बाप्पा गणेशा या हो
शिवसुता तुम्ही गौरीनंदना
मंगलमूर्ती या हो!
हृदयी लागली हुरहूर आता
गणपती बाप्पा या हो!
निरोप घेऊन वरीस झाले
दुःखहर्ता या हो!
मांडव घातला अंगणी आज
सुखकर्ता या हो!
ढोल ताशांचा निनाद गर्जे
शूर्पकर्णा या हो!
मखरी कोरीले मयुरासन
मोरेश्वरा या हो !
तुम्ही नसता उदास वाटे
चिंतामणी या हो!
रिद्धी सिद्धीचे तुम्ही दयाळा
सिद्धीविनायक या हो!
जमविल्या सा-या एकवीस पत्री
महागणपती या हो!
लाडू मोदक प्रसाद ठेविला
विघ्नहरजी या हो!
कथा किर्तनी संतजन आले
गिरिजात्मज या हो!
आतूर सारे भक्त दर्शना
वरदविनायक या हो!
जगी दाटला अंधार सारा
मंगलमूर्ती या हो!
शब्दसौदर्य :-
प्रा.श्री.पुरूषोत्तम पटेल
mhasawad.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा