लेखक :- प्रा.पुरुषोत्तम पटेल
मित्र,मैत्रीणींनो...नमस्कार!
मानवी जन्मानिमित्त मिळालेला हा देह आपण प्रत्येकाने सार्थकी लावलाच पाहिजे. परंतु सध्याचा परिस्थितीचा विचार करता म्हणता येईल की, जीवन कळण्याआधीच निराशेचे मळभ दाटून येत आहेत. निरोगी जीवनासाठी संतुलित आहार, योग्य व्यायाम. त्याहीपेक्षा मानसिक ताणतणावावर मात करण्यासाठी
‘ झटकून टाक जिवा
दुबळेपणा मनाचा ’, हाच आरोग्यम् धनसंपदेचा मंत्र आनंदी आणि निरामय जीवनाची गुरुकिल्ली सांगत आहे.
आयुर्वेद, योग इ.च्या माध्यमातून आणि दुसरे म्हणजे मानसिक स्वास्थ राखण्यासाठी माणसानं समाधानी आयुष्य कसं जगावं, हा विचार आपल्या संत, महात्म्यांनी पूर्वापार दिला आहे. तो अमलात आणून निरोगी मन आणि निरोगी शरीरासाठी सृदृढ आरोग्याची चळवळ पुढे नेणे तुमच्या-माझ्या प्रत्येकाच्या हाती. समर्थ रामदासांच्या
भाषेत सांगायचं तर.
" काही गलबला काही निवळ।
ऐसा काळ कंठित जावा ।।
जेणेकरिता विश्रांतीची वेळ
आपणासी फावे ॥ "
🔽भारतात तंबाखूविषयी परिस्थिती :-
🔹जगामध्ये तंबाखूचे ऊत्पादन ज्या देशात होते. त्या देशामध्ये भारत हा दुस-या क्रमांकाचा देश आहे.
🔸जगात तंबाखू उत्पादनात भारताच्या शेजारच्या देश चीन या देशाचा पहिला क्रमांक लागतो.
🔺जगात उत्पादित तंबाखुपैकी ९% तंबाखू उत्पादन भारतात होते.
🔸तंबाखू उत्पादनाचे १० टक्के शेतीक्षेत्र भारतात आहे.
🔺भारतात ४ लाख हेक्टर एवढा भेभाग तंबाखूच्या शैतीसाठी वापरात आहे.
🔸भारतात १.२ ते १.३ कोटी लोक तंबाखूशी निगडित क्षेत्रात व्यवसाय करतात.
🔺 एकट्या भारतात अंदाजे ५० ते ५१ लाख लोक हे विडी वळण्याचा उद्योगाशी निगडीत आहे. त्यात महिला व लहान मुलांचा समावेश जास्त प्रमाणात दिसून येतो.
🔹भारतात २२ लाख लोक हे तेंदुपाने तोडणे. आणि विडी उद्योग-व्यवसाय करणाऱ्या उद्योगांना विकणे. यातून ते आपली उपजिविका चालवितात.
🔺 तेंदूपाने गोळा करणे व विकणे हा व्यवसाय नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील राणीपूर जंगलात व धडगाव तालुक्यात चालतो. या व्यवसायातून ऐन उन्हाळ्यात स्थानिक आदिवासींना रोजगार मिळतो.
🔺तंबाखूमध्ये मानवी आरोग्यास घातक असणारे तंबाखूजन्य पदार्थाची नावे :-
१) गुटखा (पानमसाला) :-
या पदार्थात सुपारी चुना कात व तंबाखू यांचा वापर केला जातो. यांचे सेवन केल्याने शरीरावर होणाऱ्या हानीकारक परिणामांमुळे महाराष्ट्र राज्य सरकारने या पदार्थांच्या विक्री तसेच सेवनावर बंदी घातलेली आहे.
२) मावा :-
पानतंबाखू टपरी चालकांनी सुपारी व तंबाखू यांच्या एकत्रित मिश्रणावर चुना टाकून घोटून तयार केलेले मिश्रण म्हणजे मावा होय. यावर देखील महाराष्ट्र राज्य सरकारने बंदी घातली आहे.
३) तंबाखू मिश्रित पानविडा :-
नागवेलीच्या पानावर तंबाखू, सुपारी, चुना, कात इ. टाकून हा पानविडा बनवीला जातो.
४) मशेरी :-
तंबाखू तव्यावर भाजण्यात येऊन मशेरी बनविण्यात येते. हा प्रकार मुख्यत्वे करुन हात मेहनत करणाऱ्या श्रमजीवी महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो
५) दंतमंजन :-.
काही दंतमंजनातही तंबाखूचे घटक वापरले जातात. असे तंबाखू विशिष्ट वर्ग म्हणजेच श्रमजीवी व कठिन काबाडकष्ट करणाऱ्या वर्गात जास्त वापरण्यात येते.
६) खैंनी :-
कामाच्या ताणतणावामुळे आणि व्यावसायिक अडचणींमुळे आजकाल लोकांना मानसिक स्वास्थ मिळू शकत नाही. आजची बदललेली जीवनशैली संतांनी अपेक्षित नव्हती व मानसशास्त्राशी संताचा सूतराम परिचय नव्हता. पण, आजही त्यांनी दिलेला उपदेश आपणासाठी तारणहार आहे. ध्यानधारणा, योगाभ्यास, एकांतवास, प्रार्थना, मौन या धर्मनिरपेक्ष साधनांनी हृदयविकार, रक्तदाब व इतर रोगांवर ब-याच प्रमाणात नियंत्रण ठेवता येते. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आणि रामदास, गाडगेबाबा या संतांनीही त्या काळात मन:शांती व मनोबलाचा विचार केला होता. मग, आपण आजच्या परिस्थितीत मन:शांतीसाठी पर्यटनविहार आणि शहरापासून दूर निसर्गाच्या सहवासात शांतीमय जीवनाचा शोध घेणा-या संतविचार प्रत्येकाने का अमलात आणू नये?
मनःशांतीसाठी व्यसन.. मग ते कोणतेही असो उदा. तंबाखू, दारु, ह्यांच्यापासून निर्मित घटकांचे व्यसन मला येथे स्पष्ट करावयाचे आहे. जे मानवी जीवनासाठी घातक आहे. वैद्यकीय भाषेत त्याला Slow Poison असे वर्णिले जाते. त्यापासून दूर राहून आपण आपले जीवन, कुटुंब सुखी समाधानी आनंदी आणि सुदृढ ठेवू शकतो. सद्गुणांनी समाजात आदर्श असे ठरु शकतो. त्यासाठी आपणांत संयम असावा. हे महत्त्वाचे होय.कारण असे की, आजपर्यंत जगात जे काही बदल झाले, जे काही परिवर्तन झाले, जे काही नवीन शोध लागले, ज्या ठिकाणी क्रांती झाली ; ह्या समस्त गोष्टी मानवी विचारधारेतूनच जन्माला आल्या आहेत. सर्वाच्या मुळाशी मानवाचा दृढनिश्चय व दृढसंकल्प हेच दिसून येतात. म्हणूनच तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचा दृढनिश्चय व दृढसंकल्प करु या! पुढिल पिढीच्या आरोग्यसंपन्नतेसाठी सुदृढ माणूस जन्माला येण्यासाठी आपण हा प्रयत्न का करु नये.
आपल्या संतानी आपणास अत्यंत महत्त्वाचे उपदेश दिले आहेत. संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात,
🔹 शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी !
🔸 केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे.
🔹 निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ.
🔸 प्रयत्ने वाळूचे कण रगडिता। तेल ही गळे।।
व्यसन म्हणजे काय ?
व्यसन म्हणजे नेमके काय ? माहितीय या प्रश्नाचं उत्तर ? नाही ना ? तर मग ऐंका...!
🔹" व्यसन म्हणजे एखादी गोष्ट वारंवार करण्याची सवय ; तसेच या सवयी सोबत असणारी सशर्तता.
🔸आपण एखादी गोष्ट करतोच.. त्यावेळी बरे वाटते अशी सवय म्हणजे व्यसन.
🔸एखादी गोष्ट करण्याविना बरे वाटत नाही अशी सवय म्हणजे व्यसन.
🔹एखाद्या सवयीच्या आहारी जाणे म्हणजे व्यसन. एखादी गोष्ट केल्याविना करमत नाही, जमत नाही, ताजे - तवाने वा तरतरीतपणा जाणवत नाही म्हणजे व्यसन.
तंबाखू, गुटका, विडी-सिगारेट वा तत्सम पदार्थाचे सेवन, धुम्रपान हे सुद्धा एक व्यसनच होय.
🔸व्यसन जडलं की अनंत जन्मानंतर,भारतीय धर्मशास्त्रानुसार ८४ लक्ष जन्माचा फे-यानंतर मिळणाऱ्या मनुष्य जन्माची होणारी धुळधान..!
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जगभरात दरवर्षी सुमारे साठ लाख लोक मृत्युमुखी पडतात. आपल्या देशांत ही संख्या दहा लाखांच्या आसपास आहे. विकासाच्या प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या तंबाखूच्या व्यसनांपासून दूर राहावे, त्याचे दुष्परिणाम समाजाला समजावेत यासाठी दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळला जातो. त्यानिमित्त...
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या विविध आजारामुळे जगभरात दरवर्षी सुमारे साठ लाखांच्या आसपास लोक मृत्युमुखी पडतात. त्यापैकी आपल्या देशांत सुमारे दहा लाख लोकांना जीवाला मुकावे लागते. दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणामांबाबात जनजागृती करण्याचा हा उद्देश आहे.
दर्यावर्दी कोलंबसबरोबरच्या खलाशांनी अमेरिकेतून तंबाखूचे कलम स्पनेमध्ये आणले. तेथून ते जगभर पसरले. सुरुवातीच्या काळात तंबाखू औषधी समजली जात असे. पण सोळाव्या शतकापासून तंबाखूच्या अनिष्ट परिणामांची शंका येऊ लागली. असा तंबाखूचा काहीसा मजेशीर इतिहास आहे. पण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे अनेक विपरित परिणाम होतात हे माहिती असूनही अशा प्रकारचे व्यसन करण्याचे लोकांचे समाजातील प्रमाण वाढतच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार जगात दरवर्षी साठ लाख लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जीवाला मुकतात. त्यापैकी पन्नास लाख थेट व्यसन करीत असतात. उर्वरित दहा लाखांपैकी सहा लाख लोक पॅसिव्ह स्मोकर असतात.
तंबाखूचे व्यसन असणाऱ्या लोकांपैकी ऐंशी टक्के लोक अल्प-कमी उत्पन्न असणाऱ्या विकसनशील देशांत आहेत. साहजिकच या देशांतील रूग्णांची संख्याही जास्त आहे. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या त्या देशांच्या विकास प्रक्रियेवरही परिणाम होतो. तंबाखूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यां व्यक्तिमुळे त्या देशांना उत्पादक मनुष्यबळाला मुकावे लागते. अनेक कुटुंबे उघड्यावर पडतात. त्यांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न उपस्थित होतो. तंबाखूचे व्यसन राष्ट्रविकासातील अडथळा आहे.
तंबाखूच्या व्यसनाच्या विविध पद्धती आहेत. तंबाखू चुन्याबरोबर मळून खाल्ली जाते तेव्हा ती गुटखा म्हणून ओळखली जाते. पानात सुपारी, कात यांच्यासह मिश्रण करून तंबाखूचाही समावेश करतात. गुटखा खाणे, धूम्रपान करणे, तपकिरीच्या रूपाने तंबाखू श्वसनमार्गे ओढतात. तंबाखू जाळून त्याची मिशरी करून दातांना आणि हिरड्यांना लावली जाते. यापैकी धूम्रपान, तंबाखू खाणे आणि गुटखा खाणे यातून तंबाखूचे सेवन आधिक प्रमाणात केले जाते. गुटखा खाणे ही तर सध्या तरूणांतील वाढते आणि चिंता निर्माण करणारे व्यसन आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने अलिकडेच गुटखाबंदीचा निर्णय घेऊन अतिशय चांगले आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे. पण त्याची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित आहेच. त्याचबरोबर इतर राज्यांनीही असा निर्णय घेणे अपेक्षित आहे.
तंबाखूचे थेट व्यसन न करणाऱ्या लोकांनाही आता तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांना सामोरे जाव लागत आहे. तंबाखूचे व्यसन करणाऱ्या लोकांच्या संपर्कात किंवा व्यसनी लोक जेथे बहुसंख्येने असतात, अशा ठिकाणी सततच्या वावरामुळेही या आजारांना सामोरे जावे लागते. अशा रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तंबाखूच्या धुरात सुमारे चार हजार प्रकारचे रसायने असतात. त्यापैकी २५० रसायने मानवी शरीराला हानीकारक आहेत तर पन्नास रसायनांमुळे हमखास कर्करोग होतो. सिगरेट किंवा विडीच्या धुरात कार्बन मोनाक्साईड, टोल्युन, अमोनिया, आर्सेनिक, कॅडमिअम, हायड्रोजन सायनाईड अशी घातक रसायने असतात.
भूक न लागणे, आतड्याची कार्यक्षमता मंदावणे, श्वसन नलिका आणि पोटात व्रण होणे, फुफ्फुस आणि श्वसन संस्थेचे वारंवार आजार होणे, रक्तदाब वाढणे, ह्रदय आणि इतर महत्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होणे.इत्यादि समस्या उद्भवतात. प्रदीर्घ धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. महिलांच्या बाबतीत गर्भात विकृ्ती निर्माण होणे, कमी वजनाचे बालक जन्माला येणे, गर्भपात होणे, मृत बालकाचा जन्म होणे आदी बाबी घडू शकतात. तंबाखूबरोबर चुना मिसळून खाल्ला जात असल्याने तोंडातील नाजूक त्वचेला व्रण पडून कर्करोग होऊ शकतो. गुटख्यातील तंबाखू किंवा तंबाखूच्या अर्कामुळे तोंडातील त्वचेवर दुष्परिणाम होतात. गुटख्याचे अतिसेवन करणाऱ्यांना काही दिवसांनी तोंड उघडणेही अशक्य होते.
