तूच तर माय माझी मी तुझी वासरु
बाबा...तू वटवृक्ष तर मी तुझी पारंबी
तुझ्या जीवनाची आहे मी सुंदर छबी
नको ना रे बाबा मला असा दूर करु
तूच तर माय माझी मी तुझी वासरु
बाबा…तू शिंपले तर मी तुझा मोती
तुझी माझी सुंदर अनमोल गोड नाती
तुझा डोळ्यांत ओघळते होऊन मी अश्रू
नको ना रे बाबा मला असा दूर सारु
बाबा…तू बासरी तर मी तिचे सूर
माझं हसणं खेळणं देई निराशेला नूर
नको ना सोडू तुझं लाडकं कोकरु
नको ना रे बाबा मला असा दूर सारु
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
Marvelous 💕
उत्तर द्याहटवाHeart Touching ❤️
उत्तर द्याहटवाहृदयस्पर्शी लेखन 👌👌👌
उत्तर द्याहटवा