आली आता माझी स्वारी
तुम्ही घ्यावी खबरदारी
उरका प्रातः सायं काम
बाराच्या आत या हो घरी ||१||
दिवसाकाठी प्यावे तुम्ही
लिंबू शरबत ताक पाणी
कपडे वापरा सैलघोळ
सुती वस्त्रे मला प्यारी ||२||
तहान लागता जीवाला
माठाचे पाणी घ्या गारेगार
कामाला जाता डोक्याला टोपी
चेह-यावरी बांधा रुमाल ||३||
ऊन्हात बाहेर फिरणे
तुम्ही नक्कीच टाळा
दारे खिडक्या ठेवा बंद
घरात असू द्या वाळा ||४||
एसी कार थांबवून तुम्ही
बिनधास्त झोपू नका
विंडोज् ठेवा जरा उघडी
नाहीतर जीव जाई फुका ||५||
अती मांसाहार-मद्यपान
उन्हाळ्यात हो करु नका
कोल्ड्रिंक्स अन् जंकफूड
तुम्ही दूर कराया शिका ||६||
उलटी मळमळ डोकेदुखी
अन् ठोके वाढता छातीला
हे तर उष्माघाताचे लक्षण
रुग्णालयी न्यावे रुग्णाला ||७||
Kaayguru.Marathi
शुक्रवार, मार्च ३०, २०१८
ऊन म्हणे...
रविवार, ऑक्टोबर ०१, २०१७
जेष्ठ नागरिक
आज १ अॉक्टोबर जेष्ठ नागरिक दिवस. त्या निमित्ताने ही एक कविता.
* जेष्ठ नागरिक *
आज जेष्ठ नागरिक दिन
करु या आपण साजरा
आजची हिरवी पाने
उद्या पिवळी नका विसरा ||१||
आई बाबा आपुले दैवत
ठेवू या त्यांच्या मान
त्यांनी दाविली दुनिया
करु नका हो अपमान ||२||
हाती बोट धरुनी शिकवीला
बाबांनी जीवनाचा पहिला पाठ
वृद्ध होता.... का दाखविता
आज वृद्धाश्रमाची वाट ? ||३||
धन्य माय धन्य बाबा
अगणित थोर उपकार
न ऋण फिटे जन्मदांचे
जरी जन्म घेतले हजार ||४||
करितो पुरुषोत्तम विनंती
जुने हे ह्रदयी जपावे नाते
संत सज्जन गेले सांगुन
जे पेरावे तेचि उगवते ||५||
उदंड झाली जरी लेकुरे
कधी न् केली वाटणी
मोठेपणी होता विभक्त
का मग..आईबापांची वाटणी? ||६||
©प्रा.पुरूषोत्तम पटेल,
म्हसावद
www.mhasawad.blogspot.com
शनिवार, सप्टेंबर ३०, २०१७
दसरा
* दसरा * आला सण दसरा
सखा साडेतीन मुहूर्ताचा
जागर करु श्रीरामाचा
मारक हा दशाननाचा ||१||
स्मरु या आपण आज
अपराजीता देवीला
जाऊ शरण मागू बळ
नष्ट कराया दुर्गुणाला||२||
शमी आपटा दोन वृक्ष
संस्कृतीचे दोन भुषण
रघु अन् पांडवांचे वाली
करु तयांचे आज पूजन||३||
सायंकाळी रमतगमत करु
ईशदिशा सीमोल्लंघन
जाळू मनामनातील किल्मीष
देवू धर्मनीतिची शिकवण ||४||
दसरा घेऊन येई
दश् आणिक हरा
प्रभाव नवदुर्गांचा वसे
आज दशदिशांना खरा ||५||
©प्रा. पुरुषोत्तम पटेल
मु. पो. म्हसावद
रविवार, ऑगस्ट ०६, २०१७
मित्र
मित्र... हवेहवेसे वाटणारे
प्रेमाचे नाव
संकटात मज भासे
सुखाचे गाव
मित्र... रणरणत्या उन्हात
मायेचा घनू
एकाकी मनाला
जणू कृष्णाची वेणू
मित्र... सागर तळातील
स्वाती थेंबाचा मोती
दुःखाच्या तिमीरातील
प्रकाशाची वाती
(दि. 6 अॉगष्ट 2017 पहिला रविवार: फ्रेंडशिप डे निमित्त सर्व मित्रांना मैत्रीपूर्ण शुभेच्छा!!!)
*प्रा.पुरुषोत्तम पटेल
म्हसावद, ता. शहादा
गुरुवार, ऑगस्ट ०३, २०१७
Mhasawad.blogspot.com
तिरंगा आमुची शान!
सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...
-
तंबाखू टाळा, आरोग्य सांभाळा ! मानवी जन्म आणि मिळालेला हा देह आपण प्रत्येकाने सार्थकी लावलाच पाहिजे. परंतु सध्याचा परिस्थितीचा विचार करता म्...
-
म्हसावद, ता.शहादा येथील कुबेर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यामंदिर विषयी कविता माझी शाळा माझी शाळा लळा लाविते बाळा उपदेशाचा ...
-
भारतीय संस्कृतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गुरुबद्दल आदर भावना प्रकट करणे होय. " गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्व...
-
देवा... माझा एकेक श्वास तू दिलेली अप्रतिम भेट ! कृतज्ञ मी जपीन हृदयात गाईन तुझे अमृतगाणे थेट! देवा...चालतो मी त...
-
विठ्ठल माझा गाव विठ्ठल माझा भाव । हृदयी विराजे विठ्ठल माझा ।। विठ्ठल माझा देव विठ्ठल माझी ठेव । अंतरीची तळमळ विठ्ठल माझा ।। विठ्...
-
सखी पहाटेच्या त्या दवाने... तन-मन ग् भिजते प्रेमकिरणात न्हाऊनी मुखकमल तुझे फूलते कळी खुलता प्रीतिची हृदय पुष्प दरवळते फुलपाखरू...
-
देवा,तू आहेस फुलात म्हणून दरवळे परिमळ गुंततो फुलात मी रे विसरुन भान सारे देवा तूच आहे पाऊसधारा म्हणून खुलते वसुंधरा नयनी भरतो...
-
क्या कहूॅं मैं। कॉलेज के वो दिन। युग जैसा लगता था। इक दिन तुम बीन। क्या कहूॅं मैं। कॉलेज की वो मौजमस्ती। आप और मैं थे। प...
-
वर्ष २०२४ मधील पुण्यपावन श्रावण मास… श्रावणसरी अंगावर बरसु लागल्या की, मला बालकवी त्र्यंबक बापुजी ठोमरे यांच्या सिद्धहस्त ...
-
राष्ट्रीय गृहीणी दिवस मित्र मैत्रिणींनो आज ३ नोव्हेंबरचा दिवस. हा दिवस आपण भारतीय नागरिक " राष्ट्रीय गृहिणी दिवस " ...