(माझ्या एका शेजा-याला तोंडाचा आऽऽ करणे शक्यच होत नाही.तसेच एक शिक्षक असून त्यालाही आऽऽ करणे शक्य होत नाही.आणि अनेकदा समजूत घालूनही त्यांचे हे व्यसन सुटत नाही.)
तंबाखूचे व्यसन लागू नये यासाठी आणि लागले असल्यास सोडविण्यासाठी व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. मात्र तंबाखूचं व्यसन सोडण्यासाठी व्यसन करणा-या व्यक्तीचीच इच्छाशक्ती प्रबळ असणे आवश्यक असते. तंबाखूमधील निकोटीनमुळे धूम्रपान सोडणाऱ्या व्यक्तिंना अस्वस्थ वाटू लागते. पण हे व्यसन सोडणे शक्य आहे. धूम्रपान सोडणाऱ्या व्यक्तिंनी अस्वस्थ वाटू लागल्यास पाणी पिणे, पेपरमिंटची गोळी खाणे, शतपावली करणे असे करावे. जेणेकरून धूम्रपानाची आस नष्ट होईल. नवी जीवनशैली आत्मसात करणे, वैद्यकीय उपचारांचा उपयोग करणे, व्यसनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी स्वतः जवळ, घरी, कार्यालयात न ठेवणे. असे विविध उपाय करून व्यसनापासून दूर राहता येईल. तंबाखूच्या किंवा कोणत्याही व्यसनापासून समाज मुक्त होण्यासाठी प्रभावी लोकचळवळ उभी राहण्याची देखील आवश्यकता आहे!
महत्वाचे ठळक मुद्दे '-
• तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी जगभरात सुमारे साठ लाख लोक मृत्युमुखी पडतात.
• भारतात दरवर्षी सुमारे दहा लाख लोक जीवाला मुकतात
• तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करण्यात तरूणांची वाढती संख्या चिंताजनक आहे.
• तंबाखूच्या धुरात कार्बन मोनाक्साईड, टोल्युन, अमोनिया, आर्सेनिक, कॅडमिअम, हायड्रोजन सायनाईड अशी घातक रसायने आढळून येतात.
• थेट व्यसन न करताही ( पॅसिव्ह स्मोकर) तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांना बळी पडणाऱ्यांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ दिसून येत आहे.
• तंबाखूचे व्यसन करणाऱ्या लोकांची संख्या विकसनशील देशांत जास्त. त्याचा विकासावर परिणाम होतो
🔽तंबाखू व धुम्रपानामुळे कमी वयात चेहऱ्यावर येतात सुरकुत्या :-
अनेकजण डोळ्यांखाली आणि कपाळावर येत असलेल्या सुरकुत्यांनी त्रस्त आहे. वाढत्या वयाचे हे सामान्य लक्षण मानले जाते. परंतु हे लक्षण कमी वयातही दिसू लागले आहे. यामुळे सौंदर्यात बाधा आणणाऱ्या या समस्येचे कारण जाणून घेऊ...
🔽धुम्रपान :-
धुम्रपान केल्याने त्वचेचे रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत नाही. यामुळे पेशी खराब होतात.
तंबाखूमुळे कँसर (कर्करोग) होऊ शकतो
तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा, पोटाचा, किडनीचा, किंवा मूत्राशयाचा इत्यादि कँन्सर (कर्करोग) होऊ शकतात.
तथ्य :-
भारतात तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा कँन्सर (कर्करोग) असलेल्या रूग्णांची संख्या सर्वांत मोठी आहे.
भारतात, ५५.४ % स्त्रियांना आणि ४४.६ % पुरुषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे.
९०% पेक्षा जास्त फुफ्फुसाचा कॅन्सर आणि इतर कँन्सर होण्याचे कारण धूम्रपान आहे.
🔺तंबाखूमुळे ह्दय आणि रक्त वाहिन्यांचे विकार
तंबाखूमुळे ह्दय आणि रक्त वाहिन्यांचे विकार, हृदयरोग,, छातीत दुखणे, हदयविकाराच्या झटक्यामुळे अचानक मरण येणे, स्ट्रोक (मेंदूचा विकार), परिधीय संवहनी रोग (पायाचा गैंग्रीन) हे रोग होतात.
तथ्य :-
🔸भारतात ८2 % फुफ्फुसाच्या दीर्घकालीन रोगांचे कारण धूम्रपान हे आहे.
🔸तंबाखू हे क्षयरोग होण्याचे अप्रत्यक्ष कारण आहे. कधी-कधी धूम्रपान करणा-यांमध्ये देखील टीबी, ३ पट अधिक आढळतो. सिगरेट किंवा बीड़ीचे धूम्रपान, जितके अधिक, तितके अधिक टीबीचे प्रचलन वाढू शकते.
🔸धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन अचानक रक्तदाब वाढविते आणि हदयाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करते.
ह्यामुळे पायाकडे होणा-या रक्तप्रवाहात देखील कमतरता येते आणि पायात गैंग्रीन होऊ शकते.
🔸तंबाखू संपूर्ण शरीराच्या धमन्यांच्या पापुद्र्याला नुकसान पोहचवते.
🔸मुलांच्या आरोग्यावर धूम्रपानाचा वाईट परिणाम होतो आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांना देखील धूम्रपानाच्या धुराने त्रास होतो.
🔸धूम्रपान न करणारी व्यक्ती दोन पाकिट रोज धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीबरोबर राहिल्यास, धुम्रपान न करणा-या व्यक्तिला रोज ३ पाकिट धूम्रपान करणा-या इतकाच त्रास होतो, हे लघवीच्या निकोटिनच्या पातळीचा अभ्यास करता आढळून आले.
🔽तंबाखू किंवा धूम्रपानामुळे मधुमेह होण्याची शक्यता जास्त बळावते.
🔽तंबाखू मुळे रक्तातील चांगले कोलॅस्ट्राँलचे प्रमाण कमी होते.
🔽धूम्रपान करणारे/तंबाखू सेवन करणारे यांच्यात, धूम्रपान न करणा-यांच्या तुलनेत हृदय रोग व पक्षाघात होण्याचा धोका २ ते ३ पट अधिक वाढतो.
🔽तंबाखूमुळे दर आठ सेकंदाला ' एक ' मृत्यु घडतो.
🔽भारतात, तंबाखू संबंधित मृत्युची एकूण संख्या दर वर्षी ८००००० ते ९००००० इतकी असेल.
🔽तंबाखूपासून दूर राहिल्यास एक किशोर/किशोरीचा जीवनकाळ २०वर्षाने वाढू शकेल.
🔽तंबाखूचा वापर करणारे किशोर/किशोरी अंततः या वरील कारणांनी मृत्युमुखी पडतील.(जवळजवळ एक चतुर्थांश मध्य आयुष्यात किंवा एक चतुर्थांश म्हातारपणात)
🔽भारतात इतर देशांच्या मानाने तंबाखूमुळे मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचा अंदाज आहे.
🔽धूम्रपान / तंबाखूमुळे स्त्री व पुरुषांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात.याचे सेवन पुरुषांमध्ये नपुंसकतेचे कारण आहे
🔽धूम्रपान / तंबाखूचे सेवन स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करते व रजोनिवृत्ति लवकर होते.
🔽धूम्रपान / तंबाखूचे सेवन शारीरिक ताकद कमी करते आणि त्यामुळे सहनशीलता ढासळते.
🔽ज्या स्त्रिया धूम्रपान करतात आणि गर्भनिरोधके घेतात त्यांच्यात स्ट्रोकचा धोका वाढतो.
🔽ज्या गरोदर स्त्रिया, धूम्रपान करतात, त्यांच्यात गर्भपाताची शक्यता वाढते, किंवा मूल कमी वजनाचे होते, किंवा बाळाच्या विकासात्मक समस्या वाढतात, किंवा बाळाचा अचानक मृत्यु देखील ओढवू शकतो. (अचानकपणे झालेला अनाकलित मृत्यु)
🔺तंबाखू सोडण्याचे फायदे :-
तंबाखू सोडण्याचे काही शारीरिक तसेच सामाजिक फायदे आहेत. ते पुढीलप्रमाणे : -
अ) शारीरिक फायदे
🔽तुमच्यातील कँसर वा हदयरोग होण्याचे धोके कमी होतात.
🔽हदयावर येणारा दाब कमी होतो.
🔽तुमच्या धूम्रपान करताना सोडलेल्या धुराचा त्रास तुमच्या आपल्यांवर होणार नाही.
🔽तुम्हाला धूम्रपानामुळे होणारा खोकला (सारखा होणारा खोकला व कफ) नाहीसा होईल.
🔽तुमचे दात स्वच्छ व शुभ्र होतील.
ब) सामाजिक फायदे :-
🔽तुम्ही स्वतः नियंत्रक व्हाल, सिगारेट तुमच्यावर नियंत्रण ठेवणार नाही.
🔽तुमची आत्मशक्ती तथा आत्मविश्वास वाढेल.
🔽आज व या नंतर भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक निरोगी पालक (पिता/माता) बनाल.
🔽तुमच्याकडे इतर गोष्टींवर खर्च करण्यासाठी पैसा असेल.
🔽धूम्रपान सोडण्यासाठी कधी ही उशीर झालेला नसतो
🔽धूम्रपान/तंबाखू सोडणे वा थांबवणे हे वयाच्या मध्यान्हात कर्करोग होण्यापूर्वी देखील होवू शकते किंवा तंबाखूमुळे इतर भयंकर रोग बळावण्या आधी, जेणेकरुन भविष्यातली मरणाची भीती नाहीशी होईल.
🔽किशोर अवस्थेत सोडल्यास त्याचे फायदे जास्त पहायला मिळतात.
🔽तुम्ही एकदा का तंबाखूचे सेवन थांबवले की हदयविकाराचा धोका ३ वर्षात तंबाखूचे सेवन न करणा-यासारखा सामान्य होतो.
क) धूम्रपान/तंबाखू सोडण्यासाठी युक्त्या :-
🔽ऐशट्रे, सिगरेटी, पान, ज़र्दा लपवून ठेवा, जे नजरेसमोर नसते ते आठवत पण नाही. हा एक सोपा, परंतु सहाय्यक उपाय आहे.
🔽सिगरेटी, पान आणि ज़र्दा लवकर मिळतील अशा ठेवू नका. सिगरेटी, पान आणि ज़र्दा अशा जागी ठेवा जेथून तुम्हाला काढणे वा सापडणे अवघड पडेल. उदाहणार्थ, दुस-या खोलीत, किंवा तुम्ही नेहमी जात नाही अशा जागी, कुलुपाच्या कपाटात इ.
🔽धूम्रपान करण्यासाठी प्रेरीत करणा-या कारणांना ओळखा किंवा त्या ऐवजी पान खा / जर्दा खा आणि दुसरे उपाय शोधा.
🔽तुमचा ग्रुप किंवा गट, सिगरेटी, पान, ज़र्दा खातो कां ? असे असल्यास पहिल्यांदा त्यांना टाळायचा प्रयत्न करा. किंवा ते जेव्हा, सिगरेटी, पान, ज़र्दा खात असतील तेव्हा त्यांच्या पासून दूर व्हा.
🔽तोंडात चॉकलेट, पेपरमिंट, लॉज़ेंजेस ठेवण्याचा प्रयत्न करा व दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा.
🔽जेव्हा तल्लफ येईल तेव्हा, उभ्याने किंवा बसलेल्या अवस्थेत दीर्घ श्वास घ्या. एक पेला पाणी प्या आणि व्यायामाने देखील तल्लफ घालवण्यास मदत होते.
🔽जेव्हा तंबाखू सेवनाची तल्लफ येईल तेव्हा, तुमच्या मुलांबद्दल आणि त्यांच्या भवितव्याबद्दल विचार करा व तुमच्यावर तंबाखूमुळे होणा-या भयंकर रोगांचा विचार करा.
🔽सेवन थांबवण्याची एक वार वा दिनांक किंवा प्रिय व्यक्तिंचा वाढदिवस (उदा. आई, वडील आजी आजोबा भाऊ बहिण मुलगा मुलगी गुरुजन यांपैकी एक) ठरवा.
🔽तंबाखू किंवा विडी सिगारेटचे व्यसन सोडवण्यासाठी एखादा सण,उत्सव किंवा नववर्षारंभानिमित्त संकल्प करा.
🔽मदतनीसाची मदत घ्या.
🔽तुमचे वेळा-पत्रक सिगरेट, पान, ज़र्दा सोडून आखा.
🔽जेव्हा तुम्हाला धूम्रपान/तंबाखूची तल्लफ लागेल तेव्हा ४ गोष्टी लक्षात ठेवा.
१. काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न करा २. दोन सिगरेट पिण्यामध्ये विलम्ब करा
३. दीर्घ श्वास घ्या. ४. पाणी प्या
🔸स्वतःविषयी सकारात्मक बोला
🔹स्वतःला पुरस्कृत करा.
🔸दररोज आरामाच्या तंत्रांचा वापर करा जसे (योग, चालणे, ध्यानधारणा, नृत्य, संगीत इत्यादी).
🔹कॅफीन आणि अल्कोहलचे सेवन सीमित करा.
🔸या व्यतिरिक्त, सक्रिय बना आणि पोषक आहार घ्या.
धूम्रपान म्हणजे काय ?
सर्वसाधारणपणे धुम्रपान करण्याचा सरळ सरळ अर्थ धूर ओढणे असा होतो. सध्या धुम्रपान करण्यासाठी तंबाकू, अफिम आणि इतर नशा देणाऱ्या पदार्थानाचा वापर केला जातो. आज धुम्रपान करण्यासाठी सिगारेट, चिलीम (गांजा), बिडी, पाईप, हुक्का या पद्धतीचा वापर केला जातो.
इतिहासात डोकावून बघितले तर धुम्रपान करण्याचा इतिहास हा इ.पू ५००० वर्षापासून आहे. त्याकाळी धार्मिक कार्य करण्यासाठी करण्यासाठी तंबाखू आणि इतर नशा देणाऱ्या पदार्थांचे धुम्रपान हे समाधी मध्ये जाण्यासाठी केले जाई.
