मुली तुझे येणे वाटे
निरागस असे काही
बोल तुझे ते बोबडे
संजिवक स्फूर्तीदायी ।।१।।
तुझे लटके रुसणे
देतो आनंद मजला
मुली तुझा आगमने
मन निवास सजला ।।२।।
बोट तुझे हाती घेता
लाभे स्वर्गीचा आनंद
बाप लेकीच्या नात्याचा
घट्ट रेशमाचा बंध ।।३।।
दुडूदुडू चालतांना
वाजे पायीचे पैंजण
स्वर ऐकताना वाटे
पावा वाजवी मोहन ।।४।।
खेळ खेळता अंगणी
रंगे भातुकली छान
कळी कधी झाली फूल
नसे तिला मला भान ।।५।।
निरागस लेक माझी
अहाऽ झाली उपवर
सेतू होऊन निघेल
बांधी माहेर सासर ।।६।।
नातीगोती घेऊनिया
लेक निघाली सासरी
मन अडकले तिचे
प्रिय बापाच्या अंतरी ।।७।।
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल
" पुष्प "
बाप लेकीचा मनाची आंतरीकता अप्रतिम शब्दांत मांडली सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद!🙏
हटवाखूपच सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाआभारी मॅडम!🙏
हटवाव्वा..!अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी 🙏
हटवाअगदी खरी भावना मांडली 💞खूपच सुंदर
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाधन्यवाद!🌹
हटवाखुप छान रचना सर ,अप्रतिम सुंदर
उत्तर द्याहटवा