वयाचा तरी विचार करा थोडा
आता काय तरुण नाही हो तुम्ही
नका होऊ तुम्ही नातवाचा घोडा
अगं,जगण्याचं वय वाढलं माझं
पण मन आजही तरुण आहे
बालपणाची ती अल्लड आठवण
आजही नसानसात ताजी आहे
वय झालं वयऽऽअसं नको सांगू
खंबीरपणे आपण उभे राहू
तरुणपणातील बाकी गोष्टी
आजही आपण करीत जाऊ
वय वाढतं तशी उमेद वाढते
आपण भरावी सुखाची झोळी
राग द्वेष सारे काही विसरुन
तिरसटपणाला मारु या गोळी
वय झालं तरी आपण आनंदात
नातवंडाशी हसत खेळत रहावं
जगण्याचे खाच खळगे सारे
त्यांना समजावत सुखात जगावं
अगं,वय वाढतं तसं वाढतं ग्
आयुष्यात अनुभवांचं गाठोडे
कडू वा गोड राखून न ठेवता
देत जावे जवळचे थोडे थोडे
देवाला आजही आहे प्रार्थना
देवा जगू दे मला अजूनही
जीवनगाण्याचे सूर अजून मी
संगीतात तरी बांधलेले नाही
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
म्हसावद
भ्रमणध्वनी-8208841364
सुंदर सकारात्मक रचना👌👌🙌
उत्तर द्याहटवाअप्रतिम सकारात्मक असा रचनाविष्कार सरजी👌👌👌
उत्तर द्याहटवावाहह.. खुप सुंदर कल्पनाशक्ती...सुरेख शब्दांकन... वास्तवदर्शी रचना...👌👍💐
उत्तर द्याहटवामस्त मस्त 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाअगदी सुंदर रचना
उत्तर द्याहटवा