Kaayguru.Marathi

शुक्रवार, एप्रिल १५, २०२२

ओळख

आपणच आपल्याला ओळखावे आधी
आधी  स्वतः नखशिखांत घ्यावे जाणून
एक  बोट  दाखवून  तू   शिकवी  तेव्हा
तेव्हा  ' तू बघ ? ' तीन बोटे म्हणे हसून

जणू  म्हणती  ते  नको शिकवू लोकांना
लोकांना  कळतंय तू किती काळा-गोरा
ब्रम्हज्ञान  देतांना  आधी  आपण  व्हावे
व्हावे  संत - माऊलीपरी  शुद्ध  रे पोरा!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


बुधवार, एप्रिल १३, २०२२

संशयाचे भूत

संशयाचे तरु लावू नये मनाच्या अंगणी
अंगणी पडते सदा विषवृक्षाची सावली
सदैव  जतन  करावी  प्रीतिची हिरवळ
हिरवळ सवे शांत राही विचार काहिली

संशयाचे  भूत कधी  धरु  नये पाठीवर
पाठीवर  ते   बसेलच   सदैव  चिटकुन
होऊ देणार नाही ते कधी सुखात संसार
संसार  एका  क्षणात जाईल कोलमडून

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

रविवार, एप्रिल ०३, २०२२

माझा अभिमान !

देवा...निळकंठा ! हे सगळं तुझ्या कृपेनेच !
जन्माने  लाभले मला पुण्यवान आईबाबा
अभिमान वाटतोय मला त्यांचा जगण्याचा
विचारांचे अमृत प्राशून आहे मी ताठ उभा

बायको माझी गुणाची आहे माझा अभिमान
निश्चयाचा महामेरु ती  करतेय संसार छान
माझा मुला - मुलीची  तर  गोष्टच लई भारी
तीघांच्या कर्तृत्वाने  वाढला माझा सन्मान !

माझी  लेक  तर  गुणांची  माझा  अभिमान
पुत्राने   उचलला   स्वाभिमानाचा   संस्कार
धन्य   धन्य   झालो  मी  जन्म  देऊन  दोघां
स्वप्न  सुखी   जीवनाचे  झाले  होऽ  साकार!

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


मंगळवार, मार्च २९, २०२२

तुला पाहतो



तुला पाहता दु:ख विसरतो मी
तुझ्यात सर्व दुनिया पाहतो मी

तुव रुपापुढे तुच्छ मला सारे
चांदणेही मग फिके मानतो मी

सुवर्णकांती दिसे दिव्यप्रभा 
अनलज्वाला तुझ्यात पाहतो मी

तू हसता गाली पसरते लाली
मुखावर उष:काल पाहतो मी

मुखकमल तुझे मोहवी मज
मुखावरी चंद्र न्याहाळतो मी

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

गुरुवार, मार्च २४, २०२२

देवा,तू माझा श्वास!

देवा... माझा  एकेक  श्वास
तू  दिलेली  अप्रतिम  भेट !
कृतज्ञ  मी  जपीन  हृदयात
गाईन  तुझे अमृतगाणे थेट!

देवा...चालतो  मी  तुझा बळे
जाणीव मला तू माझ्या श्वास
जिथे  जातो  तेथे  मज होतो
अनंत  रुपात  तुझाच  भास !

देवा... तुज  पाहतो  रेऽऽ  मी
प्रतिदिन  पंचपंच  उष:काली
पानात फुलात किरणात जलात
पाऊसाचा धारात संधीकाली !

प्रभो ! दयाघना मागणे एक
सदैव असावा तू माझा सांगाती
विसर  न  व्हावा तुझा कधी
हात  घ्यावा हाती दे सन्मती !

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...