२००७ च्या रिपोर्टनुसार जगभरात दरवर्षी ४९ लाख लोक धूम्रपानाने आजारी पडून मरतात. जगात १. १ बिलिअन लोक धुम्रपान करतात.
हे कधी फॅशन, कधी मज्जा, कधी टेन्शन आहे म्हणून तर कधी मित्रांसोबत अनेक जन धुम्रपान करत असतात. धुम्रपान केल्याने त्या व्यक्तीस थोडेसे उत्तेजित किंवा आनंदी झाल्यासारखे वाटते. याचामागील शास्त्रीय कारण असे की तंबाखू मधील निकोटीन हा पदार्थ आपल्या शरीरातील डोपामिन वाढवतो यामुळे धुम्रपान करणारी व्यक्ती आनंदी आणि उत्साही होते.
🔽एक स्मोकर रोज किती सिगरेट पितो ?
◽देशपरत्वे माहिती :-
🔽इंडोनेशिया- २९.२ सिगेरट
🔽चीन- २४.१ सिगरेट
🔽तुर्कस्तान- २३. ८सिगरेट
🔽बांग्लादेश- २०.९ सिगरेट
🔽अर्जेंटीना - १७.१ सिगरेट
🔽अमेरिका- १३.७ सिगरेट.
🔽पाकिस्तान- ११.५ सिगरेट
🔽भारत- १०.७ सिगरेट
🔽कतार- ९.५ सिगरेट 🔽पनामा- २.८ सिगरेट
🔹भारतातील स्थिति :-
🔺६.१ सिगरेट एक पुरुष स्मोकर रोज पीतो.
🔻 ७ सिगरेट एक महिला स्मोकर रोज पीते.
🔺 १०.७ सिगरेट रोज एक स्मोकर पीतो.
🔽डोपामिन म्हणजे काय ?
डोपामिन हे आपल्या शरीरात अस्तित्वात असतेच. डोपामिन हे plessure nurotransmitor आहे. जे आपल्या चेतारज्जू द्वारा मेंदूपर्यंत सिग्नल पोहचवते. हा संदेश मुळतः आनंदाशी निगडीत असतो. अति धुम्रपान करणारी व्यक्ती शरीरात डोपामिन रिलीज करण्यासाठी स्वतः ला व्यसन लावून घेते ज्यामुळे धुम्रपान करण्याची इच्छा होते.
'
🔽सिगारेट ओढण्याचा प्रजनन शक्तीवर होणारा परिणाम :-
अनेक संशोधनातून पुढे आलंय की सिगारेट ओढण्या-या महिलेच्या प्रजनन शक्तीवर परिणाम होतो. प्रजनन करण्याची क्षमता कमी होते. किंवा प्रजनन करण्यासाठी खूप वेळ लागण्याची शक्यता असते. एखादी महिला आणि पुरुष दोघंही सिगारेट ओढत असतील तर त्याचा खूप जास्त परिणाम होतो. पण,पतीने किंवा दुसऱ्या व्यक्तीने ओढलेल्या सिगारेटचा धूर (पॅसिव्ह स्मोकिंग)
स्रिच्या शरीरात गेल्यानेही प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
संशोधनातून समोर आलंय की सिगारेट ओढण्याचा परिणाम महिलेच्या अंडाशयावर होतो. एखादी महिला किती काळ आणि किती सिगारेट ओढते यावर होणारा परिणाम कमी-जास्त असतो. सिगारेट ओढल्यामुळे महिलेच्या शरीरातील अंडी कमी होतात आणि रजोनिवृत्ती लवकर येण्याची शक्यता वाढते.
सिगारेटमध्ये असलेल्या घटकांचा परिणाम महिलेच्या अंडाशयातील पेशींवर होतो. सिगारेटमुळे अचानक गर्भपात होण्याची शक्यता असते. ज्या महिला गर्भारपणात सिगारेट ओढतात अशा महिलांचं जन्माला येणारं बाळ कमी वजनाचं किंवा प्रिमॅच्युअर म्हणजेच वेळे आधी जन्माला येण्याची शक्यता असते. एवढंच नाही तर ज्या घरात सिगारेट ओढणारी व्यक्ती असेल, अशा महिलांच्या प्रसूतीवेळी अचानक बाळांचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
अ) सिगारेट ओढण्याचा आयव्हीएफ पद्धतीवर होणारा परिणाम
सिगारेट न ओढणाऱ्या महिलांपेक्षा सिगारेट ओढणाऱ्या महिलांना दुप्पट आयव्हीएफ पद्धतीने गर्भधारणेसाठी प्रयत्न करावे लागतात. ज्या महिलांचं वय जास्त असतं अशा महिलांमध्ये सिगारेटचे दुष्परिणाम पहायला मिळतात.
ब) सिगारेटचा पुरुषांच्या प्रजननशक्तीवर होणारा परिणाम :-
जे पुरुष सिगारेट ओढतात त्यांच्या शरीरातील शुक्राणूंची संख्या कमी असते. शुक्राणूंच्या मृत्यूचं प्रमाण जास्त असतं आणि शुक्राणू योग्य आकारात नसतात. सिगारेटचा पुरुषांवर होणाऱ्या परिणामाबाबत अजूनही संशोधन सुरू आहे. पण, पुरुषांनी सिगारेट ओढल्यामुळे महिलेच्या शरीरात धुर जाऊन महिलेवर याचा वाईट परिणाम होतो.
क) सिगारेट बंद केल्याचे सुपरिणाम :-
आयव्हीएफ पद्धतीने गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्याअगोदर दोन महिने सिगारेट ओढली नाही तर गर्भधारणेची शक्यता वाढते. दीर्घकाळ सिगारेट ओढल्याने महिलांच्या अंडाशयावर खूप जास्त प्रमाणात परिणाम होतो.
ज्या पती-पत्नीला मूल होत नाहीये किंवा ज्या महिलेचं मिसकॅरेज झालंय. अशा पती-पत्नीने सिगारेटच्या व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. सिगारेटचं व्यसन सोडल्यामुळे नैसर्गिक गर्भधारणेची क्षमता वाढते आणि आयव्हीएफ पद्धतीने होणाऱ्या गर्भधारणेचीही शक्यता चांगली असते.
संशोधनातून समोर आलंय की सिगारेट ओढण्याचा परिणाम महिलेच्या अंडाशयावर होतो. एखादी महिला किती काळ आणि किती सिगारेट ओढते यावर होणारा परिणाम कमी-जास्त असतो. सिगारेट ओढल्यामुळे महिलेच्या शरीरातील अंडी कमी होतात आणि रजोनिवृत्ती लवकर येण्याची शक्यता वाढते.
🔽धुम्रपान केल्यामुळे काय होते ?
जेव्हा एखादी व्यक्ती धुम्रपान करते त्यावेळेस धूर फुफ्फुसामध्ये पोहचतो. फुफ्फुसामधून तंबाखू मधील घातक घटक रक्तामध्ये शोसले जातात. रक्तामधून संपूर्ण शरीरात ते पसरतात. यात टार, निकोटीन, कार्बन मोनाँक्साईड याबरोबर ४० घातक रसायने.
धुम्रपानामुळे कित्येकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. या धूम्रपानाचा गंभीर परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होत असतो. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्या लोकांना फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका प्रचंड आहे. आज जगातील एकूण फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांना कॅन्सर हा धुम्रपानामुळे झालेला आहे.
धुम्रपान करणे हानिकारक आहे हे तुम्हाला माहितच असेल.पण धूम्रपान करणे शरीरासाठी का हानिकारक आहे हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली १० कारणे अवश्य वाचा.कारण धूम्रपानामुळे केवळ निरनिराळे आजार होतात असे नाही तर तुम्हाला मृत्यु देखील येऊ शकतो.तसेच धुम्रपानाची सवय सोडल्यानंतर पुढील २० मिनिटंं ते वर्षभराच्या काळात शरीरात होतात हे बदल ! देखील जरुर वाचा.
जाणून घ्या धूम्रपान टाळण्याची १० कारणे -
१.धूम्रपानामुळे कर्करोग होऊ शकतो-
तुम्हा सर्वांना धूम्रपानामुळे कर्करोग होऊ शकतो हे नक्कीच माहित असेल तर पण तुम्हाला जर असे वाटत असेल की धूम्रपानामुळे केवळ फुफ्फुसांचा कर्करोग होतो तर हे पुर्ण सत्य नाही.कारण धूम्रपानामुळे नाक,तोंड,स्वरयंत्र,श्वासनलिका,अन्ननलिका,पोट,स्वादूपिंड,मूत्रपिंड,मूत्राशय,गर्भाशय,अस्थीमज्जा व रक्त या अवयवांचा कर्करोग होऊ शकतो.जर तुम्ही असे कसे घडू शकते याचा विचार करीत असाल ? तर लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही सिगारेट ओढता तेव्हा सिगारेट पेटवल्यापासून ती ओढून धूर तोंडाबाहेर काढेपर्यत तुमच्या संपूर्ण शरीरावर या प्रक्रियेचा दुष्परिणाम होत असतो.सिगारेट मध्ये ४१००० केमिकल्स असतात त्यापैकी Carcinogenic चे प्रमाण अधिक असून त्यामुळे कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते.धुरासह या केमिकलमुळे अनियंत्रित प्रमाणात शरीरातील पेशींमध्ये परिवर्तन होते ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.तसेच तोंडाचे आरोग्य जपताना ही काळजी न घेतल्यास वाढेल कॅन्सरचा धोका ! देखील जरुर वाचा.
२.धूम्रपानामुळे अकाली वृद्धत्व व सुरकुत्या येतात-
आपण वृद्धत्वावर मात करण्यासाठी अनेक सौदर्यप्रसाधने वापरतो .कधीकधी तर यासाठी काहीजण शस्त्रक्रिया देखील करुन घेतात.पण तुम्हाला हे माहित आहे का? धूम्रपान सोडल्यामुळे तुमची वृद्धत्वाची लक्षणे मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात.कारण धूम्रपानामुळे तुम्हाला फाइन लाइन्स,एज स्पॉट्स येतात,डोळे सूजतात व त्वचा कोरडी,निस्तेज व निर्जीव दिसू लागते.असे घडते कारण सिगारेटमधील केमिकल्समुळे तुमच्या त्वचेखालील Fine capillaries रक्तपुरवठ्या अभावी संकुचित व आकुंचित होतात.अपु-या रक्त व ऑक्सिजनच्या पुरवठयामुळे तुमची त्वचा कोरडी व निस्तेज होते.तसेच Elastin व Collagen या कनेक्टिव्ह फायबर्सचे नुकसान झाल्यामुळे चेह-यावर फाइन लाइन व सुरकुत्या येतात.
३.ह्रदय कमजोर झाल्यामुळे तुम्हाला हार्टअटॅक व स्ट्रोकचा धोका असू शकतो-
सीडीसी (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल) नूसार धुम्रपान न करणा-या लोकांपेक्षा धूम्रपान करणा-या लोकांना Coronary artery disease होण्याचा दुप्पट ते चौपट धोका असतो.तसेच धूम्रपान करणा-या लोकांना फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका पंचविसपट अधिक असतो.कारण सिगारेटच्या धूरामध्ये असणारी केमिकल्स तुमच्या शरीरातील रक्ताची संपूर्ण रचनाच प्रभावित करतात.या केमिकल्समुळे तुमचे रक्त घट्ट होऊन त्याचा गुठळ्या होण्याची अधिक शक्यता असते.तसेच यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित होऊन रक्तदाब वाढतो(त्यामुळे तुमचा रक्तदाब वाढतो).त्यामुळे अशा रुग्णांना कार्डिओव्हॅस्क्युलर व ह्रदय विकार वाढण्याची शक्यता अधिक असते.
४.फुफ्फुसांचा स्टॅमिना व क्षमता कमी होते-
सिगारेटमध्ये अनेक केमिकल्स असतात.ते आपण वरतीच वाचन केले आहे. जी सिगारेट ओढल्यामुळे तुमच्या फुफ्फुसे,श्वसनमार्ग व शरीरामध्ये राहतात.या केमिकल्सच्या अवशेषांमुळे तुमच्या फुफ्फुसांच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होऊन श्वाच्छोश्वासाच्या समस्या व फुफ्फुसांच्या कार्यात बिघाड निर्माण होतो.त्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक अवयवांना रक्त व ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.ज्यामुळे तुम्हाला थकवा येऊन धाप लागते.काही संशोधनात असे आढळले आहे की धूम्रपानामुळे COPD (Chronic Obstructive Pulmonary Disease),Emphysema, Chronic bronchitis,न्युमोनिया,लंग इनफेक्शन,अस्थमा व टीबी (Tuberculosis) होऊ शकतो.तसेच यासाठी जाणून घ्या फुफ्फुसाच्या कॅन्सरची आठ लक्षणं.
५.धूम्रपानामुळे लवकर वीर्य उत्सर्ग (Premature Ejaculation) होतो :-
वृद्ध पुरुषामध्ये आढळणारी वीर्य उत्सर्ग(Premature Ejaculation) ही समस्या धूम्रपान करणा-या तरुण पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.याचे प्रमुख कारण रक्तप्रवाहाचा अभाव,शिश्नामध्ये(पेनीस) असलेली असंवेदनशीलता व स्टॅमिना कमी असणे ही असू शकतात.या सर्व बाबींमुळे अशा पुरुषांची प्रजनन व्यवस्था अकार्यक्षम होते व लवकर वीर्य उत्सर्ग होतो.University of Arizona मध्ये केलेल्या एका संशोधनात असे आढळले आहे की, धूम्रपान केल्याने पुरुषांच्या लैगिंक इच्छा,स्टॅमिना व संपूर्ण सेक्सलाईफवर थेट परिणाम होतो.तर University of Kentucky मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात असे आढळले आहे की, धूम्रपान न करणा-या लोकांपेक्षा धूम्रपान करणा-या लोकांना वयाच्या २० ते ३० या वयातच सेक्स करण्याची इच्छा कमी प्रमाणात निर्माण होते.
