Kaayguru.Marathi

बुधवार, जून २८, २०२३

विठू आला [ अभंग ]

विठू आला [ अभंग ]
धावा धावा धावा । माझ्या विठू आला।
पायी फुले घाला  । माझ्या देवा ।।१।।
सोडूनी वैकुंठ      । आला वाळवंटी ।
संताचिया भेटी    । आनंदाने    ।।२।।
चंदनाची उटी      । शोभे भाळी । 
उभा वनमाळी     । विटेवरी ।।३।।
पाहुनिया रुप     । भासे जणू शिवा ।
सुख लाभे जीवा । भेटीलागी ।।४।।

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

२० टिप्पण्या:

  1. मनापासून आभार मॅडम...!🙏
    जय जय विठोबा रखुमाई 🌹🙏

    उत्तर द्याहटवा
  2. छान! 👌🏻
    जय जय हरी विठ्ठल.... विठ्ठल... विठ्ठल

    उत्तर द्याहटवा
  3. 🙏
    || जय जय पांडुरंग हरी ||
    आबा
    ❤️

    उत्तर द्याहटवा
  4. जय हरी विठ्ठल 🙏🏼🙏🏼
    सुंदर अभंग रचना 👌👌✍️✍️🙏🏼🙏🏼💐💐

    उत्तर द्याहटवा
  5. खूप सुंदर रचना सर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🌹🙏

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...