Kaayguru.Marathi

बुधवार, एप्रिल १६, २०२५

अहाहा...बहावा फुलला!

सातपुडा साहित्य मंच आयोजित
उपक्रम क्र- १५
विषय - अहाहा!बहावा फुलला!
--------------------------------------------------------------
शिर्षक: बहावा फुलला!

ऋतुराजाचा स्वागताला
पहा उभा नटून अहाहा
कवेत घेण्या  आतूरला
प्रसन्न   हा  सोनबहावा १

पर्ण भासे  हिरवा  चुडा
पुष्प अहाहा मदनबाण
हृदयाला देई संजीवनी 
प्रसन्न   आनंदाचे  दान २

हळद  माखून  अंगावर
सृष्टी  भासे  नवी नवरी
पुष्पमाळा घेऊन आला
पितांबर  नेसून  श्रीहरी ३

पानं  भासे हिरवा चुडा
फुलं    पिवळी   हळद
लाजेचा   नेसून   शालू
बहावा  घालतोय  साद ४

बहावा  वाटे   प्रितवेडा
जणू करितो प्रियाराधन
राधेसंग रासक्रीडा खेळे
नयनी  दिसे  मनमोहन ५

इवली  इवली  पाकळी
जणू  मिणमिणते  डोळे 
टोकावरच्या   कळ्यांचे
भाव भासती  हो भोळे ६

फांदी  फांदीवरची फुलं 
वाटे   मोती अन् पोवळे
रविकिरणात   शोभतसे
नवरत्नांचे मळे  आगळे ७

भुईने लावली जणू नभी 
पिवळ्या दिव्यांचे झुंबर
सृष्टी  भासे  नवी  नवरी
बहावा दिसे नयनमनोहर ८

वाढता उन्हाची काहीली
बहावा   येई‌  बहरायला
खिन्न   मानवी   मनाला 
प्रसन्न होऊन हसवायला ९

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “ पुष्प ”

१५ टिप्पण्या:

  1. वाह.....अप्रतिम सुंदर रचना 👌👌👌👌🌼🌼🌼🌼🌼🌼

    उत्तर द्याहटवा
  2. वाँव..खूपच सुंदर कविता ..भावपूर्ण ,आशयपूर्ण....मनाला भुरळ घालणारी..उफमा तर खूपच छान छान दिल्यात...पण बहावा म्हणजे काय ? मला नाही कळलं...पण कविता सुरेख..माझ्या कडून पाच स्टार⭐⭐⭐⭐⭐ ...पुष्पा भोसले

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम सर जी वाहवा जबरदस्त फुलला कवितेच्या माध्यमातून वाहवा

    उत्तर द्याहटवा
  4. खुप सुंदर काव्य रचना..

    मनातील लपलेला बहावा,
    ओळखी रे मना पुन्हा पुन्हा,
    विसरून जाशी सारी पतझड,
    अनाहत जागेल साऱ्या तना

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...