६.धूम्रपानामुळे Erectile dysfunction(लिंगाची ताठरता न टिकणे ) ही समस्या निर्माण होते-
जर तुम्हाला उशीरापर्यंत इरेक्शन रोखणे कठीण जात असेल तर ही समस्या तुमच्या धूम्रपानामुळे निर्माण झालेली आहे.NHS द्वारा प्रकाशित करण्यात आलेल्या एका पेपरमध्ये धूम्रपान व Erectile dysfunction चा जवळचा सबंध आढळून आला आहे.धूम्रपानामध्ये असलेल्या केमिकल्समुळे पुरुषांच्या शिश्नामधील (पेनीस) रक्तवाहिन्यांमध्ये बदल घडून अडथळे निर्माण होतात ज्यामुळे त्यांच्या या अवयवाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही.तसेच निकोटीन मुळे शिश्नाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम होतो.त्यामुळे इरेक्शन रोखून धरणे कठीण जाते.
७.धूम्रपानामुळे हाडे ठिसूळ होतात-
अनेक संशोधनामध्ये असे आढळले आहे की धुम्रपानामुळे हाडांमधील कॅलशियम कमी झाल्यामुळे हाडांची घनता कमी होते.हाडांची घनता कमी झाल्यामुळे Osteroporosis ही समस्या निर्माण होते.(धूम्रपानामुळे विशेषत: महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजनच्या प्रमाणावर प्रभाव पडतो. ) जबड्यामधील हाडांची घनता कमी झाल्यामुळे सांधेदुखी व दात लवकरच पडण्याची आणि तोंडाचे दाताविना विद्रुप दिसण्याची समस्या निर्माण होते.या शिवाय सतत फॅक्चर किंवा दुखापत होण्याची देखील शक्यता अधिक असते.
८.धूम्रपानामुळे दातांवर डाग पडतात-
सिगारेटमधील Tar या केमिकल घटकामुळे तुमच्या दातांवर पिवळा थर जमा होतो.हा थर ब्रश करुन कमी होत नसल्याने धूम्रपान करणा-या लोकांच्या दातांवर कायमस्वरुपी डाग पडतात.त्याचप्रमाणे या व्यसनामुळे तुमच्या तोंडातील चांगले बॅक्टेरिया मरुन जातात,लाळेचे प्रमाण वाढते. व तुमच्या दातांवर टार्टर वाढू लागतात.
९.धूम्रपानामुळे तोंडाला दुर्गंधी येते-
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या तोंडातून सतत दुर्गंधी बाहेर पडते.अगदी जवळ येऊन अशा लोकांशी गप्पा करणे म्हणजे एक मोठी समस्याच! त्यापेक्षा अशा लोकांना समजदार माणसे टाळणे पसंद करतात. चार हात दूरच राहून प्रसंगी बोलणे करतात. तोंडाला धूम्रपानाचा वासच येत नाही तर सतत एक प्रकाराचा तीव्र दुर्गंध येऊ लागतो.धूम्रपानामुळे तोंडातील चांगले बॅक्टेरिया तर मारले जातातच पण त्याचसोबत अशा लोकांना पचनसमस्या,घशाचे इनफेक्शन,तोंडाच्या इतर समस्या निर्माण होतात.यासाठी तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी धुम्रपान जरुर टाळा.
१०.धूम्रपानामुळे तुम्हाला अंधत्व येऊ शकते-
धूम्रपानामुळे फक्त तुमच्या फुफ्फुसांवरच नाही तर तुमच्या दृष्टीवर देखील परिणाम होतो.सीडीसी (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल) नूसार धूम्रपानामुळे मोतिबिंदू,ऑप्टिक नर्व्हज चे नुकसान होणे. व त्याचा परिणाम पूर्ण अंधत्व येऊ शकते.
🔺धूम्रपान का टाळावे :-
धुम्रपान हे मानवी शरीरावर घातक परिणाम करते ते कसे ते पाहू.
अ) धुम्रपानातील घातक घटक :--
🔽टार :- धुम्रपान करतांना तंबाखूमध्ये टार नावाचा घटक आढळतो. हा घटक धुरासोबत मिसळून आपल्या फुफ्फुसावर गंभीर परिणाम करतो.
🔽निकोटीन :- निकोटीन याच रसायनामुळे सतत धूम्रपान करण्याच व्यसन लागतं. कारण निकोटीन हे रसायन व्यसन लावणारं रसायन म्हणून ओळखल जातं.
🔽बेन्झीन :- या घटकामुळे सिगारेट सतत पेटलेली राहण्यास मदत होते. यामुळे ब्लड कॅन्सर होण्याचा धोका असतो.
🔽अमोनिया :– टॅायलेट क्लीनर आणि ड्रायक्लिनिंग लिक्विड मध्ये वापरला जाणारा अमोनिया तंबाखूमधून निकोटीनला वेगळा करून त्याचा धूर बनवतो.
🔽ॲसीटोन :– हे रसायन श्वासामार्फत फुफ्फुसात जाऊन टीबी, न्युमोनिया, दमा यांस कारणीभूत ठरते. त्यामुळे शक्यतो प्रत्येकाने या रसायनापासून लांबच राहायला हवे.
🔽कार्बन मोनाँक्साईड :- रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.
ब) धूम्रपानाचे दुष्परिणाम :-
🔽अकाली वृद्धत्व-
🔽 धुम्रपान करण्यामुळे आपले आयुष्य कमी होते.
🔽धूम्रपानाचा गंभीर परिणाम हा आपल्या फुफ्फुसांवर होत असतो त्यामुळे धुम्रपानामुळे ९० टक्के लंग्ज कॅन्सर चे रुग्ण निर्माण होतात.
🔽धुम्रपानामुळे फुफ्फुसांचे अनेक गंभीर आजार निर्माण होतात. त्यात श्वसनसंस्थेचे आजार होतात.
🔽उच्च रक्तदाब तसेच शरीरातील रक्तप्रवाह कमी जास्त हे त्रास व्हायला लागतात.
🔽हार्ट ॲटॅक तसेच हृदयरोग उत्पन्न होतात.
🔽धुम्रपानामुळे नपुंसकता निर्माण होते.
🔽धुम्रपानामुळे आपली त्वचा काळवंडते, रुक्ष होते, त्वचेचे तेज कमी व्हायला लागते.
🔽त्वचेवर सुरकुत्या पडतात, म्हातारपण लवकर येते.
🔽तोंडाचे अनेक रोग उद्भवतात. मुखाचा कॅन्सर, अल्सर यासारखे आजार उद्भवतात.
🔽धुम्रपानामुळे पक्षाघाताचा धोका निर्माण होतो.
🔽डोळ्यांची दृष्टी कमजोर होणे, मोतीबिंदू तसेच डोळ्यांचे विकार उद्भवतात.
🔽धुम्रपानामुळे पचन संस्थेचे विकार उद्भवतात.
🔽सततच्या धुम्रपानामुळे प्रजनन संस्थेवर विपरीत परीणाम उद्भवतात.
क) धुम्रपान कसे सोडवाल ?
आयुष्यात कुठलीही गोष्ट परत परत केली की तिची सवय होते आणि सवयीच रुपांतर व्यसनात होतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीच व्यसनात रुपांतर होण्याआधी सावधान!या सगळ्या गोष्टी सोडवणे अत्यंत कठीण असतं पण अशक्य मात्र नसते. चला पाहूया धुम्रपान हे व्यसन कसे सोडवावे .
🔽सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेली सूचना व्यवस्थित वाचावी आणि नंतर आपले कुटुंब डोळ्यासमोर आणावे.
🔽इच्छा प्रबळ असावी धुम्रपान सोडण्यासाठी प्रथमता आपल्या मनाची इच्छा प्रबळ करावी.
🔽आपणआपल्या कुटुंब, मित्र यांना कल्पना द्यावी. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपण धूम्रपानापासून दूर राहावे.
🔽धुम्रपानाची इच्छा झाल्यास लिंबूरस पित राहा. त्याने धूम्रपानाची इच्छा कमी होण्यास मदत होते.
🔽जेव्हा धूम्रपानाची इच्छा होईल तेव्हा त्याला पर्याय म्हणून वेलची, लवंग, ओवा, बडीशेप तोंडात टाका.
🔽मनावर कुठलाही ताण येणार नाही याची अत्यंत काटेकोर काळजी घ्यावी. ताणतणाव विरहित जीवन जगावे.
🔽जाहिरातीत दाखवलेल्या चित्रांकडे पाहावे, व आपल्या आरोग्याचा विचार करावा.
🔽धुम्रपान सोडलेल्या व्यक्तींना भेटा व सक्सेस स्टोरी वाचाव्यात.
🔽स्वतःच्या मनाला सतत जाणीव करून द्यावी की आपण धुम्रपान करणे सोडून दिले आहे.
🔽कॅन्सरग्रस्त लोकांना भेटी द्याव्यात आणि त्यांचे हाल समजून घ्यावेत.
🔽या जगात अशक्य असे काहीच नसते.. पण ते शक्य आहे हे सिध्द करून दाखवावे लागते . त्यासाठी मनापासून प्रयत्न करायला हवेत ही जाणीव स्वतः निर्माण करा.
🔽व्ससन मग ते तंबाखू सेवनाचे असो वा सिगारेट - विडी ओढण्याचे. ते मी स्वतः लावून घेतले म्हणून मी स्वतःच निर्धारपुर्वक सोडणार..! हा संकल्प करा.
🔽धुम्रपान सोडण्यासाठी आपल्या अवती भवती तसे वातावरण तयार करावे. यात धुम्रपान सोडण्यासाठी प्रोस्ताहन देणारे मित्र जमवा. आणि जे धुम्रपान करण्यासाठी प्रोस्ताहन देतात अशा मित्रांना देखील सांगावे की, मी ही सवय मोडत आहे, मला मदत करा.
🔺धुम्रपान आरोग्यास घातक आहे...
भारतात तंबाखूसेवनाचे प्रमाण अधिक आहे.२०१२ साली महाराष्ट्र शासनाने गुटख्यावर बंदी आणली. प्रत्येक सिगारेट जीवनातील सात मिनिट कमी करते. त्याबरोबरच पालकांच्या धुम्रपानामुळे लहान मुलांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता ६ पट अधिक असते हेही तितकेच महत्त्वाचे. प्रत्येक बिडीच्या पाकीटावर ‘ स्मोकिंग इज इन्जुरस टू हेल्थ ’ असा इशारा दिलेला असतो. पण एखादी गोष्ट करू नका म्हटले की ती केली जाते. त्याचप्रमाणे धूम्रपानाचे आहे. धूम्रपानामुळे सावकाश पण, वेदनादायी मृत्यु ओढवतो, हे सत्य आहे.
भारतात सर्वात जास्त प्रमाण हे मौखिक कर्करोगाचे आहे. हे प्रमाण सुमारे २० टक्के आहे आणि ते जगात सर्वाधिक आहे. सुमारे १ टक्के लोक कर्करोगाची पूर्वस्थिती असलेले रुग्ण आहेत. दरवर्षी आपल्याकडे सुमारे एक लाख लोकांना मौखिक कर्करोगाची लागण होते व त्यातील सर्वसाधारणपणे अर्धे लोक एक वर्षाच्या आत मृत्युमुखी पडतात. कारण त्यांचे निदान वेळेवर झालेले नसते. पुरुषांमध्ये पहिल्या तर स्त्रियांमध्ये हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्करोगाच्या प्रकारामध्ये ३० ते ४० टक्के प्रमाण मौखिक कर्करोगाचे आहे.
कष्टकरी आणि कामगार वर्गात बिडी लोकप्रिय असल्यामुळे भारतात बिडी उद्योग वाढला. आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार आणि तामिळनाडू या राज्यात तंबाखूचे उत्पादन घेतले जाते. तंबाखूमध्ये असलेल्या निकोटिन या घटकामुळे मानवी शरीराला तंबाखूची सवय लागते. निकोटिन या विषारी रसायनाचा एक थेंब सुद्धा मानवी शरीरास मारक असतो. निकोटिन शिवाय तंबाखूमध्ये ४००० पेक्षा जास्त विषारी रसायने असतात.
भारतात विडी, सिगारेट, सिगार, चिरूट, चुट्टा, धुमती, पाईप, हुकली, चिलीम आणि हुक्का अशा विविध प्रकारात तंबाखू सेवन केले जाते. त्याशिवाय गुटखा, तपकीर, बज्जेर, मशेरी, तंबाखू असलेली टूथपेस्ट अशा रीतीने तंबाखूचा वापर केला जातो. तपकिरीचे नाकाद्वारे सेवन केले जाते. बज्जर तपकीर हिरड्यांना लावली जाते. गुजरातमध्ये स्त्रिया याचा वापर जास्त करतात. मशेरी तंबाखू भाजून त्याची पावडर दंतमंजन म्हणून वापरली जाते. कोल्हापूर जिल्ह्यात स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. भारतात ५४ टक्के विडीच्या स्वरुपात तर १९ टक्के सिगारेटच्या स्वरुपात धूम्रपान केले जाते. एक कोटी सिगारेट भारतात सेवन केल्या जातात. भारतीय सिगारेटमध्ये डांबर व निकोटीनचे प्रमाण विकसित देशांच्या तुलनेत जास्त आहे. तंबाखूचा धूर व धुम्रपान यामध्ये अनेक विषारी रसायने असतात. त्यामध्ये :-
🔹हायड्रोजन साईनाईड हा विषारी वायू उत्सर्जित होत असतो.
🔹अमोनिया हे फरशी, स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे रसायन शुद्ध ऑक्सिजनमध्ये मिसळते.जो ऑक्सिजन आपणास निसर्गाने मोफत पुरविलेल्या असतो.
🔹अर्सेनिक हे मुंग्यांना मारण्याचे रसायन.
🔹नेप्थॅलिन बॉल या कपड्यावरील किटाणुंना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या असतात.
🔹ऍसिटोन हे भिंतीवरील रंग व नेलपेंट काढण्यासाठी वापरले जाणारे रसायन.
🔹कार्बन मोनाक्साईड हा कारच्या धुरातील विषारी वायू.
