Kaayguru.Marathi

डॉक्टर डे - माझे प्राजक्त लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
डॉक्टर डे - माझे प्राजक्त लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ऑगस्ट १६, २०१८

डॉक्टर डे निमित्ताने कविता.

डॉक्टर डे निमित्ताने….

प्रिय डॉक्टर

डॉक्टर…,

तुम्ही आमच्या आयुष्याचे शिल्पकार

अन् सुखाचे सार

दुःख व्याधीला तुम्ही

जगण्याचा आधार ||१||

डॉक्टर…,

तुम्हाला माहिती केवळ

मानवतावादी धर्म

अहोरात्र रुग्णसेवा

हेच तुमचे कर्म ||२||

डॉक्टर…,

तुम्ही दुःखाचे भाजक

अन् सुखाचे गुणक

सामाजिक आनंदाचे

तुम्हीच खरे जनक ||३||

डॉक्टर…,

तुमच्या एका स्पर्शात

वाढते जगण्याची आस

तुमच्या एका शब्दात

श्वासाला लाभे श्वास ||४||

डॉक्टर…,

तुम्हालाच असते खरे

रुग्णसेवेचे भान

तुम्ही अहर्निश प्रयत्ने

वाचविता रुग्णप्राण ||५||

डॉक्टर…,

आमच्या जन्ममरणाची

तुम्ही जाणतात नाडी

तुमच्या औषधोपचारे

आयुष्याची चाले गाडी ||६||

डॉक्टर…,

तुम्हालाच आमुच्या

आरोग्याची चिंता

तुमच्याविना रोजच

पेटतील अनंत चिता ||७||

आज डॉक्टर डे

करितो तुम्हाला

मी हृदयापासून

प्रणाम ! प्रणाम!! प्रणाम !!! ||८||

© प्रा.पुरुषोत्तम पटेल, 

mhasawad.blogspot.in



Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...