सातपुडा साहित्य मंच आयोजित
उपक्रम क्र- २७
विषय - व्वाव…अजितजी डोवाल, केले पाकिस्तानचे
हाल
सूचक - विनोद डंबे “मामाश्री”
दिनांक - ९/५/२०२५
—----------------------------------------------------------
शिर्षक - भारताचे जेम्स बॉण्ड:अजितजी डोवाल (कविता)
भारतमातेचे जेम्स बॉण्ड
नाव शोभे अजित डोवाल
पाकची जमवून माहिती
भारतीय सेनेचे झाले ढाल
भारतभूचे गुप्तहेर होऊन
वर्षं पाकिस्तानात राहिले!
शिवरायांचे बहिर्जी नाईक
जणू तुमचा रुपात जन्मले
इस्लामाबाद उच्चायोगात
झाले भारतीय अधिकारी
सहा वर्ष प्राणपणे पाकची
जमवली माहिती खरीखुरी
खलीस्तान्यांना वाटे तुम्ही
आयएसआय एजंट सर्वस्वी
तुमच्या धैर्याने झाले खरे
ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी
सिक्कीम भारतात यायला
तुमचे महा मौलिक योगदान
भारत संघराज्य नकाशावर
सिक्किम राज्य शोभे सान
तुमचा रणनीतिने राबविले
भारताने ऑपरेशन सिंदूर
दहशतवाद्यांचे नऊ अड्डे
एका रात्री झाले चकनाचूर
जैश - ए - मोहम्मदचा तळ
नाव ऐंका हो बहावलपूर
अन् लश्कर - ए - तैयबाचा
मुरीदके तळाचा बदलला नूर
हिजबुल मुजाहिदीनचा तळ
मुजफ्फराबादेत होता दृष्ट
भिंबर,सियालकोट,चकअम्रू
गुलपूर, कोटी सारे केले नष्ट
पाकड्यांनो आता शांती धरा
नका रे झडकू फुकट लाथा
गुप्तहेर ग्रंथावरची तर वाचा
अ-जित डोवालांची शौर्य गाथा
तुमची ऐंशी वर्षांची तपश्चर्या
दहशतवाद्यांना ठरलीय ताप
ना-पाकड्यांनो सुधरा आता
हिंद भूमीवर राहतो तुमचा बाप!
©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “पुष्प”