Kaayguru.Marathi

मंगळवार, मार्च २९, २०२२

तुला पाहतो



तुला पाहता दु:ख विसरतो मी
तुझ्यात सर्व दुनिया पाहतो मी

तुव रुपापुढे तुच्छ मला सारे
चांदणेही मग फिके मानतो मी

सुवर्णकांती दिसे दिव्यप्रभा 
अनलज्वाला तुझ्यात पाहतो मी

तू हसता गाली पसरते लाली
मुखावर उष:काल पाहतो मी

मुखकमल तुझे मोहवी मज
मुखावरी चंद्र न्याहाळतो मी

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, मार्च २४, २०२२

देवा,तू माझा श्वास!

देवा... माझा  एकेक  श्वास
तू  दिलेली  अप्रतिम  भेट !
कृतज्ञ  मी  जपीन  हृदयात
गाईन  तुझे अमृतगाणे थेट!

देवा...चालतो  मी  तुझा बळे
जाणीव मला तू माझ्या श्वास
जिथे  जातो  तेथे  मज होतो
अनंत  रुपात  तुझाच  भास !

देवा... तुज  पाहतो  रेऽऽ  मी
प्रतिदिन  पंचपंच  उष:काली
पानात फुलात किरणात जलात
पाऊसाचा धारात संधीकाली !

प्रभो ! दयाघना मागणे एक
सदैव असावा तू माझा सांगाती
विसर  न  व्हावा तुझा कधी
हात  घ्यावा हाती दे सन्मती !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

बुधवार, मार्च २३, २०२२

आई

आई... तुझ्या  त्यागाला  जगी  उपमाच नाही
बाळाच्या  सुखकल्याणा तू विसरते सर्वकाही
तुझ्या जिव्हाळ्याचा  देवालाही वाटे हो हेवा !
उभा विटेवरी पंढरीनाथ भक्तांची होऊनी आई

आई...तुझ्या  ममतेचा भुकेला  ग्  वैकुंठनाथ
कान्हा  होऊन   जन्मला  तो देवकीच्या पोटी
झाला  यशोदेच्या  कन्हैया  अनुसूयेचा श्रीदत्त
कौसल्येचा  होऊन श्रीराम प्रकटला जगजेठी

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, मार्च १५, २०२२

डायरी ...!

प्रिये...अपूर्ण डायरी वाचून
ठेवू नये कधी विश्वास !
आयुष्यभर क्षणाक्षणाला
गुदमरत  राहतो श्वास !

अपूर्ण डायरीची पाने
जतन करु नये हृदयात
एकच कळते बाजू अन्
दुसरी बाजू राहते अंधारात !

अपूर्ण डायरीची पाने
फाडून टाकावी टराटरा
विश्वासाने लिहावी डायरी
वाचतांना नाचावा मनमयुरा!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


सोमवार, मार्च १४, २०२२

सप्तरंग

सखे...ओळखायला शिक तू
जनमाणसांचे  उधळलेले  रंग
संशयाचे  काढून  फेक पोपडे
हर्ष येईल दारी टळेल प्रीतभंग

सखे...ओळखायला  शिक तू
तानापिहिनीपांजा रंगाचे  धर्म
कोणीही चोरी करु शकत नाही
तुझे   माझे   गोड  प्रेमळ  वर्म !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...