Kaayguru.Marathi

मंगळवार, डिसेंबर ०७, २०२१

दिशा दाही [ शेल काव्य ]

कितीदा  तुला असे हे सांगावे मी
मी   स्वकष्टे  मिळविले सर्व काही
तू  स्वतःला करावे रे आधी सिद्ध
सिद्ध  होता खूलतील दिशा दाही

तुला    सांगतो  समजून  घे ना तू
तू  डोक्यात भरुन घे  सारे काही
कर्तृत्वाला  आभाळ   ठेंगणे  होई
होई  जन  गुलाम  आपणा  ठायी

विचार    ऐकावे  जे    असे प्रेरक
प्रेरक    व्हावे  जगी  नको  मारक
काया वाचा मने ना त्रासावे कुणा
कुणा  तरी  व्हावे  हो  उपकारक

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

७ टिप्पण्या:

  1. अप्रतिम रचनाविष्कार सरजी ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर शब्दांत गुंफण केली सर कविता....👌👌👌👍

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...