🔽गुटख्यामध्ये तंबाखू, सुपारी, चुना, काथ तसेच मॅग्नेशियम कार्बोनेट, शिसे, अर्सेनिक असे विविध विषारी पदार्थ असतात. त्यातील शिसे लहान मुलांच्या बौद्धीक विकासाला घातक असते. गुटखा जास्त दिवस पावडर स्वरुपात रहावा व त्यांच्या गुठळ्या बनू नये म्हणून गुटख्यात मॅग्नेशियम कार्बोनेट मिसळतात.
Buy tobacco, get cancer free म्हणजेच तंबाखूबरोबर कर्करोग मोफत असा सावधानतेचा इशारा दिला जातो. तंबाखूसेवनामुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय, मुखाचा कर्करोग होतो. दरवर्षी सुमारे अडीच लाख लोकांना तंबाखूमुळे कर्करोगाचे निदान होते.
🔹मौखिक कर्करोगाचे दुष्परिणाम :-
🔽तोंडामध्ये पांढऱ्या रंगाचे चट्टे उठतात.
🔽तोंड पूर्णपणे उघडले जात नाही.
🔽तिखट मसालेदार पदार्थ खाणे त्रासदायक होते. या प्रकाराचे वेळेत निदान न झाल्यास उपचार करणे कठीण होते.
🔽केस व तोंडाला दुर्गंधी, हिरड्याला इजा, दातांवर काळे-पिवळे डाग दिसतात.
🔽रोग प्रतिकारकशक्ती कमी होऊन अकाली वृद्धत्त्व येते.
🔽नाकाने वास घेण्याची क्षमता कमी होते.
🔹धुम्रपान टाळा आयुष्य वाढवा 🔹
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सर्वेक्षणात दरवर्षी सुमारे ६०/७०लाख मृत्यू ☠ हे धुम्रपानाच्या सवयीमुळे अकालीच होतात. त्यात सर्वात जास्त मृत्यू हे आर्थिकदृष्टय़ा मागास असलेल्या देशातच होतांना दिसतात. ही परिस्थिती अशीच राहिली तर २०३० सालापर्यंत दरवर्षी धुम्रपानाच्या वाईट सवयीने मरणा-यांचे हे प्रमाण वाढून ८०/८५ लाखापर्यंत होऊ शकते.
पनामा येथे आयोजित सम्मेलनात जाहिर एका अहवालानुसार ९२ देशांमधील २.३ अरब लोकांना या ना त्या कारणाने वर्जित कारणांनी मोठा फायदा झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, सिगारेट आणि विडीचा धूर हा कोणत्याही धर्म, जात, देश आणि प्रांत यात भेदभाव करीत नाही. कोणतेही राजकीय दडपण वा प्रभाव मान्य करीत नाही. यातून महत्त्वाचा एकच संदेश लक्षात येतो तो म्हणजे, " केवळ मरण..!" परंतु वाईट या गोष्टीचे वाटते की आजचा तरुण धुम्रपान हे " स्टेट सिम्बाल " समजून त्यात अधिकाधिक गुंतत चालल्याचे दिसते. धूम्रपान हे असे एक व्यसन आहे की एकदा माणूस त्या कडे आकर्षित झाला की, त्याविषयी त्यांचे आकर्षण जास्त वाढत जाते. तसे त्यास नशाकारी वाटून त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तो अधिक जवळ करु लागतो. पण हे झाले अज्ञान. खरे तर एखादी वस्तू घेतांना आपण हजारदा तिची चौकशी करतो. पण धुम्रपानाच्या आहारी जातांना त्याच्या परिणाम-दुष्परीणामांची आजचा युवा वर्ग कोणतीही विचारपुस्त करीत नाही ही फार दुर्दैवी गोष्ट आहे.
🔸धुम्रपान करण्याची कारणे :-
माझ्या निरीक्षणात आलेल्या अनेकांना मी धुम्रपानाची सवय कशी लागली याविषयी विचारले असता त्यांनी खूपच मजेशीर उत्तरे दिली.
🔸 श्रीमंताशी मैत्रीसाठी :-
श्रीमंत मुलांची व मुलींची मैत्री व्हावी. हायफाय सोसायटीत टिकून राहण्यासाठी धूम्रपान हे उत्तम माध्यम आहे. या वर्गातील युवक, मित्रांबरोबर राहिल्याने जर विडी, सिगारेट ओढली नाही तर या ना त्या शब्दांनी नावे ठेवून टर उडवून चिडविले जाते. त्यामुळे धुम्रपान करणे परवडते.
🔹 चित्रपटातील हिरो हे आजच्या तरुणांचे आदर्श ठरत असल्याचे दिसते. आवडता हिरो जसा स्टाइलीश धूम्रपान करतो ते अंधानुकरण तरुण करु लागतो.
🔸 महाविद्यालयात प्रवेश घेणा-या नवीन विद्यार्थ्यांना सिनिअर विद्यार्थी जबरदस्तीने धुम्रपान करायला भाग पाडतात. एकदा केलेले हे धूम्रपान नंतर सुटता सूटत नाही.
🔸चिंतामुक्त होण्यासाठी धूम्रपान हे उत्तम औषध आहे. हे कोणीतरी मनावर बिंबवतो किंवा चित्रपटातील हिरो चिंतामुक्त होण्यासाठी धूम्रपान करतो. त्या अनुकरणातून सवय जडली.
धूम्रपानामुळे होणाऱ्या विघातक परिणामांची चर्चा १९३० पासून सूरु झाली. पण दुखःदायक गोष्ट अशी की या चर्चेला तब्बल ९० वर्षे होत आली आहेत तरी धुम्रपान करणाऱ्याचे प्रमाण ज्या पटीत कमी व्हावे त्याऊलट ते अधिकच वाढतांना दिसते आहे.
महत्वाचे :-
🔹 जगभरात दरवर्षी सुमारे ६० अरब रुपये केवळ धुम्रपानावर खर्च केले जातात.
🔸 विशेषतः विकसित देशात धुम्रपानाची ही सवय महिला व तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसून येत आहे. ' अमेरिकन मेडीकल असोसिएशन जर्नल ' च्या अहवालानुसार जगात सुमारे पाच कोटी महिला आणि तरुणी ह्या धुम्रपान करतात.
सध्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे पेव जगभर आले आहे. त्यापैकी संपन्न समजली जाणारी अमेरिकी कंपन्या दरवर्षी ६००० अरबपेक्षा अधिक संख्येने सिगारेट उत्पादन करते. त्यातील सुमारे ९७ टक्के सिगारेट ह्या अत्यंत कमी उत्पन्न असणाऱ्या आणि विकसनशील देशात निर्यात केल्या जातात. त्यामुळे अमेरिकेला दरवर्षी ३ अरब डॉलरच्या फायदा मिळतो.
🔹‘ निकोरेट क्विटलाइन ’ दूरध्वनी सेवेचा लाभ घ्या.
🔹गुटखा आणि इतर कोणत्याही स्वरूपात तंबाखू खाणाऱ्यांची तंबाखू सोडवणे आता सोपे होणार आहे.
तंबाखू सोडण्यासाठी मदत करणारी ‘ राष्ट्रीय तंबाखू शमन हेल्पलाइन ’ अर्थात ‘ क्विटलाइन ’ आता पुण्यातही उपलब्ध झाली आहे. इतकेच नव्हे तर या हेल्पलाइनद्वारे हे व्यसन सोडू इच्छिणाऱ्यांना स्थानिक तंबाखू मध्यस्थ उपक्रम केंद्रांतील डॉक्टरांचे साहाय्यही मिळू शकणार आहे. रुग्णांना १८००-२२७७८७ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करून या हेल्पलाइनचा लाभ घेता येणार आहे. या हेल्पलाइनद्वारे रुग्णांना इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, गुजराती आणि बंगाली भाषांमध्ये समुपदेशन मिळू शकते.
‘ निकोरेट ’ या तंबाखू सोडण्यासाठीची उत्पादने बनविणाऱ्या कंपनीने ही हेल्पलाइन सुरू केली आहे. या उपक्रमात तंबाखू सोडण्यासाठी व्यक्तीशी दूरध्वनी, एसएमएस, ई-मेल, शैक्षणिक साहित्य असे विविध मार्ग एकत्रितपणे वापरून संपर्क साधला जातो आणि तिला व्यसन सोडण्यासाठीचा आराखडा तयार करून दिला जातो. गरज असल्यास रुग्णाला स्थानिक तंबाखू मध्यस्थ उपक्रम केंद्रात पाठविले जाते. देशात अशी ५६० तंबाखू मध्यस्थ उपक्रम केंद्रे चालविली जातात.
ज्या व्यक्ती तंबाखू सोडताना दिसणाऱ्या तीव्र लक्षणांमुळे (व्रिडॉवल सिम्प्टम्स) त्रस्त असतील त्यांनाही या उपक्रमाचा भाग घेता येणार आहे, रोग प्रतिकारकशक्ती कमी होणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, एकाग्रता कमी होणे असे अनेक दुष्परिणाम तंबाखूसेवनाचे आहेत. या सगळ्यांचा विचार करता तंबाखू व्यसन थांबवणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने तंबाखू न खाण्याचा संकल्प केला तर हे शक्य आहे.
🔻तंबाखूचे पिक :-
तंबाखू भारतात उगवणारी एक वनस्पती आहे. हिची पाने वाळवून, कुस्करून त्याला चुना मळतात. याचा वापर लोक खाण्यासाठी करतात. त्यात चुना मिसळून गुटखा बनवतात. वाळलेल्या अखंड पानापासून विडी बनवितात. तंबाखू हा पदार्थ नशादायक आहे. विडी, सिगरेट, सिगार, चिरूट, हुक्का, गुटखा, तपकीर, हिरड्यांना लावण्याची मशेरी, चुन्याबरोबर मिसळून, पानात घालून आणि अशा नानाविध स्वरूपात हा पदार्थ वापरला जातो. तंबाखू एक नगदी पीक आहे. तंबाखूच्या वापराने कर्करोग होतो.
🔺इतिहास :-
फ्रान्सचा पोर्तुगालमधील राजदूत जाँ निको (Jean Nicot) याने इ.स. १५६० मध्ये एका Rupesh बेल्जियन व्यापाऱ्याकडून तंबाखू विकत घेतली. हा तंबाखू त्याने फ्रान्सच्या राणीला भेट दिला. वनस्पतींच्या ज्या वंशातून तंबाखू उद्भवतो त्याला, याच जाँ निकोच्या स्मरणार्थ, ‘निकोटिआना’ असे नाव दिले गेले.
🔺नावाचा इतिहास :-
तंबाखू, तमाकू आणि टोबॅको या नावांचे मूळ कॅरेबियन बेटांवर आहे असे मानले जाते. कोलंबस आणि त्याचे खलाशी इ.स. १४९२ मध्ये कॅरेबिअन बेटांवर उतरले. त्या काळात कॅरेबियन स्थानिक लोक तंबाखू वापरताना त्यांना आढळले. ते विस्तवावर तंबाखूची पाने टाकून, त्यांचा धूर नळीतून ते नाकाने ओढत. या नळीला ते ‘टाबाको’ म्हणत. त्यावरूनच पुढे तंबाखूची सर्व नावे प्रचलित झाली असावीत असे मानले जाते.
🔺शास्त्रीय नावे :-
भारतीय उपखंडात पिकणारा बहुतांश तंबाखू हा त्यापैकी ‘निकोटिआना टोबॅकम’ ( Nicotiana tobacum) या जातीचा असतो. व त्याचे कुळ-सोलेनेसी[Solanaceae].
निकोटिआना रस्टिका या जातीच्या तंबाखूत निकोटीनचे प्रमाण भारतीय तंबाखूपेक्षा जास्त असते.
संस्कृतमध्ये क्षारपत्र,ताम्रकुट, धुम्रपत्र असे नाव आहे.
सकारात्मक दृष्टीने पाऊल टाकले पाहिजे.
🔺स्वरूप :-
अल्कलॉइड या रासायनिक गटात मोडणारे निकोटीन हे द्रव्य तंबाखूच्या रोपट्याच्या मुळांमध्ये तयार होते. हे द्रव्य रोपाच्या पानांमध्ये साठवले जाते. रोपट्यातील जवळपास ६४% निकोटीन पानांमध्ये असते असे मानले जाते. यामुळे तंबाखूच्या पानांचा उपयोग केला जातो. निकोटीन हे कीटकनाशक ही आहे. न्यू मेक्सिको स्टेट विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात निकोटीनचे कीटकनाशक गुणधर्म वैज्ञानिकरीत्या सिद्ध झाले आहेत.
🔺व्यसन :-
निकोटीन वेगाने रक्तप्रवाहात मिसळू शकते. निकोटीन त्वचेतून तर शरीरात चटकन शिरतेच, परंतु धूम्रपानातील धूर किंवा तपकीर यांद्वारे ते श्वसनमार्गात सोडले की लागलीच रक्तात मिसळते रक्तप्रवाहात शिरकाव झाल्यापासून १०-२० सेकंदांत ते संपूर्ण शरीरभर पसरते आणि महत्त्वाचे म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचून नशा चढल्याचा अनुभव देते. निकोटीन रक्तप्रवाहात मिसळले की आपल्या मनात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची तात्पुरती व फसवी भावना निर्माण होते. निकोटीनचा हा परिणाम काही काळाने शुद्ध रक्त पुरवठ्याने कमी होतो. हीच भावना परत मिळविण्यासाठी पुन्हा निकोटीनचे सेवन केले जाते आणि थोड्याच काळात त्याचे व्यसन लागते. निकोटीन व्यसनी व्यक्तींना अल्झायमर्स, स्किझोफ्रेनिया मेंदूशी संबंधित रोग होण्याची शक्यता जास्त असते.
🔺परिणाम :-
कुठल्याही स्वरूपातील तंबाखूसेवनाने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात.फुफ्फुसाचा कॅन्सर सिगारेटमुळे होतो.
चघळायच्या तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर होतो.तंबाखूमुळे रक्ताचे स्वरूप बदलते, तसेच त्याच्यातील रक्त पेशीचे स्वरूप हि बदलते.
