Kaayguru.Marathi

गुरुवार, मे २६, २०२२

प्रतिक्षा

प्रिये,खूप झालीय ग तुझ्या येण्याची प्रतीक्षा
प्रतीक्षा करुन वेळ आली ग वेडे होण्याची !
प्रिये,  बघ  आभाळी चंद्रही झाला ग उदास
उदास माझ्या मनाला ओढ मिठीत घेण्याची

शांत    मनसागरी   शंकेचा  वन्ही ग्  पेटला
पेटला  अंतरी    हा   वडवानल    सोसवेना
बकुळफुलांचा   गजरा   कोमेजला  ग्  प्रिये
प्रिये  असह्य   एकांत  कसा  घालवू कळेना

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल "पुष्प "


बुधवार, मे २५, २०२२

आई...!

आई...तू माझ्यासाठी खर्चिल्या दिवसांची
होऊच शकत नाही ग् गणती
तूच तर माझ्या आयुष्याचा नंदादिप
कृतज्ञ मी तुझ्या चरणावरती

आई...तू तर सोशीला नऊमास अन्
नऊ दिवसाचा असह्य भार
फिटणार नाही ऋण तुझे आई
घेतले मी जरी जन्म हजार !

आई...मज येता कणकण तापाची
तू जागून काढते कितिक रात्री
दुःख संकट व्याधीशी लढते
होऊन तू जणू कालरात्री

आई...तुला ना ठावे नटणे सजणे
लेकरासाठी विसरते मौजमजा
आई,शब्द देतो मी तुला !
नाही करणार माझा जीवनातून वजा

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मंगळवार, मे २४, २०२२

भाऊ माझा

 
[आज दि. २४ मे: " ब्रदर्स डे " - भ्राता दिवस 
त्या निमित्ताने भावांना शब्दसुमनांनी शुभेच्छा!💐]

भाऊ माझा 

भाऊ तू  माझा  गुणाचा किती  वर्णू तुझी ख्याती
तू  तर भासे  बंधु  कृष्ण या भूतलावरती !

भाऊ  माझा   प्रेमाचा  जसा   शिंपल्यातील मोती
अखिल विश्वात पोहचली भावा तुझी रे यश-किर्ती !

भाऊ  माझा लाखात एक शोभून दिसतो लई भारी
तुझा  एक शब्द ऐकताच घडते  मला   आनंदवारी

भाऊ  माझा  हो दिलदार मन - हृदयाने  लई  भारी
त्यास  ज्ञान-धनाची ना कमी गज  अश्व  झुले  दारी 

देवा  प्रार्थना  करीतो तुज दे ! आयुरारोग्य भावाला
द्यावा  प्रेमभावे आशीर्वाद कष्ट  आणि  कर्तृत्वाला !


©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "











शनिवार, मे १४, २०२२

दिवा



दिवा उजेडाचा असला तर...
झटकत रहावी काजळी
लख्ख प्रकाशकिरण जाती
दूर दूर दिगंतराळी...!

दिवा वंशाचा असला तर...
त्यात तेवावी संस्कारांची वाती
कधीच काळवंडत नाही
प्रेम अन् रक्ताची नाती‌...!

दिवा ज्ञानाचा असला तर...
त्यास असावी नीतिशास्राची धार
सुखरुप लागते आयुष्य नौका
जीवनसागरी आर - पार

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

शुक्रवार, मे ०६, २०२२

पहिली पुंजी



माझा  नोकरीची पहिली कमाई
कमाई  हाती येता आनंद मोठा
आकाश  ठेंगणे  लाभता कमाई
कमाई येता   गर्व  नको रे खोटा

नोकरीची   पहिली  कमाई  देते
देते   शिकवण   नको कधी उतू
कष्ट  कर  तू  स्वाभिमाने  सदैव
सदैव   तीनही  काळी सहा ऋतू

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...