Kaayguru.Marathi

शुक्रवार, डिसेंबर १७, २०२१

आई

आई 
शब्दात  जिच्या सदैव माया 
आयुष्यभर झिजविते काया
उभी राहते उन्हा - पावसात
होते लेकराची छाया...आई !

उपवास नावे सोसते त्रास
बाळा भरवी मुखीचा घास
शब्दात तीच्या अमृत शिंपण
घरादाराच्या  श्वास ... आई !

नयनी लपवीते खारे पाणी
दुःख पिते देई जीवन संजीवनी
प्रसन्न वदने घरात दरवळे 
जिव्हाळ्याची जाई... आई  !

पहाटे उठते उशिरा निजते
मोल  ती  कसला  ना  घेते
लोभ ना तिजला मोठेपणाचा
जखमेवरची  फुंकर... आई !

राब राबते परी न विसरते
मन तिचे खोप्यातच रमते
नजर पिलावरी भिरभिरते
जणू ऊंच आकाशी घार...आई !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

२८ टिप्पण्या:

  1. व्वा व्वा सरजी अप्रतिम आईचा मायेने ओतप्रोत भरलेली काव्यरचना केली आपण 👌👌🙏🙏

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खूप सुंदर शब्दांत टिप्पणी पोस्ट केल्याबद्दल,लिखाणास बळ दिले.मनापासून धन्यवाद!🙏🙏🙏

      हटवा
  2. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

    उत्तर द्याहटवा
  3. वाहह , खुप सुंदर रचना , अप्रतीम...👏👏👏

    🙏मातृदेवो भव:🙏

    उत्तर द्याहटवा
  4. अतिशय सुंदर भावस्पर्शी रचना...👍👍👌👌👌💐💐

    उत्तर द्याहटवा
  5. वा! अतिसुंदर सरजी, तुम्ही आईसंबधी किती सुंदर, हृदयस्पर्शी ,भावनिक, काव्यरचना करतात. तुमच्या लेखणीतून अप्रतिम कशी काव्यरचना निर्माण होते👌👌🙏🙏
    विजय बोरदे

    उत्तर द्याहटवा
  6. अतिशय सुंदर आणि समर्पक काव्यरचना सरजी👌👌👍🎉🎊👏🙏

    उत्तर द्याहटवा
  7. काव्यरचनेच्या माध्यमातून आईचे सुंदर व हुबेहूब चित्र रेखाटले आले. आपण खुप खुप सुंदर काव्यनिर्मिती केली.

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...