एक जागतिक सत्य :-
🔹धूम्रपान हे एक क्रूर मारेकरी आहे.
🔹गेल्या शतकात त्याने दहा कोटी लोकांचा बळी घेतला.
🔹दरवर्षी तो जवळजवळ साठ लाख लोकांचा बळी घेतो.
🔹दर सहा सेकंदांना तो सरासरी एका व्यक्तीचा बळी घेतो.
आणि हे चित्र बदलण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.
तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे, की असेच जर चालत राहिले तर २१ वे शतक उलटेपर्यंत धूम्रपानाने चक्क शंभर कोटी लोकांचा बळी घेतलेला असेल.
अर्थात, केवळ धूम्रपान करणारेच तंबाखूचे बळी ठरतात असे नाही. तर त्यांच्या मृत्यूनंतर मागे राहिलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा याचा भावनिक व आर्थिक तडाखा बसतो. तसेच, धूम्रपान करणाऱ्यांचा धूर श्वासावाटे आत घेतल्यामुळे प्रत्यक्षात धूम्रपान न करणारे सहा लाख लोक दरवर्षी दगावतात. याशिवाय, धूम्रपानामुळे होणाऱ्या रोगांवरील वाढत्या खर्चाचा फटका सर्वांनाच बसतो.
एखाद्या रोगाची साथ सुरू होते, तेव्हा उपाय शोधण्यासाठी डॉक्टर्स लगेच कामाला लागतात. पण धूम्रपान अशा एका साथीच्या रोगासारखा आहे ज्यावर उपाय शोधण्याची गरज नाही. तो उपलब्ध आहे आणि सर्वांना माहीत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालिका, डॉ. मार्गरेट चॅन यांनी म्हटले:
“ तंबाखूची साथ ही सर्वस्वी मानव-निर्मित आहे. त्यामुळे सरकारने व समाजाने अथक प्रयत्न केले तर ती आटोक्यात येऊ शकते.”
ही आरोग्य समस्या आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नाला जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. उदाहरणार्थ, ऑगस्ट २०१२ मध्ये जवळजवळ १७५ देशांनी तंबाखूच्या वापरावर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे मंजूर केले. पण, काही शक्तिशाली घटकांमुळे साथीचा हा रोग अजूनही फोफावत आहे. जसे की, दरवर्षी सिगारेट व तंबाखू - कंपन्या नवनवीन ग्राहकांना, खासकरून विकसनशील देशांत राहणाऱ्या स्त्रियांना व तरुणांना धूम्रपानाकडे आकर्षित करण्यासाठी जाहिरातींवर वारेमाप व पाण्यासारखा पैसा खर्च करतात. धूम्रपानाच्या आहारी गेलेल्या शंभर कोटी लोकांपैकी बरेच जण या व्यसनामुळे मृत्यूमुखी पडण्याची दाट शक्यता आहे. धूम्रपान करणारे वेळीच सावध झाले नाहीत, तर पुढील चार दशकांत बळींची संख्या झपाट्याने वाढेल.ही मानवासाठी धोक्याची घंटा आहे.
अनेकांना या वाईट सवयीतून मुक्त होण्याची इच्छा असते. पण, जाहिरातींच्या भडीमारामुळे व तंबाखूच्या व्यसनामुळे ते त्यात अधिकाधिक अडकत राहतात.
चिंतनशील गोष्ट - नाओको नावाच्या एका स्त्रीचा अनुभव विचारात घ्या. किशोरवयात असताना ती धूम्रपान करू लागली. धूम्रपानाच्या जाहिरातींत जे दाखवले जायचे त्याची नक्कल केल्यामुळे आपण किती प्रतिष्ठित आहोत असे तिला वाटायचे. तिचे आईवडील फुप्फुसाच्या कर्करोगामुळे दगावले होते; तरीही ती धूम्रपान करतच राहिली. शिवाय, तिच्यावर दोन मुलींचे संगोपन करण्याची जबाबदारीही होती. ती म्हणते: “ मला फुप्फुसाचा कर्करोग होण्याची फार भीती वाटायची ; त्यात माझ्या मुलींच्या आरोग्याचीही मला चिंता होती. पण काही केल्या मला ती सवय मोडता येत नव्हती. मला तर वाटलं मी आयुष्यात कधीच धूम्रपान करण्याचं सोडू शकणार नाही.”
पण...नाओको धूम्रपानाची सवय मोडू शकली. आज लक्षावधी लोकांना तंबाखूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी ज्यामुळे मदत मिळाली तीच मदत तिलाही मिळाली. तिला ही मदत तिच्या प्रिय बायबल या ग्रंथातील शिकवणूकीतून प्राप्त झाली.
🩸प्रकरण चौथे🩸
तंबाखू, विडी, सिगारेट विषयावर घोषवाक्य :-
🔹नाही म्हणा तंबाखुला
सुखी राही संसार आपला
🔸तंबाखू खावून नको मारू पिचकारी,
घाणेरडा म्हणतील लोकं तुला सारी.
🔹व्यसनामागे पळू नका.तंबाखू खाऊ नका.
🔸दररोज खावे चणे-फुटाणे, शेंगदाणे
संकल्प करु या नकोहो तंबाखू खाणे
🔸नका करु धुम्रपान, समाजात वाढवा मान
🔸कराल धुम्रपान अकाली जाईल प्राण.
🔸नका पिऊ सिगारेट विडी, मोडेल संसाराची गाडी
🔸अफू, सिगारेट,गांजा वाजवतात सुखी संसाराचा बाजा
🔹नाही म्हणा तंबाखुला
सुखी राही संसार आपला
🔸बसु नका तंबाखू खात, होईल आयुष्याचा घात.
🔹सिगारेट ची नशा करी अनमोल जीवनाची दुर्दशा.
🔸विडी सिगारेटच्या धूर आयुष्य करी चक्काचूर.
🔸धुम्रपानाच्या धूर , कुटुंब कबिला करीतो दूर!
🔸करु नको विडी सिगारेटला दोस्त, संसार करशील सुखाने मस्त
🔸 ज्यांनी केले धूम्रपान,त्यांचे आरोग्य नसते छान
🔸 बिडी,सिगारेट आडकाठी,बिघडवते खिशाची नाडी
🔸होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी
नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी.
🔹नशापासून रहा दूर; जीवन सुख मिळवा भरपूर.
🔸दारु, बिडी-सिगार,अफू, गांजा, गर्द त्यांचा राजा !
🔹लत लागतात संसार, त्याने केले सारे बरबाद
🔸नका ठेवू मति गहाण, नाही चांगले धुम्रपान
🔹आजपासुन एक निश्चय करणार,
तंबाखू सोडणार,व्यसनमुक्त होणार.
🔸व्यसन म्हणे जिवंत मरण, व्यसन सोडा, फुलेल जीवन.
🔹व्यसनामुळे जोम नाहीसा होई प्रसन्नता मुळीच उरत नाही
🔸 सुरुवातीला सिगारेटच्या झुरका वाटतो मस्त, क्षणाक्षणाला आयुष्य करीतो उध्वस्त
🔸धूम्रपान सोड,ऐक माझे रास्त जीवन जगशील मस्त!
🔸ब्राऊन शुगर मृत्यूचे आगर.
🔹मादक द्रव्याची गोळी, करी जीवनाची होळी.
🔸अहो बाबा ऐंका पाहू तंबाखू सोडा सुखात राहू
🔹तंबाखुशी करता दोस्ती जगण्याची संपते शाश्वती
🔸तंबाखुची एक चिमूट जीवन करी फस्त
🔸विचार निरोगी ठेवा, आनंदी जीवन जगा.
🔹शरीरास हानिकारक, धूम्रपान हा रोग कारक.
🔸शरीरावर लक्ष ठेवा, धुम्रपान बंद करा.
🔹तंबाखूची नशा आयुष्याची दुर्दशा
🔸 तंबाखू विडी सिगारेटची आस
करी संसाराचा नाश
🔹तंबाखूला जो जवळ करी
आपल्याच आयुष्याचा तो ठरे मारेकरी
🔸तंबाखू, जर्दा, विमल ची एक पुडी
करते आरोग्याची नासाडी
🔹अरे माणसा, जागा हो
तंबाखू सोड सुखी हो!
🔸गाढव म्हणे मी शहाणे ग् बाई
तंबाखूच्या जवळ मी ना जाई
◽जागृती आम्ही करणार, तंबाखूला रामराम म्हणणार.
🔸व्यसनाची सोडा रीत चला गाऊ या आनंदाचे गीत.
🔹फक्त काही सेकंदाचे तंबाखू-सिगारेटची ईच्छा
सुखी आयुष्याची करते दुर्दशा.
🔸कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणावर द्या हो भर
तंबाखू खाणे टाळा संपन्नतेला येईल बहर.
🔸 तंबाखूला जो जवळ करी तो ठरे महादुराचारी.
🔹तंबाखू-गुटका, सिगारेट वाटते लई भारी
हळूहळू माणसाला करीत जाते आजारी.
🔸चला, उठा..! देऊ आपण एकच नारा
तंबाखू - सिगारेटच्या व्यसनापासून मुक्त करु भारत सारा.
🔹भारत भू-चा ठेऊ अभिमान
तंबाखुमूक्त देश राबवू अभियान.
🔸तंबाखू ची नको ठेवू शान
तुला लवकरच दाखवेल रे स्मशान!
🔹स्वतः तंबाखूचे करता सेवन मुलांना कसे समजवाल ?
उद्या तुमची मुलं तुमचेच व्यसन उचलणार.
🔸तंबाखू - सिगारेट वा इतर व्यसनाची नका करु शान
ही सर्व व्यसने लवकरच दाखवती स्मशान.
🔹तंबाखू सेवन करतांना हजारदा करा विचार
सुदृढ शरीरात सहज शिरतात शंभर आजार.
🔸जो करीतो धुम्रपान,त्याला लवकर बोलावते स्मशान!
🔸मिळाला तुला हा मानवजन्म मस्त, धूम्रपानाने नको करु फस्त
🔸 विडी,सिगारेट असो वा गुटख्याची पुडी
नासवते देवाने दिलेली अनमोल कुडी
🔸अतिप्रिय वाटे तंबाखूची पुडी
बर्बाद करते आपली अमोल कुडी.
🔹 मुले-बाळं हेच आपले खरे धन
त्यांच्या समृद्धिसाठी तंबाखूचे नकोच व्यसन.
🔸 तंबाखू - सिगारेट व इतर व्यसनाची भारी गट्टी
जाळू त्यांना करु आपण छुट्टी
व्यसन सोडायचे घरगुती उपाय!
व्यसन हे दारूचे असो, सिगारेट अथवा तंबाखूचे, त्याचा आपल्या शरीरासह मनावर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. नशा केल्याने आपले गुण नष्ट होतातच तर आत्मा आणि शरीर यांच्याही हळू- हळू नाश होत जातो. दारू हे ' स्लो पॉयझन ' असे जरी आपण गंमतीने म्हणत असलो तरी ते खरे आहे.
पहिल्यादा दारु पिणा-यापैकी १५ ते २५ टक्के लोक व्यसनी होत असतात. ही फार वाईट सवय आहे. आजच्या आधुनिक जीनवात दारूने सहजरित्या प्रवेश केला आहे. आज स्त्री, पुरुष, युवावर्ग, वृध्द या सगळयांना ती प्रिय असते. मात्र दारु कोणावर प्रेम करत नाही. या गोड विषाला सोडण्यातच भलाई आहे, नाही तर तुमच्याकडे पश्चाताप करण्यासाठीही वेळ शिल्लक राहणार नाही. दारु, सिगारेट व तंबाखू सोडण्याचे सहज व सोपे उपाय वाचकांसाठी विशेषतः व्यसनमुक्ती साठी आपल्यासाठी देत आहे. ते पुढील प्रमाणे...
१. एका हळदीचे बारीक-बारीक तुकडे करावे जेव्हा पण सिगारेट, तंबाखू खाण्याची इच्छा झाली तेव्हा हळदीचे तुकडे तोंडात टाकून आराम चघळावे. काही दिवसात विडी, सिगारेट व तंबाखूची सवय सुटते.
२. सिगारेट सोडण्यासाठी दालचीनीला बारीक वाटून मधामध्ये टाकून जेव्हा सिगारेट ओढण्याची इच्छा झाली तेव्हा ते मिश्रण बोटाने चाखावे.
३. कांद्याचा रस ५ ग्रॅम दिवसातून एकदा नियमित सेवन केल्यास तंबाखू खाण्याची सवय सुटते.
४. चरस, गांजा, दारू यांची कोणालाही जास्त नशा झाली असल्यास ६० ग्रॅम वाटून पाण्यासोबत गाळून घ्यावे. यामध्ये काळीमिरी, जीरे यांची पूड व मीठ टाकून पिण्यास द्यावे. लवकरच दारूची झिंग उतरते.
५. एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये लींबू पिळावा. हे मिश्रण दिवसातून अनेक वेळा घेतल्याने दारूची नशा कमी होते.
तंबाखू, सिगारेटवर उपाय काय ?
तंबाखू, त्याचे विविध प्रकार आणि त्यामुळे निर्माण होणारे आजार यांच्याशी केवळ श्वसनविकारतज्ज्ञाचाच संबंध येत नाही तर, कर्करोगतज्ज्ञापासून ते हृदयविकारतज्ज्ञापर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ धूम्रपान व तंबाखू सेवनाने बाधित रुग्ण तपासत असतात. म्हणजेच धूम्रपान व तंबाखू यांचे विकार हे केवळ तोंड अथवा फुफ्फुसे यापुरतेच मर्यादित नसून इतर अनेक व्याधींसाठीही कारणीभूत ठरतात. ३१ मे या जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने तंबाखू व त्यामुळे होणाऱ्या विकारांविषयी ही माहिती.
तंबाखू हा खैनी, मावा, गुटखा, मशेरी अशा असंख्य रूपात उपलब्ध आहे. त्याचबरोबर हुक्का (गुडगुडी), बीडी, चिलीम, सिगार, चिरुट, सिगारेट इत्यादींमार्फत- ओढणारा व आजूबाजूचे - अशांच्या फुफ्फुसांचा सत्यानाश करत आहे.
🔷 तंबाखू सेवनाची सवय का लागते ?
🔸ही चटक निकोटीन या घटकामुळे लागते. निकोटीनची एक ठराविक पातळी रक्तात पोचल्यावर ती मेंदूपर्यंत पोचते व तेथील काही विशिष्ट रासायनिक क्रियांमुळे, मेंदू काही काळ उत्तेजित होतो. ही उत्तेजना कमी झाली की या व्यक्तीला तंबाखूचा तेवढा डोस हवासा वाटतो. अशा रितीने निकोटीनची ठराविक पातळी सतत मेंदूच्या संपर्कात राहण्यासाठी दरवेळी त्या व्यक्तीस तंबाखूच्या वाढत्या डोसचा आधार घ्यायला लागतो. प्रत्यक्ष निकोटीन हानीकारक नसते. पण तंबाखूतील टार (म्हणजे चक्क डांबर!) व सिगारेट/ बीडीमधील चार हजार इतर घटक आरोग्याला घातक असतात. उदा. अमोनिया (जो टॉयलेट धुण्यासाठी वापरतात), कॅडमियम (बॅटरीमध्ये वापरतात), मिथेन गॅस (गटारातून बाहेर पडणारा वायू) इत्यादी असंख्य रसायने धूम्रपानातून आपल्या फुफ्फुसात पोचतात.
🔸तंबाखूमुळे शरीराची कशी हानी होते ?
🔹धूम्रपानामुळे- फुफ्फुसाचा आणि घशाचा कॅन्सर
🔸CPDC Chronic obstructive pul-monary disesae (पूर्णपणे बरा न होऊ शकणारा दमा)
🔹 Interstitial lung disease ( स्पंजसारख्या मऊ फुफ्फुसात निर्माण होणारा कडकपणा)
🔸 तंबाखू खाण्यामुळे ओठापासून पोटापर्यंत (जठरापर्यंत) कुठेही होणारा कर्करोग घशाचा/ स्वरयंत्राचा कर्करोग
🔹 घशात सदैव कडकपणा येणे (Fibrosis)
🔸याशिवाय तंबाखुमुळे (ओढलेल्या/ खाल्लेल्या) रक्ताचा प्रवाहीपणा कमी होतो व रक्ताच्या गुठळ्या होऊन त्या हृदय, मूत्रपिंड, मेंदू इत्यादींच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करतात; ज्यामुळे हृदयविकाराचा/ अर्धांगवायूचा झटका येणे, रक्तदाब, मधूमेह निर्माण होणे (असल्यास नियंत्रणात न येणे), हाताची बोटे/ पायाची बोटे यांना रक्तपुरवठा नीट न झाल्याने गँगरीन होऊन शस्त्रक्रिया करावी लागणे इत्यादि विकार होऊ शकतात.
धूम्रपान करणारा केवळ स्वत:च्याच नाही तर आजूबाजूच्या व्यक्तींच्या फुफ्फुसाचीही आणि तब्येतीचाही सत्यानाश करत असतो.
धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये वरील आजारांव्यतिरिक्त स्तनाचा कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग हे जीवघेणे आजारही होतात. या स्त्रियांच्या बालकांना जन्मजात दम्याचा आजार जडतो.हा त्या मातांकडून बाळाला मिळालेली जन्मजात व्याधीच जाणावी
तंबाखू सेवन (धूम्रपानाद्वारे व तोंडावाटे) बंद करता येते का?
धूम्रपान बंद केल्याबरोबर, फुफ्फुसाचे पुढे होणारे नुकसान टाळता येते. पण बरेचवेळा तंबाखू सोडणे हे रुग्णांसाठी एवढे सोपे नसते. इच्छा असूनही रुग्ण त्यातून बाहेर पडू शकत नाही. मात्र समुपदेशनाचा फायदा होतो. ५ ते १० टक्के रुग्ण केवळ समुपदेशनामुळेच विकारमुक्त होतात.
समुपदेशनानेही जे व्यसन सोडू शकत नाहीत त्यांना निकोटीन गम (च्युईंगगम), निकोटीन पॅच (त्वचेवर लावण्यासाठी) वा निकोटीन इनहेलर दिला जातो. त्यामुळे पेशंटच्या शरीरात केवळ निकोटीनच शिरते आणि इतर उपद्रवकारक द्रव्यांपासून तो लांब राहतो. हळूहळू समुपदेशनाने असे पेशंटही व्यसनमुक्त होतात. धूम्रपान करणाऱ्यांसाठी काही औषधी गोळ्यांचा पर्यायही उपलब्ध झाला आहे.त्यासाठी वैद्यकीय सल्ला महत्वाचा ठरतो.वरवरची माहिती वाचून स्वतः स्वताला उपचार करुन घेऊ नये.
🔽धूम्रपानाची सवय तुम्ही का सोडावी?
ज्यांना जगण्याची इच्छा आहे आणि ज्यांना आनंदी, समाधानी जीवन जगण्याची इच्छा आहे, अशांनी चुकूनही सिगारेट पिऊ नये. बऱ्याच काळापासून सिगारेट पिणाऱ्या लोकांपैकी निम्मे, आज न उद्या या सवयीमुळे दगावतील. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनचे (डब्ल्यूएचओ) डायरेक्टर-जनरल म्हणतात:
“ सिगारेट ही फार चलाखीने तयार केलेली अंमल आणणारी वस्तू आहे . . . एका सिगारेटीत ठराविक प्रमाणातच निकोटीन असल्यामुळे सिगारेट पिणाऱ्या व्यक्तीला पुढच्या सिगारेटची ओढ लागते. ही ओढ व्यसन बनते आणि हे व्यसन त्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण.”
तेव्हा सिगारेट सोडण्याचे पहिले कारण म्हणजे हे व्यसन आरोग्याला आणि जीवाला घातक आहे. सिगारेट ओढल्यामुळे २५ पेक्षा जास्त जिवघेणे रोग होऊ शकतात असे दिसून आले आहे. उदाहरणार्थ, हृदयविकार, पक्षाघात, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, एम्फिसिमा आणि बऱ्याच प्रकारचे कर्करोग, विशेषतः फुफ्फुसांचा कर्करोग.
अर्थात, सिगारेट पिणाऱ्या व्यक्तीला कधीकधी बरीच वर्षे यांपैकी कोणतेही रोग होत नाहीत. पण म्हणून काही त्या व्यक्तीला या सवयीमुळे कोणतेच नुकसान होत नाही असे म्हणता येईल का? नाही. सिगारेटच्या जाहिरातींत सहसा सिगारेट पिणारे फारच देखणे, आकर्षक आणि निरोगी दाखवले जातात. पण प्रत्यक्षात तसे नसते. धूम्रपान करणाऱ्यांच्या तोंडाची दुर्गंधी येते, त्यांच्या दातांवर डाग पडतात आणि त्यांची नखे देखील पिवळट पडतात. पुरुषांना या सवयीमुळे नपुंसकत्वही येऊ शकते. सिगारेट पिणाऱ्यांना सहसा खोकला आणि दम लागण्याचा त्रास अधिक असतो. चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडण्याची आणि त्वचारोग देखील होण्याची शक्यता असते.
🔽दुसऱ्यांना होणारा त्रास
बायबल म्हणते: “ तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीति कर.” (मत्तय २२:३९)
तुमचे सर्वात जवळचे शेजारी म्हणजे तुमच्या घरातले लोक. त्यांच्यावर तुमचे प्रेम असेल तर तुम्ही धूम्रपान सोडलेच पाहिजे.
कारण सिगारेट पिण्याच्या तुमच्या सवयीमुळे इतरांना त्रास होतो. पूर्वी, कोणत्याही ठिकाणी बिनधास्त सिगारेट पिण्याची मुभा होती, कोणी सहसा काही बोलायचे नाही. पण आता मात्र लोकांचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. कारण तुमच्याजवळ उभा राहून कोणी सिगारेट पीत असेल, तर त्या धुराचा श्वास घेतल्यामुळेही त्याला/तिला बरेच आजार होऊ शकतात हे आता बऱ्याच लोकांना समजले आहे. सिगारेट न पिणाऱ्या व्यक्तीच्या जोडीदाराच्या तुलनेत सिगारेट पिणाऱ्या व्यक्तीच्या जोडीदाराला फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची तीस टक्के अधिक शक्यता आहे. शिवाय, धूम्रपान करणाऱ्यांच्या मुलांना देखील पहिल्या दोन वर्षांत न्युमोनिया किंवा ब्रॉन्कायटिस होण्याची जास्त शक्यता असते.
सिगारेट ओढणाऱ्या गरोदर स्त्रिया होणाऱ्या बाळाचा जीव अक्षरशः धोक्यात घालतात. सिगारेटच्या धुरात निकोटीन, कार्बन मोनोक्साईड आणि इतर विषारी रसायने असतात आणि हे विषारी पदार्थ आईच्या रक्तप्रवाहातून सहज बाळापर्यंत पोचू शकतात. यामुळे अचानक गर्भपात होणे, मृत बालक जन्माला येणे आणि नवजात शिशुंचा मृत्यू होणे यांसारखे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. शिवाय ज्या बालकांची आई गर्भावस्थेत धूम्रपान करत होती अशी बालके सडन इन्फंट डेथ सिंड्रोमने (बालकांचा अचानक मृत्यू होण्याचा विकार) दगावण्याची तिप्पट शक्यता असते.
🔽 धूम्रपानाने होणारा अनावश्यक खर्च :-
धूम्रपान सोडण्याचे आणखी एक कारण म्हणजे हा एक महागडा शौक आहे. वर्ल्ड बँकेच्या अंदाजानुसार जागतिक पातळीवर धूम्रपानामुळे होणाऱ्या आजारांवर दरवर्षी केला जाणारा खर्च दोन हजार कोटी डॉलर इतका आहे. शिवाय, हे आजार होणाऱ्यांना जो त्रास, ज्या वेदना सहन कराव्या लागतात त्या वेगळ्याच.त्यांचे मोल पैशात होणार नाही.
सिगारेट ,विडी ओढणाऱ्याला,गुटखा खाणा-याला, दारु पिणा-याला, अंमली पदार्थांचे सेवन करण्याच्या या सवयीमुळे वर्षाला किती खर्च होतो हे शोधून काढणे अगदी सोपे आहे. तुम्हाला ही सवय असेल तर हे सोपे गणित तुम्हीही करून पाहा. दररोज तुम्ही त्या-त्या व्यसनावर जितके पैसे खर्च करता, त्या संख्येला ३६५ ने गुणा. यावरून, वर्षाला तुम्ही किती पैसे खर्च करता हे तुम्हाला दिसून येईल. आता त्या संख्येला दहाने गुणा. पुढच्या दहा वर्षांपर्यंत तुम्ही व्यसन करीत राहिला तर तुम्हाला किती खर्च येईल हे यावरून तुम्हाला कळून येईल. धक्का बसला ना? विचार करा, याच पैशात तुम्हाला किती चांगले आर्थिक नियोजन किंवा बचत करता येईल.
🔽सुरक्षित पर्याय?
सिगारेट कंपन्या टार आणि निकोटीनचे कमी प्रमाण असलेल्या सौम्य सिगारेटींच्या जाहिराती देतात. धूम्रपानामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा धोका कमी करण्यासाठी या खास सौम्य सिगारेटी असतात. पण या सौम्य सिगारेटी ओढू लागल्यानंतरही त्या व्यक्तीला सवयीप्रमाणे पूर्वीइतक्याच निकोटीनची ओढ असते. त्यामुळे मग ती व्यक्ती जास्त सिगारेटी ओढू लागते, मोठे झुरके घेऊ लागते किंवा पुन्हापुन्हा झुरके घेते. या सौम्य सिगारेटींपासून शरीराला काहीच नुकसान नाही अशातला भाग नाही. तेव्हा, सिगारेटची सवय पूर्णपणे सोडून देणेच सर्वात उत्तम.
पाईप आणि सिगार्स ओढण्याविषयी काय?
अंमली पदार्थांची जाहिरात पाहिल्यावर लोकांना पाईप किंवा सिगार्स ओढणे,(ऐटबाज दारु पिणे,मावा किंवा पानमसाला चघळणे,) हे प्रतिष्ठितपणाचे लक्षण आहे असे वाटते. पण यांतून निघणारा धूर देखील सिगारेटींच्या धुराइतकाच घातक आहे. सिगार किंवा पाईप यांतून निघणारा धूर जरी सिगारेटच्या धुराप्रमाणे शरीरात जात नसला तरीसुद्धा यामुळे ओठांचा, तोंडाचा किंवा जिभेचा कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते.
काही लोकांना सिगारेटची सवय नसली तरी तपकीर ओढण्याची किंवा तंबाखू खाण्याची सवय असते. बाजारात तपकीर म्हणजेच तंबाखूची पावडर तसेच खाण्याची तंबाखू देखील लहानशा डब्यांमध्ये किंवा पाकिटांत मिळते. पण या सवयी देखील नुकसानकारक आहेत. कारण तपकीर, तंबाखू व गुटखा यासर्वांमुळे श्वासाची दुर्गंधी, दातांवर डाग, तोंडाचा किंवा श्वासनलिकेचा कॅन्सर, निकोटीनचे व्यसन, तोंडात पांढरे फोड व त्यांमुळे होणारा कॅन्सर, हिरड्यांचे विकार आणि इतर दंत विकार होऊ शकतात. सिगारेट ओढण्यापेक्षा या सवयी चांगल्या असे कधीही समजू नका.
🔽सवयच सोडून देणे सर्वात उत्तम :-
बरीच वर्षे धूम्रपान केल्यानंतर तुम्ही ही सवय सोडून देता.तेव्हा तुम्हाला कोणते चांगले परिणाम पाहायला मिळतील? शेवटची सिगारेट विझवल्यानंतर अवघ्या वीस मिनिटातच तुमचे ब्लड प्रेशर नॉर्मलवर येईल. एका आठवड्यात तुमच्या शरीरातले सगळे निकोटीन नाहीसे होईल. एका महिन्यानंतर खोकला, सायनसचा त्रास, थकवा, धाप लागणे हे सर्व कमी होऊ लागेल. पाच वर्षांनंतर, फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे दगावण्याचा धोका ५० टक्क्यांनी घटेल. पंधरा वर्षांनंतर तुम्हाला हृदयविकार होण्याची शक्यता ही सामान्य तब्येतीच्या, कधीही धूम्रपान न केलेल्या व्यक्तीला असते तितकीच राहील.
