Kaayguru.Marathi

रविवार, ऑक्टोबर ०१, २०१७

जेष्ठ नागरिक

आज १ अॉक्टोबर  जेष्ठ नागरिक दिवस. त्या निमित्ताने ही एक कविता.
         
         जेष्ठ नागरिक  *
आज जेष्ठ नागरिक दिन
करु या आपण साजरा
आजची हिरवी पाने
उद्या पिवळी नका विसरा ||१||
आई बाबा आपुले दैवत
ठेवू या त्यांच्या मान
त्यांनी दाविली दुनिया
करु नका हो अपमान ||२||
हाती बोट धरुनी शिकवीला
बाबांनी जीवनाचा पहिला पाठ
वृद्ध होता.... का दाखविता
आज वृद्धाश्रमाची  वाट ? ||३||
धन्य माय धन्य बाबा
अगणित थोर उपकार
न ऋण फिटे जन्मदांचे
जरी जन्म घेतले हजार ||४||
करितो पुरुषोत्तम विनंती
जुने हे ह्रदयी जपावे नाते
संत सज्जन गेले सांगुन
जे पेरावे तेचि उगवते ||५||
उदंड झाली जरी लेकुरे
कधी न् केली वाटणी
मोठेपणी होता विभक्त
का मग..आईबापांची वाटणी? ||६||
        ©प्रा.पुरूषोत्तम पटेल,
          म्हसावद
www.mhasawad.blogspot.com

शनिवार, सप्टेंबर ३०, २०१७

दसरा

          * दसरा *                                            आला सण दसरा
सखा साडेतीन मुहूर्ताचा
जागर करु श्रीरामाचा
मारक हा दशाननाचा ||१||
स्मरु या आपण आज
अपराजीता देवीला
जाऊ शरण मागू बळ
नष्ट कराया दुर्गुणाला||२||
शमी आपटा दोन वृक्ष
संस्कृतीचे दोन भुषण
रघु अन् पांडवांचे वाली
करु तयांचे आज पूजन||३||
सायंकाळी रमतगमत करु
ईशदिशा सीमोल्लंघन
जाळू मनामनातील किल्मी
देवू धर्मनीतिची शिकवण ||४||
दसरा घेऊन येई
दश् आणिक हरा
प्रभाव नवदुर्गांचा वसे
आज दशदिशांना खरा ||५||

©प्रा. पुरुषोत्तम पटेल
मु. पो. म्हसावद

रविवार, ऑगस्ट ०६, २०१७

मित्र

मित्र... हवेहवेसे वाटणारे
                 प्रेमाचे  नाव
      संकटात  मज  भासे
                 सुखाचे गाव
मित्र... रणरणत्या उन्हात
                  मायेचा घनू
           एकाकी  मनाला
        जणू कृष्णाची वेणू
मित्र... सागर  तळातील
      स्वाती  थेंबाचा मोती
    दुःखाच्या तिमीरातील
            प्रकाशाची वाती
(दि. 6 अॉगष्ट 2017 पहिला रविवार: फ्रेंडशिप डे निमित्त सर्व मित्रांना मैत्रीपूर्ण शुभेच्छा!!!)
     *प्रा.पुरुषोत्तम  पटेल
      म्हसावद, ता. शहादा

रविवार, जुलै २३, २०१७

प्रिया

तू चोरले गुज मनीचे लपला ना चेहरा
जे नव्हते बोलायाचे बोलून गेला चेहरा
मैफिलीत जेव्हा  गायले आपुले प्रेमगीत
मिसळून सुर ओठी गाऊन गेला चेहरा
सखे तुझा वेणीत जेव्हा माळीला मी गजरा
गालावरी चंद्रखळी दावून गेला चेहरा
सखे भरुन गेली श्वासात गंध रातराणी
मलमली मिठीत माझ्या लाजून चूर चेहरा
पाहता तव चेहरा होय कलीजा खलास
बेनूर ही दुनिया कोहिनूर तुझा चेहरा.

   © प्रा.पुरूषोत्तम पटेल, म्हसावद
       09421530412

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...