Kaayguru.Marathi

बुधवार, मार्च २२, २०२३

आनंदाची गुढी

परतले नगरी  सीताराम प्रभू
दारी उभारीली स्वागता गुढी
सडा  रांगोळी  बांधून  तोरण
त्यागिली  हेवा दावाची अढी

गंगौदके  प्रक्षालिन श्रीचरण 
वंदीन कौसल्या दशरथनंदन
दिनबंधु माझा अयोध्यानरेश
पुजन  गंधाक्षता भस्म चंदन

असुरनिकंदन पिताज्ञापालक
लक्ष्मणाग्रज गुरू ऋषीतारक
अजाणबाहू   जानकीवल्लभ
पतितपावक   भक्त  उद्धारक

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



१४ टिप्पण्या:

  1. खुपच सुंदर रचना.... 👌👌👌✍️✍️✍️✍️

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर रचना सर जी मराठी नव वर्षानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा असेच लेखन होत राहो हिच सदिच्छा

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर काव्य रचना.आपणास गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हार्दिक शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...