Kaayguru.Marathi
शुक्रवार, जुलै २१, २०२३
शनिवार, जुलै ०८, २०२३
भ्रम [ कविता ]
आपला आपला म्हणता...
क्षणाक्षणाला गेलो मी गुंतून
केसाने गळा कापला त्याने
आपुलकीच्या भ्रमात घेरून
आपला परका कोण ?
ओळखायला लागलो आता
माणसं कळती ठेस लागता
आपला पाय रक्तबंबाळ होता
नियमच आहे हो जगताचा
येथे कोणी नसतो कोणाचा
पाणी नाका तोंडाशी येता
माकडीण उभी माथी पिलाचा
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
बुधवार, जून २८, २०२३
विठू आला [ अभंग ]
विठू आला [ अभंग ]
धावा धावा धावा । माझ्या विठू आला।
पायी फुले घाला । माझ्या देवा ।।१।।
सोडूनी वैकुंठ । आला वाळवंटी ।
संताचिया भेटी । आनंदाने ।।२।।
चंदनाची उटी । शोभे भाळी ।
उभा वनमाळी । विटेवरी ।।३।।
पाहुनिया रुप । भासे जणू शिवा ।
सुख लाभे जीवा । भेटीलागी ।।४।।
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
बुधवार, मे ३१, २०२३
तुझ्यात मी![ अष्टाक्षरी]
सखे तू माझी मी तुझा
तन दोन आत्मा एक
ठेच लागे मज पाया
डोळा अश्रु तुझे कैक. ।।१।।
कप्पा मी तुझ्या मनीचा
शुक्रतारा मी तारका
दवबिंदू तू पर्णाचा ।।२।।
तुझ्यासवे जग भासे
स्वर्गाहून सुंदरसे
तूच माझी स्वप्नपरी
दुजा सर्व गौण दिसे ।।३।।
नभ तू तुझी मी मेघ
इंद्रधनु तू आभाळी
सप्तरंगी रंगते मी
होते लाली उष:काळी ।।४।।
रोमरोमी तू कन्हैया
सूर तू मी रे बासुरी
स्पर्श होता अधरांचा
होते गोविंदा बावरी ।।५।।
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
मंगळवार, मे ३०, २०२३
घे झेप आभाळी! [अष्टाक्षरी]
नको अडकून राहू पिंज-यात या गड्या तू
पंख पसरुन घ्यावी उंच आभाळी झेप तू ।।१।।
असतील जरी दाणे सोने रुपे नी मोत्यांचे
टाकूनिया दे तू सारे पाश मोह मायेचे तू ।।२।।
दिले देवाने पंखात बळ हे विहरण्याचे
ओलांडून जा सागर नदी डोंगर दूर तू ।।३।।
तोड गड्या पायाची रे बेडी सोन्याची दास्याची
सामर्थ्याचा गर्व नये हो दिनांचा कैवारी तू ।।४।।
जग एक बंदिशाळा कोणी न येथे कुणाचा
कारा तोडुनिया व्हावे जगन्नाथ सृष्टीचा तू ।।५।।
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
Mhasawad.blogspot.com
तिरंगा आमुची शान!
सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...
-
तंबाखू टाळा, आरोग्य सांभाळा ! मानवी जन्म आणि मिळालेला हा देह आपण प्रत्येकाने सार्थकी लावलाच पाहिजे. परंतु सध्याचा परिस्थितीचा विचार करता म्...
-
म्हसावद, ता.शहादा येथील कुबेर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यामंदिर विषयी कविता माझी शाळा माझी शाळा लळा लाविते बाळा उपदेशाचा ...
-
भारतीय संस्कृतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गुरुबद्दल आदर भावना प्रकट करणे होय. " गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्व...
-
देवा... माझा एकेक श्वास तू दिलेली अप्रतिम भेट ! कृतज्ञ मी जपीन हृदयात गाईन तुझे अमृतगाणे थेट! देवा...चालतो मी त...
-
विठ्ठल माझा गाव विठ्ठल माझा भाव । हृदयी विराजे विठ्ठल माझा ।। विठ्ठल माझा देव विठ्ठल माझी ठेव । अंतरीची तळमळ विठ्ठल माझा ।। विठ्...
-
सखी पहाटेच्या त्या दवाने... तन-मन ग् भिजते प्रेमकिरणात न्हाऊनी मुखकमल तुझे फूलते कळी खुलता प्रीतिची हृदय पुष्प दरवळते फुलपाखरू...
-
देवा,तू आहेस फुलात म्हणून दरवळे परिमळ गुंततो फुलात मी रे विसरुन भान सारे देवा तूच आहे पाऊसधारा म्हणून खुलते वसुंधरा नयनी भरतो...
-
क्या कहूॅं मैं। कॉलेज के वो दिन। युग जैसा लगता था। इक दिन तुम बीन। क्या कहूॅं मैं। कॉलेज की वो मौजमस्ती। आप और मैं थे। प...
-
वर्ष २०२४ मधील पुण्यपावन श्रावण मास… श्रावणसरी अंगावर बरसु लागल्या की, मला बालकवी त्र्यंबक बापुजी ठोमरे यांच्या सिद्धहस्त ...
-
राष्ट्रीय गृहीणी दिवस मित्र मैत्रिणींनो आज ३ नोव्हेंबरचा दिवस. हा दिवस आपण भारतीय नागरिक " राष्ट्रीय गृहिणी दिवस " ...