Kaayguru.Marathi

रविवार, डिसेंबर ०५, २०२१

आईचे प्रेम

आश्चर्य   झाले  त्या  दिवशीं
देवाला  ही  नसावे   ठाऊक
तिरडीतून   आला   आवाज
ऐकताच  मी  झालो  भावूक

तिरडीवरील  आई  म्हणाली
काय रे बाळा..!थकलाय ना
थांब   जरासा   थोडा    वेळ
माझे  ओझे   वाटून  दे  ना !

का रे बाळा दुखत असेल ना
माझ्या ओझ्याने तुझा खांदा
त्रास  होतोय  न्   तुला...मग
कशाला करतोय तू हा वांधा?

लाडक्या,वेडा की खूळा रे तू
बाळा ! तुला कळत नाही का
अनवाणी चालतांना पायाला
उन्हाचा लागेल ना रे चटका !

बाळा !स्वतःची घे तू काळजी
मी  चालले  की  दुजा  जगात
तू  सुखी  आणि  आनंदी रहा
समृद्ध हो की तुझ्या जीवनात !


पुत्रासाठी जगणे आणि मरणातही पुत्राच्याच सुखाच्या विचार करणारी "आई "
🙏🙏🙏
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
म्हसावद

१७ टिप्पण्या:

  1. आई मुलांची किती काळजी करते..... खुप सुंदर शब्दरचना 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. खुप सुंदर शब्दांकन...ह्रदय पिळवटून टाकणारी भावस्पर्शी अप्रतीम रचना...👌👍💐🍫

    आईची. माया शब्दांत वर्णन करण अवघडच...पण तरीही खुप सुंदर व्यक्त झालात आपण...खरच...असेच भाव येत असतील आईच्या मनात अंतसमयीसुद्धा....🥺🥺🥺😢😢😢

    उत्तर द्याहटवा
  3. कविता वाचून डोळ्यात पाणी आले सर, खरंच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.छान शब्दात आईची थोरवी व्यक्त केली, त्रिवार वंदन थोर मातेला व आपल्या शब्द रचनेला 🙏🙏🙏
    विजय बोरदे

    उत्तर द्याहटवा
  4. ह्रदयद्रावक कविता.।अवर्णनीयच

    उत्तर द्याहटवा
  5. अतिशय सुरेख संगम, मन दाटून आले सर, ...🌹🌹🌹👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  6. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, अतुलनीय काव्यपुष्प👌👌💐🙏

    उत्तर द्याहटवा
  7. अप्रतिमच ! आईचे पुत्राबाबत असलेले प्रेम व जिव्हाळा अत्यंत वात्सल्यमय शब्दात वर्णन केलाय सर! आई...जिच्या ममत्वाचा देवालाही मोह झाला.व तो पंढरीला विठ्ठल नव्हे; तर " माऊली " रुपात युगे अठ्ठावीस उभा झालाय!🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  8. सुंदर शब्दांकन, काव्यरचना वाचुन आईच्या प्रेमाची अनुभूती झाली

    उत्तर द्याहटवा
  9. "स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी"अप्रतिम हृदयाला हेलवणारी मातृत्वाचे दर्शन देणारी कविता👌👌👍👍

    उत्तर द्याहटवा
  10. हार्ट टचिंग कविता

    उत्तर द्याहटवा
  11. खुप सुंदर रचना वाचुन डोळ्यात पाणी आले. अप्रतिम शब्दरचना आई म्हणजे मायेचा सागर

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...