आज उगवला अती पावन दिन
आपण गुरुदेवा चरणी होऊ लिन
आई बाप आद्य गुरु आपुले
जन्म देऊनी जग त्यांनी शिकविले
द्वितीय गुरु ते गुरुकुली भेटे
त्यांचा शब्द जणू अमृत वाटे
कृष्णासम सखा तृतीय गुरु
संकटात दूर करीतो अंधारु
चतुर्थ गुरु सखी सचिव ती
देतसे संसाराला सामर्थ्य ती
गुरु तो पंचम मानावी सृष्टी
दुःख क्लेश जाळाया देई दृष्टी
षष्ठ गुरु केली मी वसुंधरा
देते पेरावे ते उगवे संदेश खरा
सप्तम गुरु करावा घननीळा
शिकवी रिते व्हावे देऊन सकळा
अष्ट गुरु सागर सरिता झरा
तिरा येता जीव उद्धरावा खरा
नवम् गुरु पुष्प लता वृक्षवल्ली
शत्रू मित्र विसावता तळी देती सावली
दशम गुरु चंद्र सूर्य ग्रह तारे
भेद न करता नित्य सृष्टी उदधारे
घडले दर्शन जसे गायिली गाथा
सकल गुरु चरणी ठेवितो माथा
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम शब्द गुंफण...
उत्तर द्याहटवागुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवागुरु महिमा सुंदर वर्णन केला सरजी ✍️🌟🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवाजय गुरुदेव
उत्तर द्याहटवा