रे गड्या जगावे तू
सदैव आनंदात
असती जे कामाचे तयांशी
कर तू दोस्ती बिनधास्त ।।१।।
दुनिया ही मतलबी
राहू नको रे तू सुस्त
जाणावा आपुला परका
ओळख ठेव तू रास्त ।।२।।
म्हणती कामापुरता मामा
तयांची नको रे बडदास्त
अप्पलपोटी होऊन
करीती सारे तुझे फस्त ।।३।।
ऐक बोल पुरुषोत्तमाचे
जन्म नव्हे हा स्वस्त
चुकवाया चौ-याशीचा फेरा
प्रभु नाम आळवावे मस्त ।।४।।
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "