आई माझी सरस्वती
जणू दिपकाची वाती
संस्कार तिचे संजीवक
लाभे जीवना सन्मती
सकल ज्ञानाचे आगर
बाबा माझे बृहस्पती
आशिष मिळता तयांचा
संकटे दूर हो पळती
आईच्या चरणी लाभे
मज स्वर्गसुखाची प्राप्ती
निराश मना मिळते
आनंदे जगण्याची गती
बाबांच्या एक एक शब्द
शिकवी मज प्रेमाची नाती
आयुष्याच्या वाटेवरती
टळे दुःख दैन्याची भीती
फिटे ना आई बाबांचे ऋण
जरी घेतले जन्म साती
करीता आईबाबांची सेवा
लाभे प्रभुकृपेचे माणिक मोती
शब्दार्थ - साती= सात
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल," पुष्प "
उत्तम अगदी सुंदर परिपूर्ण काव्य
उत्तर द्याहटवाअतिसुंदर ! अवर्णनीय ....
उत्तर द्याहटवा