अ) दक्षिणायन - यात सूर्याची गती दक्षिणेकडे असते.याचा आरंभ कर्कसंक्रांतीपासून होतो.
ब) उत्तरायण - यात सूर्याची गती उत्तरेकडे असते.याचा आरंभ मकरसंक्रांतीपासून होतो.
" अग्निर्जोतिरह: शुक्ल: ष्णमासा उत्तरायणम् ।
धूमो रात्रिस्तथा कृष्ण: षण्मासा: दक्षिणायनम् ।।''
[ संदर्भ - भगवद्गीता : ८ -२४,२५ ]
दोन अंगे (धर्माची) -
अ) तत्वज्ञान (ब) आचार
दोन अधिष्ठाने - (रोगाची)
अ) शारीरिक (ब) मानसिक
दोन अंग मुक्तीची -
अ) त्रिविध दुःख निवृत्ती (ब) परमानंद प्राप्ती
[ हरिपाठ रहस्य ]
दोन अधिष्ठाने - (लक्ष्मीची )
अ) चंद्र (ब) कमल
[ संदर्भ- संस्कृतीची प्रतिके ]
दोन अवस्था - (जीवनाच्या)
अ) जन्म (ब) मृत्यू
दोन अक्षरी दोन पावक मंत्र -
राम आणि शिव से मंत्र काशीक्षेत्रात तारक आहेत.
दोन आदर्श भक्त -
हनुमान आणि अर्जुन
दोन आद्य शाहिर (भारतभूमीचे) -
कुश आणि लव .हे श्रीरामाचे पुत्र आणि ऋषी वाल्मिकीचे शिष्य.हे दोघेही गीतरामायण ऋषीसमुदाय,यज्ञमंडप,अथवा राजमार्ग यांवर बहूजनमनोद्दिपनार्थ कोंठेहि गाऊन दाखवित असत.
[संदर्भ - आर्यारामायण वा.रा.७-९३-५]
दोन उपासना -
सगुणोपासना आणि निर्गुणोपासना
दोन गोष्टी आजन्म संपादन कराव्या -
विद्या आणि धन
" अजरामरवत् प्राज्ञ: विद्यार्थी च् साधयेत् [ महाभारत]
दोन गोष्टींनी मानवाचा नाश होतो.
अ) गर्व आणि लोभ
ब) चिंता आणि चिता
क) अज्ञान आणि आळस
दोन गोष्टीत संयम असावा-
शब्द उच्चारताना आणि कामवासनेवर
दोन चक्र संसाररथाचे -
स्री आणि पुरुष
दोन गोष्टी स्वर्गसुखापेक्षा अधिक होत -
जननी आणि जन्मभूमी.
" नेयं स्वर्णपूरी लंका रोचते मम लक्ष्मण ।
जननी जन्मभूमि श्री स्वर्गादपि गरियसी ।।" [ महाभारत]
दोन गोष्टी पुन्हा जोडणे अशक्य-
फुटले मोती आणि तुटले मन
" सोने अथवा हस्तचरण। मोडिल्या सांधिता विचक्षण ।
फुटले मोती तुटले मन। सांधु न शके विधाता ।। "
[ संदर्भ - मुक्तेश्वर म.भा.अध्याय १८]
दोन गोष्टी क्षणभंगूर -
तारुण्य आणि धन
तारुण्य आणि धनाचा नको रे मोह ।
हे तर दोघे ओसरत्या जलासम डोह।। [ पुष्पकाव्य]
दोन दुरुपयोग द्रव्याचे -
१) कुपात्री दान करणे.
२) सत्पात्री दान नाकारणे.
" लब्धानामपि वित्ताणां बोद्धव्यौ द्वावतिक्रमौ ।
अपात्रे प्रतिपत्तिश्च पात्रे चाप्रतिपादनम् ।। "
[संदर्भ- महाभारत,शांती पर्व २७-३१]
दोन नर - अर्जुन आणि अश्व
दोन महान नृत्य - तांडव (शिव नृत्य )
लास्य (पार्वती नृत्य )
दोन पक्ष - (पक्ष म्हणजे पंधरवडा)
शुक्ल पक्ष - अमावास्येपासून ते पौर्णिमेपर्यंत - शुक्लपक्ष.
कृष्ण पक्ष - पौर्णिमेपासून ते अमावास्येपर्यंत - कृष्णपक्ष.
दोन पाकशास्त्र प्रविण (पुराणकालीन )-
नल राजा (स्वादिष्ट गोड पदार्थ बनविण्यात कुशल)
म्हणून नलराजाने बनविलेल्या पदार्थांना नळपाक म्हणत.
भिम - ( तिखट मिठाचे पदार्थ -तामस पदार्थ बनविणे)
भिमाने बनविलेल्या पदार्थांना भिमपाक म्हणत.
दोन पुरुष -
क्षर - जो विनाश पावतो.
अक्षर - ज्याचा विनाशच होत नाही.
दोन पुरुषोत्तम -
मर्यादा पुरुषोत्तम - राजा दशरथ व कौशल्येचापुत्र श्रीराम.
पुराण पुरुषोत्तम - वसुदेव व देवकीचा पुत्र - श्रीकृष्णपण...श्रीकृष्णाचा प्रतिपाळ गोकूळात नंदबाबा आणि यशोदेने केला.म्हणून यशोदेच्या कान्हा असेही म्हणतात.
दोन वार्ताहर (पुराणकालीन )-
नारद - हा ब्रम्हदेवाचा मानसपुत्र असून सप्तखंडात तो कुठेही भ्रमंती करीत असे.त्यास सप्तखंडातील बित्तंबातमी माहिती होतं असे.व इकडून ऐकले की, तिकडे सर्व वार्ता कुशल नितीने तो कथन करीत असे.
