Kaayguru.Marathi

शनिवार, मे १४, २०२२

दिवा



दिवा उजेडाचा असला तर...
झटकत रहावी काजळी
लख्ख प्रकाशकिरण जाती
दूर दूर दिगंतराळी...!

दिवा वंशाचा असला तर...
त्यात तेवावी संस्कारांची वाती
कधीच काळवंडत नाही
प्रेम अन् रक्ताची नाती‌...!

दिवा ज्ञानाचा असला तर...
त्यास असावी नीतिशास्राची धार
सुखरुप लागते आयुष्य नौका
जीवनसागरी आर - पार

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, मे ०६, २०२२

पहिली पुंजी



माझा  नोकरीची पहिली कमाई
कमाई  हाती येता आनंद मोठा
आकाश  ठेंगणे  लाभता कमाई
कमाई येता   गर्व  नको रे खोटा

नोकरीची   पहिली  कमाई  देते
देते   शिकवण   नको कधी उतू
कष्ट  कर  तू  स्वाभिमाने  सदैव
सदैव   तीनही  काळी सहा ऋतू

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, एप्रिल २९, २०२२

एकांत षण्मासाचा !

प्रिये ओळखीच्या  गर्दित तू नसली तर
तो एकांत वाटतो ग् तसा नकोनकोसा
पण... तू  अन्  मी दोघं असता जवळ
प्रिये, वाटे एकांत लाभावा षण्मासाचा 

प्रिये, एकांत त्या क्षणी हृदयाच्या खणी
उधाण  यावे  जसे   प्रीतिचा  ग् सागरी
मिलनाचा  नभांगणी मी चंद्र तू चंद्रिका
नको  कुणी  तिजा आपुल्या स्वप्ननगरी 

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, एप्रिल २८, २०२२

शनिवारवाडा

राजवाड्यात एकटे दुकटे जाणे
सदान् कदा असते धोकादायक
कडक कायदा शिस्तीच्या नावे
घटना घडती तिथे भयानक !

शहाण्या माणसाने जाणून घेऊ नये
राजवाड्याचे धोकादायक रहस्य !
पावलोपावली अन् क्षणोक्षणी
निनादत असते तिथे भयानक हास्य! 

धोकादायक रहस्याने भरलाय एक वाडा
ठिकाण पुणे शनिवारवाडा नाव 
काका मला वाचवा!अजूनही येतो आवाज
ऐकताच चऽऽर्र होई पण लागत नाही ठाव!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शनिवार, एप्रिल २३, २०२२

पुस्तकविश्व

पुस्तक विश्व 

आज २३ एप्रिल: जागतिक पुस्तक दिवस.त्यानिमित्त सुचलेली ही कविता,...
सर्व पुस्तकं प्रेमींना पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌹🙏

आज तेवीस एप्रिल विश्व पुस्तक दिवस खास
पुस्तकांशी करु मैत्री करु कुविचारांचा नाश

आपली अन् पुस्तकाची जमवू सुंदरशी जोडी
पानावरील ओळींशी जोडू अमृत अक्षर गोडी

पुस्तक लहान वा मोठे सुविचार सांगते महान
ज्याला लाभे सहवास त्याचा नक्की वाढे मान

पुस्तकाच्या शब्दात वाहे गंगेचे निर्मळ पाणी
ओळी ओळीत तेजाळते गीता वेदांची वाणी

पुस्तकांतून डोकावतात कथा अन् नीतिकथा रसाळ
इसापनीति विक्रम-वेताळ आजीची गोष्ट अतीमधाळ 

पुस्तकाची मैत्री म्हणजे कृष्ण सुदामाची प्रीति
निराश मनाला जशी प्रकाश देणारी ज्योती

पुस्तके समजावतात नीति आणि जीवन रिती
एकेक पान शिकवी धिराने चालण्याची गती

पुस्तकाचा पानात वाहते आईची माया-ममता
कोणी नसे सान-थोर शिकविती थोर समता

पुस्तकं सांगतात राम - कृष्ण शिवबाचा कथा
ज्ञानेश्वरांचे पसायदान आणि तुकोबांची गाथा

पुस्तकांना समजू आपण जगण्याचे अक्षरधन
ॐ कार शब्द लिहितात रोज प्रसन्न होते मन !

चला!करु श्रीगणेशा!वाचू गुरुजींची श्यामची आई
पुरंदरेंचा शिवबा विसंची ययाति ज्युलियनांची आई

चला…सारस्वतांनो! नोंदवू पुस्तकाच्या शाळेत नाव
कृतकृत्य होईल आपुला चौ-याशी लक्षाचा गाव !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...