प्रिये किती सुंदर ग् रुप तुझे गुलजार
तुला बनविले ज्याने त्याचे मानितो आभार
प्रिये पाहिली मेनका रंभा उर्वशी स्वर्गीची
तुझ्या पुढे न टिकती तू ग रती मदनाची
पित वर्णी तुझी काया वाटे ग् बावणकशी
केस सोनेरी उडता भासे तू नागीन जशी
डोळे पाहता वाटे तू मज ग् मृगनयनी
चाल तुझी मस्तानी ग जणू तू गजगामिनी
माझा संसाराची शोभे तूच तर खरी राणी
तुझ्या संगती लिहिली आपुली प्रीतकहाणी
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
सुंदर लेख
उत्तर द्याहटवाछानच सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवाव्वा...! सुंदर रचना 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा