प्रिये,एक रेशमी धागा
तुझ्या माझ्या प्रीतिचा
नाजूक नात्याचा !
प्रिये,दुसरा रेशमी धागा
आपल्या सहजीवनाचा
अतूट विश्वासाचा!
प्रिये,तिसरा रेशमी धागा
आपल्या मनगटावर बांधलेला
आयुष्यभर सोबतीचा!
प्रिये,चौथा रेशमी धागा
संसाररथ बांधणारा
सुखी नातेसंबधाचा !
प्रिये,पाचवा रेशिम धागा
एकमेकां समर्पणाचा
जसा शत जन्मीचा!
प्रिये,सहावा रेशमी धागा
न्याय-नीति-धर्माचा
सप्तवचन पालनाचा!
प्रिये,सातवा रेशमी धागा
घरादाराला बांधणारा
संकटातही टिकून राहणारा!
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
खूपच छान 👌👌👌
उत्तर द्याहटवाVery Nice...!
उत्तर द्याहटवासुंदर 👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना 👌👌💐💐
उत्तर द्याहटवाउत्तम काव्य
उत्तर द्याहटवाअगदी मनाला भावलं ✍️🌟👌👍
उत्तर द्याहटवाअर्थपुर्ण शब्दरचना 👏👌👌👌
उत्तर द्याहटवा