दिवा उजेडाचा असला तर...
झटकत रहावी काजळी
लख्ख प्रकाशकिरण जाती
दूर दूर दिगंतराळी...!
दिवा वंशाचा असला तर...
त्यात तेवावी संस्कारांची वाती
कधीच काळवंडत नाही
प्रेम अन् रक्ताची नाती...!
दिवा ज्ञानाचा असला तर...
त्यास असावी नीतिशास्राची धार
सुखरुप लागते आयुष्य नौका
जीवनसागरी आर - पार
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम रचना 👌👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखूप छान रचना सर...
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌
उत्तर द्याहटवाफारच सुंदर रचना 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा