रक्षा सूत्र बांधते तव हाती
औक्षण करिते भाऊराया
विजयोस्तू भव तू सदा!
अबाधित राहो प्रेम माया
धागा एक हा रेशमाचा
आत स्नेह जिव्हाळाचे झरे
दारी लखलख चंद्र सूर्य तारे
लाभो तुज प्रभूकृपेची छाया
सासरच्या परसात फुलवेन
मी प्राजक्ताची शुभ्र फुले
वा-यासवे धाडीन सुखगंध तुले
आनंदे यावे तू मज भेटाया
जीवनात कधी न होवो
तुज षढ्रीपुंच्या विषारी स्पर्श
अंगणी नांदो गोकुळाचा हर्ष
संकटात द्यावी कृष्णाची माया
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल
" पुष्प "
रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखुप सुंदर अप्रतिम रचना ....👌👌✍️✍️
सुंदर कविता happy rakshabandhan
उत्तर द्याहटवानारळी पौर्णिमा व रक्षांधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्तर द्याहटवाछान काव्यरचना
उत्तर द्याहटवा,सुंदर रचना 👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर...
उत्तर द्याहटवा