Kaayguru.Marathi

बुधवार, मे २५, २०२२

आई...!

आई...तू माझ्यासाठी खर्चिल्या दिवसांची
होऊच शकत नाही ग् गणती
तूच तर माझ्या आयुष्याचा नंदादिप
कृतज्ञ मी तुझ्या चरणावरती

आई...तू तर सोशीला नऊमास अन्
नऊ दिवसाचा असह्य भार
फिटणार नाही ऋण तुझे आई
घेतले मी जरी जन्म हजार !

आई...मज येता कणकण तापाची
तू जागून काढते कितिक रात्री
दुःख संकट व्याधीशी लढते
होऊन तू जणू कालरात्री

आई...तुला ना ठावे नटणे सजणे
लेकरासाठी विसरते मौजमजा
आई,शब्द देतो मी तुला !
नाही करणार माझा जीवनातून वजा

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

६ टिप्पण्या:

  1. अप्रतिम शब्दाविष्कार सरजी ✍️✍️🌟🌟

    उत्तर द्याहटवा
  2. आई म्हणजे प्रेमाने भरलेली अनमोल ओंजळ कधीच रीती न होणारी! अप्रतिम शब्दभावना सरजी! सुंदर ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...