संजय - कुरुक्षेत्रावर सुरु असलेले महाभारत युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला हस्तिनापुरात राहूनच साद्यंत करता यावे.म्हणून प्रभू कृपेने संजयांस दिव्य दूरदृष्टी प्राप्त होती.असे म्हटले जाते.
दोन कठिण प्रतिज्ञा ( पुराणकालीन )
भिष्मप्रतिज्ञा ( आजन्म अविवाहित राहण्याची)
कचप्रतिज्ञा ( सहस्र वर्ष ब्रम्हचर्य पालनाची )
दोन प्रकार अवलोकनाचे-
सिंहावलोकन (थोडेसे चालून गेल्यावर मागे वळून पाहणे; व पुन्हा पुढे चालणे.)
विहंगावलोकन - (सूक्ष्म निरीक्षण करणे.)
दोन प्रकार सद्गुरूचे -
ध्यायी - शास्त्र आणि अनुभूती यांनी युक्त असा गुरु.
तत्त्त्ववित - जन्मतः सिद्धयोगी असा गुरु.
[संदर्भ - द्वैविध्यं सद्गुरूणांच् ध्यायितत्त्वविदाविति -योगसंहिता ]
दोन काळ अतिदु:खदायक-
मध्यान्ह काल आणि अंतकाल
दोन प्रकारचे जन्म -
दिव्य आणि पार्थिव
दोन प्रकारचे चोर -
उघड चोर - उघडपणे चोरी करणारा.
गुप्त चोर - साळसूद दिसणारा.
दोन प्रकारची सृष्टी -
दैवी आणि आसुरी
" द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन दैवासूर एवच् ।"
[ भगवद्गीता १६-६]
दोन प्रकारचे ज्ञान -
अ) जन्मसिद्ध आणि अनुभवसिद्ध
ब) शब्दज्ञान आणि अनुभवजन्य ज्ञान
" ज्ञानं तु द्विविधं प्रोक्तं शाब्दिकं प्रथमं स्मृतम् ।
अनुभवाख्यं द्वितीयं तु ज्ञानं तद्दुर्लंभं नृप ।।"
[संदर्भ -देवी भागवत षष्ठ स्कंध- १५-२२]
दोन प्रकारची माणसं सुखी होऊ शकतात -
१) येणारी संकटे ओळखून आगाऊ तरतूद करणारा.
२) प्रसंगी ज्याला युक्ती सुचते तो-प्रसंगावधानी
" अनागतविधाता च् प्रत्युपन्नमतिश्च य: ।
द्वामेव सुखमेधेते दीर्घसूत्री विनश्यति ।। "
[संदर्भ - महाभारत,शांती पर्व १३७-१]
दोन प्रकारची माणसे जगात विरळाच -
१) ज्याने जे मागितले ते त्यास देऊन टाकणारा - कर्ण आणि बळीराजा
२) आपण स्वतः कोणापासून काहींही न मागणारा-
दोन प्रतिज्ञा (अर्जुनाच्या )-
दैन्य न भांकणे आणि युद्धात पाठ न दाखविणे.
" अर्जुनस्य प्रतिज्ञे द्वै न दैंन्यं पलायनम् । "
दोन राष्ट्रीय महाकवी (पुराणकालीन ) -
व्यास - महाभारताचे कर्ते
वाल्मिकी -रामायणाचे कर्ते
दोन प्रबळ कारणे (वाद होण्याची) -
कनक म्हणजेच सोने.
कामिनी - सुंदर स्री.
" कामिनी कनकं कार्य कारणं विग्रहस्य वै । "
[संदर्भ -देवी भागवत.चतुर्थ स्कंध.१०-६ ]
दोन विद्या -
अ) शास्रविद्या आणि शस्रविद्या
ब) बला आणि अतिबला.
सर्व ज्ञानाचे उगमस्थान.अशा या देवनिर्मित विद्या : बला आणि अतिबला ऋषी विश्वामित्रांनी श्रीरामास दिल्या होत्या.
[संदर्भ- वाल्मिकी रामायण.बाल सर्ग.२२-१७]
दोघे जण पराजित-
अ) कर्ज घेणारा आणि मुलीचा बाप
ब) लोभी गुरु आणि लालची शिष्य - कबीर
दोन खरे यात्रिक -
सूर्य आणि चंद्र.
दोन जण दुर्मिळ -
अप्रिय असले तरी हितकारक सांगणारा.
अप्रिय असले तरी ते शांत ऐकूण घेणारा.
" अप्रियस्य च् पथ्यस्य श्रोता वक्ता च् दुर्लभ: । "
[संदर्भ- वाल्मीकि रामायण.अरण्य पर्व.३७-२]
[ पुढील भागात ३ वर आधारीत संकेत वाचा.]
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
👌👌👌🙏✍️✍️✍️✍️अतिशय सुंदर माहिती दिली सर .खूप छान
उत्तर द्याहटवाKeep going..उपयुक्त माहिती
उत्तर द्याहटवाउपयुक्त माहिती
उत्तर द्याहटवाChhan
उत्तर द्याहटवासुंदर 👌
उत्तर द्याहटवावाहह...खुप सुंदर माहीती मिळाली सर.. धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊🍫💐
उत्तर द्याहटवाअप्रतिम माहिती सर...🙏👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर माहिती...👌👌👌💐
उत्तर द्याहटवाअप्रतिम माहितीपूर्ण असा लेख सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप छान माहिती !
उत्तर द्याहटवाखूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवा