
सापडली नाही कुणी
मात्र लागलाय चष्मा।।६।।
झालं. ! शोधून थकलो
आणि बसलो शांत मी
नशिबाने दिली साथ
दिली युक्ती आली कामी।।७।।
अवचित आली पुष्पा
गुलाबाची कळी जणू
आल्या त्या सर्वच गेल्या
हीच खरी माझी जाणू !।।८।।
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल
" पुष्प "
खुपच छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवाखूप सुंदर रचना सरजी .👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी 🙏
हटवाअप्रतिम विनोदी रचनाविष्कार सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद!🙏
हटवाखुपचं छान...!
हटवामनापासून आभार 🙏
हटवाखुपच सुंदर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद मॅडम!🙏
हटवा