माझा राणीचे प्रीतसाम्राज्य पसरले दशदिशी !
सगळेच प्रजाजन येथे उपभोगती सुखराशी !
राणीच्या साम्राज्याला चहुदिशी माया तटबंदी
दररोज नाश्त्याला इथे फळे लाडू अन् बुंदी
राणीच्या साम्राज्यात... वाहे तेला - तुपाचे पाट
दूध आणि दहीचे तर कधी रिते न होती माठ
राणीच्या साम्राज्यात... नेसायला जरतारी वस्र
जिव्हाळा स्नेह- सौख्य राज्याची शोभती शस्र
राणीच्या साम्राज्यात...भेद नसे आपला परका
गरीब श्रीमंत स्री पुरुष न्याय मिळे इथे सारखा
राणीच्या साम्राज्यात... गुणांची होते हो कदर
जया अंगी जैसे गुण त्यास दरबारी मिळे आदर
जनहो,एकदा याच माझा राणीच्या साम्राज्याला
येता व्हाल मोहित मन तयार होईना परतायला
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "