जायची का ग् केली तू घाई?
तू सहज निघून गेली पण...
येता आठव अश्रू थांबत नाही!
आई...क्षणभराचा ग् विलंब
जणू आला हवेचा झोत
जाऊन पळत वैद्य आणेतो
विझून गेली तुझी प्राणज्योत !
आई...सारे सुख संपत्ती वैभव
आज तर माझ्या दारी आले
तू नसता माझ्या जवळी वाटे
मातृछत्र कायमचे मी गमावले
आई...फिरुन ये ना ग् तू...
या भूलोकी एकदा माझ्यासाठी
फिरव माया ममता जिव्हाळ्याचा
हात तू प्रेमाने माझा पाठी !
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल
" पुष्प "
हृदयस्पर्शी आणि वास्तव मांडले सरजी ✍️👌👌 खरंच आज आई हव्या होत्या ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाह्रदयस्पर्शी कविता🙏 miss u aajji
उत्तर द्याहटवाआईची महानता सांगणारे अप़तिम काव्य...
उत्तर द्याहटवा