प्रिये,खूप झालीय ग तुझ्या येण्याची प्रतीक्षा
प्रतीक्षा करुन वेळ आली ग वेडे होण्याची !
प्रिये, बघ आभाळी चंद्रही झाला ग उदास
उदास माझ्या मनाला ओढ मिठीत घेण्याची
शांत मनसागरी शंकेचा वन्ही ग् पेटला
पेटला अंतरी हा वडवानल सोसवेना
बकुळफुलांचा गजरा कोमेजला ग् प्रिये
प्रिये असह्य एकांत कसा घालवू कळेना
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल "पुष्प "
खूप छान सुंदर
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवाअप्रतिम सुंदर रचना
उत्तर द्याहटवामनापासून आभार मोहनदा...!🙏
हटवाअप्रतिम 👌
उत्तर द्याहटवासुंदर लिहिले
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवा