रक्षा सूत्र बांधते तव हाती
औक्षण करिते भाऊराया
विजयोस्तू भव तू सदा!
अबाधित राहो प्रेम माया
धागा एक हा रेशमाचा
आत स्नेह जिव्हाळाचे झरे
दारी लखलख चंद्र सूर्य तारे
लाभो तुज प्रभूकृपेची छाया
सासरच्या परसात फुलवेन
मी प्राजक्ताची शुभ्र फुले
वा-यासवे धाडीन सुखगंध तुले
आनंदे यावे तू मज भेटाया
जीवनात कधी न होवो
तुज षढ्रीपुंच्या विषारी स्पर्श
अंगणी नांदो गोकुळाचा हर्ष
संकटात द्यावी कृष्णाची माया
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल
" पुष्प "