दातृत्व ✍️
घेणा-याने घेत जावे…!
घेता घेता एक दिवस
देणा-याचे हात घ्यावे ! "
© कवी विंदा करंदीकर
किती महान विचार मांडलाय कवी विंदा करंदीकरांनी!
खरंच शब्दप्रभू म्हणता येईल त्यांना.असे असले तरी,त्यांचा
हा विचार आज किती लोकांच्या तना-मनाला स्पर्श करुन गेला असेल बरे ? या मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर बहुतांश नकारात्मक दिसेल यात शंकाच नाही.
असे दिसते की, आपण फक्त " देणा-याने दिले " की,ते बिनदिक्कत स्विकारतो.दात्याने दिलेले ओंजळीत मावत नसेल तर, झोळी काठोकाठ भरुन घेतो.पण, " बस्स! नकोयं आता ! " असे शब्द सुद्धा तोंडातून ओठा़वर येत नाही.आणि घेण्याची हाव वाढतच राहते. आणि देतांना मात्र " झिरपता माठ होतो ! " का ? का ?
दात्याचा दातृत्वाचा हा महान गुण का उचलला जात नाही ? हे चिंतन करण्यायोग्य नव्हे काय ?
कारण, आपण फक्त घेण्याचेच काम करतो,मग तो पैसा असो, मालमत्ता असो, मदत असो, पाणी कि़वा जेवण असो, आशीर्वाद असो, उपकार असो, एखाद्याकडून ही नाही तर ती वस्तू, पदार्थ, जिन्नस घेणे असो, वक्तृत्व,लेखन,गायन,वादन,नृत्य शिल्प,विषयक कौतुक असो,,अभिनंदन असो,वाहवा असो...यापैकी काहीही असो ! फक्त घेणेच जाणणारी मंडळी मला तरी पावला-पावलावर दिसते.
मित्र-मैत्रिणींनो,एक विनम्र आवाहन...आपण इतरांकडून ज्या चांगल्या गोष्टींची इच्छा-अपेक्षा करतो.तीच इच्छा-अपेक्षा
आपल्याकडून त्या देणा-या व्यक्तीची असेल ना नसेल पण, निदान कृतज्ञ असणे आवश्यक आहेच ना !.हे लक्षात घेणे...म्हणजेच
" घेता घेता एक दिवस
देणा-याचे हात घ्यावे "
म्हणजेच त्याचा दातृत्वाचा,देण्याचा गुण आपणही स्विकारावा.हीच एक अपेक्षा !🙏
आपणास काय वाटते ? आपली अनमोल प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा !🙏🙏🙏
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "