देवा तुझा छंद । लागला रे मला।
तुझा विना काही । आवडेना ।।१।।
सावळी ती कांती । पाहतो मी नित्य।
गातो गोड नाम । आवडीने ।।२।।
चतुर्भूज मूर्ती । भाळी गंध टिळा ।
छंद लागे जीवा । डोळीयासी ।।३।।
कर कटेवरी । उभा विटेवरी ।
पंढरी नगरी । पांडुरंग ।।४।।
चंद्रभागा तिरी । मेळा वैष्णवांचा ।
किर्तनात रंगे । जगजेठी ।।५।।
भक्त भेटी लागी । वेडावला हरी।
वाट पाही कांता । उभी दारी ।।६।।
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम अभंगवाणी सरजी ✍️✍️🌟🌟🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवाभक्तीमय प्रेमळ कविता
उत्तर द्याहटवा