तुझ्याच रं सुखासाठी रक्त जाळलं मी उरातलं !
सांगणार नव्हतो रं पण आज येळच तशी आली
वृद्धाश्रमी घाला थेरड्याला सून सकाळी म्हणली
स्वतः उपाशी राहून मी घास भरवला तुला मुखी
तुझ्या आजारपणी माझ्या मांडीची होती रं उशी
तुझ्या शाळंचा खर्चापायी नाही केली मौजमजा
आणं... तू शिकून आता साईब झाला रं राजा!
तुला मोठ्ठं करतांना मी लई खाल्ल्या रं खस्ता
आता म्हातारपणी नको दावू वृद्धाश्रमाचा रस्ता
पोरा, ऐंक ! पेरलं तेच उगवतं हा दैवाचा न्याय
पटतंय का तुझ्या मनाला विचार करुन पाहायं !
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "