प्रेमाच्या वाटेवर आहे
माझ्या सखीचं गाव
दुरदूर देशी ओळख
प्रेमनगर त्याचे नाव
लता - वेलीची वसने
करीती येथे परिधान
पुष्परिणीच्या बागेत
करिती मंगल स्नान
बासुरीची धुन साधते
मंजूळ मधुर संवाद
येथे सान असो थोर
ठाऊक नसे हो वाद
पुष्प कळ्यांचा माळा
शोभे ललनांचा गळा
कुंतली सुगंधी गजरा
धन्य वाटे पाहता डोळा
गाव वेशीवर येता होई
स्नेह -सौख्याने स्वागत
नक्की या हं भेटायला
प्रेमनगरच्या दुनियेत !
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल
" पुष्प "
मनमोहक
उत्तर द्याहटवाखप सुंदर
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर 👌👌💐💐
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्दसौंदर्य सरजी ✍️✍️🌟🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवामनाला भावणारी काव्यरचना ❤️
उत्तर द्याहटवा