अन्न पूर्वीपेक्षा जास्त रुचकर लागेल. तुमच्या तोंडाला, शरीराला आणि कपड्यांना सिगारेटचा उग्र वास राहणार नाही. तंबाखू किंवा सिगारेटी विकत घेण्यात तुमचे पैसे वाया जाणार नाहीत. तुमचा आत्मसम्मान वाढेल, काहीतरी करून दाखवल्याचे समाधान मिळेल. तुम्हाला मुले असल्यास तुमचे उदाहरण पाहून ते देखील धूम्रपानापासून दूर राहतील. तुमचे आयुष्य वाढेल. शिवाय, देवाची इच्छा पूर्ण केल्याचे समाधान तुम्हाला लाभेल.संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार," अनुभव नाही दुजा...निश्चयाने तेची फळ ।। "
समर्थ रामदास म्हणतात, " मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण।।
बायबल म्हणते: “ देहाच्या . . . सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू.” (२ करिंथकर ७:१) तुम्हाला कोणत्याही अंमली पदार्थांचे व्यसन असेल तर आता खूप उशीर झाला आहे, आता ही सवय सोडता येणार नाही असा कधीही विचार करू नका. जितक्या लवकर तुम्ही ही सवय सोडून द्याल तितके चांगले.
" केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे। "- तुकाराम.
ते व्यसन आपणच लावले.ते आपल्याकडे स्वतः आले का? नाही.आपणच त्यांच्यापर्यंत स्वतः गेलोन्! ते आपणच निवडले.म्हणून ते आपणच त्याज्य करु शकतो.हे ध्यानी घेणे खूप महत्वाचे आहे.
🔽म्हणायला सोपे पण करायला महाकठीण
ही सवय सोडायची मनापासून तुमची कितीही इच्छा असली तरीसुद्धा हे सोपे नाही. याचे मुख्य कारण म्हणजे तंबाखूत असलेला निकोटीन नावाचा अंमली पदार्थ. याची एकदा चटक लागली की मग ती सहजासहजी कमी होत नाही. डब्ल्युएचओनुसार,
“ व्यसन लावणाऱ्या ड्रग्सपैकी निकोटीन हे हेरॉईन आणि कोकेन यांपेक्षाही जास्त शक्तिशाली असल्याचे दिसून आले आहे. हेरॉईन आणि कोकेनमुळे व्यक्तीला जशी लगेच नशा चढते तसे निकोटीनमुळे होत नाही आणि त्यामुळे लोकांना या ड्रगच्या शक्तीचा अंदाज येत नाही. पण जी हल्की धुंदी यामुळे येते ती लोकांना वारंवार धूम्रपान करायला भाग पाडते. निकोटीनमुळे तुम्हाला तरतरी येते; तुमचा तणाव कमी होतो. पण खरे पाहता तो तणाव काही प्रमाणात निकोटीनची तलब लागल्यामुळेच निर्माण झालेला असतो."
निकोटीनच्या व्यसनाशिवाय, आणखी एक कारण आहे ज्यामुळे सिगारेट सोडणे बऱ्याच जणांना महाकठीण वाटते. ते असे की, सिगारेटची सवय असलेल्या व्यक्तीला खिशातून सिगारेट काढण्यापासून ती पेटवून झुरके घेण्यापर्यंतची सबंध क्रियाच जणू अंगवळणी पडलेली असते. या सवयीबद्दल विचारले असता काहीजण म्हणतात ‘तेवढाच हाताला उद्योग असतो,’ तर काहीजण म्हणतात ‘टाइमपास होतो.’
धूम्रपान सोडायला कठीण बनवणारे तिसरे कारण म्हणजे दररोजच्या जीवनात या सवयीला नकळत प्रोत्साहन दिले जाते. सिगारेट कंपन्या दरवर्षी या जाहिरातींवर जवळजवळ सहाशे कोटी डॉलर खर्च करतात. तुम्ही कोठेही जा, तुम्हाला तिथे या जाहिराती दिसतील. जाहिरातींत सिगारेट पिणारे अतिशय आकर्षक, सुदृढ, देखणे, निरोगी आणि बुद्धिमान दिसतात. सहसा लोकांना आकर्षित करेल अशा दृश्यांतच त्यांना दाखवले जाते, उदाहरणार्थ घोडेस्वारी करताना, पोहताना, किंवा टेनिस खेळताना. चित्रपटांत आणि टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांतही खलनायकच नव्हे तर हिरो देखील सिगारेट ओढताना दाखवला जातो. शिवाय, तंबाखू व सिगारेट विकणाऱ्या दुकानांचा तोटा नाही. पुन्हा, या वस्तू विकायला कायदेशीर परवानगीही आहे. आपल्या स्वतःला सिगारेटची सवय नसली तरीसुद्धा आपण जातो त्या जवळजवळ प्रत्येक ठिकाणी धूम्रपान करणारे हजर असतात. तेव्हा, सिगारेटच्या दुष्परिणामांपासून सहजासहजी सुटका नाही.असे वाटू लागते.
ॲस्पिरिन घेऊन जशी डोकेदुखी घालवता येते तशी सिगारेटची सवय घालवण्यासाठी कोणती गोळी घेता येत नाही. हे कठीण काम यशस्वीपणे करून दाखवण्यासाठी त्या व्यक्तीलाच प्रबळ इच्छा असणे महत्त्वाचे आहे. वजन घटवण्यासाठी जशी बराच काळ कठीण मेहनत करावी लागते, त्याचप्रकारे सिगारेट किंवा तंबाखूची सवय घालवण्यासाठीही दृढ निर्धाराने बराच काळ प्रयत्न करावे लागतात. आणि यात कितपत यश मिळते हे सर्वस्वी त्या व्यक्तीवरच अवलंबून असते.मला वाटते, आत्मविश्वासाचे बळ मोठ्ठे आहे.
🔽लहानपणी लागलेली सवय
अमेरिकेत घेतलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले, की ज्यांनी लहानपणी कुतुहलापोटी सिगारेट ओढून पाहिली अशांपैकी २५ टक्के लोकांना पुढे सिगारेटचे व्यसन लागले. ज्यांनी कोकेन व हेरॉइन एकदा घेऊन पाहिले होते त्या लोकांमध्येही या ड्रग्सचे व्यसन लागण्याचे प्रमाण सारखेच आहे. सिगारेटची सवय लागलेल्या किशोरवयीनांपैकी ७० टक्के जणांना आपण सिगारेट ओढू लागल्याचा पश्चात्ताप होतो पण यांपैकी फार कमी जण ही सवय सोडण्यात यशस्वी होतात.
]
🔽सिगारेटच्या धुरात काय असते?
सिगारेटच्या धुरात टार नावाचा पदार्थ असतो, ज्यात ४,००० रसायने असतात. या रसायनांपैकी ४३ रसायने कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात. सायनाइड, बेन्झीन, मेथनॉल आणि ॲसिटलीन (टॉर्चच्या बॅटरीत याचा उपयोग करतात) ही त्यांपैकी काही रसायने आहेत. सिगारेटच्या धुरात नायट्रोजन ऑक्साइड आणि कार्बन मोनोक्साइड हे दोन विषारी वायू देखील असतात. या धुरातला मुख्य घटक म्हणजे निकोटीन. हे सहजासहजी व्यसन लावणारे शक्तिशाली ड्रग आहे.
🔽धूम्रपान सोडायला एखाद्या व्यक्तीला तुम्हीही मदत करू शकता :-
तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी माहिती असल्यामुळे कदाचित तुम्ही स्वतः धूम्रपान करत नसाल, पण तुमच्या मित्रांपैकी किंवा तुमच्या कुटुंबातल्या कोणाला ही सवय असेल तर साहजिकच तुम्हाला वाईट वाटत असेल. ही सवय सोडून द्यायला तुम्ही त्यांना मदत करू शकता का? सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला सतत तिच्या वाईट सवयीबद्दल टोचणे, ही सवय सोडून देण्यासाठी तिच्यापुढे गयावया करणे, सिगारेट सोडायला भाग पाडायचा प्रयत्न करणे किंवा तिची टर उडवणे व्यर्थ आहे. हे सर्व केल्याने तुम्ही त्या व्यक्तीला ही सवय सोडायला लावू शकत नाही. लांबलचक भाषण देण्याचाही काही उपयोग होणार नाही. उलट तुमच्या या प्रयत्नांमुळे वैतागून, आपला तणाव दूर करण्यासाठी ती व्यक्ती जास्तच सिगारेटी ओढू लागेल. तेव्हा, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा; ही सवय मोडणे किती कठीण आहे हे समजून घ्या आणि एखाद्या व्यक्तीला ही सवय सोडणे दुसऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त कठीण जाऊ शकते याचीही जाणीव असू द्या.
तुम्ही कोणाला धूम्रपान सोडायला भाग पाडू शकत नाही. ही सवय सोडण्यासाठी लागणारी ताकद आणि खंबीरपणा मुळात त्या व्यक्तीजवळच असला पाहिजे. हे लक्षात ठेवून, प्रेमळपणे त्या व्यक्तीच्या मनात ही सवय सोडून देण्याची इच्छा कशी जागी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करा.
हे कसे करता येईल? योग्य वेळी, त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला वाटणारे प्रेम व्यक्त करा आणि तिच्या या सवयीमुळे तुम्हाला किती काळजी वाटते हे तिला सांगा. तिने सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला तर तुम्ही तिला लागेल ती मदत कराल असे आश्वासन द्या. अर्थात तुम्ही वारंवार हीच पद्धत उपयोगात आणलीत तर त्यात काही अर्थ राहणार नाही आणि काही उपयोगही होणार नाही.
तुमच्या मित्राने किंवा घरातल्या व्यक्तीने सिगारेट सोडायचा निर्णय घेतला, तर तुम्ही त्या व्यक्तीला कशी मदत करू शकता? सिगारेट पिण्याचे एकदम सोडून दिल्यावर सुरवातीला त्या व्यक्तीला त्रास होईल; वैद्यकीय भाषेत याला विथड्रॉवल सिम्पटम्स म्हणतात. तो किंवा ती कदाचित चिडचिड करू लागेल, उदास राहील; डोकेदुखी किंवा झोप न लागणे यांसारखी लक्षणेही दिसू शकतात. ही लक्षणे दिसल्यास, त्या व्यक्तीला प्रेमळपणे आठवण करून द्या की हा त्रास लवकरच बंद होईल; तिला सांगा की तिचे शरीर, झालेल्या परिवर्तनाशी जुळवून घेत आहे याचीच ही लक्षणे आहेत. नेहमी आनंदी व आशावादी दृष्टिकोन ठेवा. तिने ही सवय सोडल्यामुळे तुम्हाला किती आनंद झाला हे सांगायला विसरू नका. आणि तिची सवय पूर्णपणे सुटेपर्यंत तिला मदत करत राहा; तिला पुन्हा सिगारेट ओढायची इच्छा होईल अशाप्रकारचे तणावपूर्ण प्रसंग आवर्जून टाळा.
पण, समजा सर्व करूनही ती व्यक्ती एखाद्यावेळी सिगारेट पिण्याच्या मोहाला बळी पडलीच तर? अर्थात, तुम्हाला वाईट तर वाटेल पण तिने फार मोठा गुन्हा केला आहे असे त्या व्यक्तीला भासवू नका. तिला समजून घ्या. या अनुभवातून तुम्ही व ती व्यक्ती देखील काही शिकत आहे असे समजा; असे केल्यामुळे पुढच्या वेळी तिला जास्त सोपे जाईल.
व्यसनमुक्त राहण्यासाठी काही संकल्प ---
१) प्रथम स्वतःवर प्रेम करा.
२) वडिलधा-यांना मान द्या.
३) बचत करायला शिका.
४) निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा.
५) चांगला मित्र परिवार वाढवा.
६) व्यसनांपासून दूर रहा.
७) भक्तीमार्ग अवलंबा.
८) समाजसेवा करा.
९) आपल्या मागे आपली आठवण काढणारी माणसे आहेत, याची सदैव जाणीव ठेवा.
१०) सल्ला घेऊनच प्रत्येक काम करा.
११) आजच्या तरूण पणावरच उद्याचे वृद्धत्व अवलंबून आहे. हे विसरू नका.
१२)मदत मागा म्हणजे मिळेल, आणि आदर्श मदतकेंद्र शोधा म्हणजे सापडेल. या प्रमाणे वागल्यास पुढेच जाल.
१३) यशोगाथांचे वाचन करा.
१४) नैसर्गिक जीवन जगा.
१५) आयुष्य फार लहान आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
१६) दारुच्या गुत्ता किंवा विडी,सिगारेट, गुटखा विक्रीच्या दुकान,टपरी,ठेला इत्यादि कडे जाणारा मार्ग टाळा.
🔽आदर्श जीवन जगण्यासाठी काही गोष्टी :-
१) चूक झाली तर सर्वांसमक्ष मान्य करा.
२) समोरच्याचे मत विचारात घ्या.
३) आभार मानायला विसरू नका.
४) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
५) सतत हसतमुख रहा.
६) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.
७) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
८) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.
९) कृती पुर्वक विचार करा.
१०) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.
११) क्रोधावर नियंत्रण ठेवा.
१२) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.
१३) नेहमी सत्याची कास धरा.
१४) इतरांना चांगली वागणूक द्या.
१५) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.
१६) विचार करून बोला.
१७) वाहन चालवताना स्वतः ची काळजी घ्या!
🔹व्यसनमुक्त होऊन बचतीकडे नेणारे मंत्र 🔹
* विमल पानमसाला चघळणे सोडा आणि करोडपती व्हा *
🔽 समजा, आज एका विमलपूडीची किंमत आहे रुपये-१३
🔽जर एखादी व्यक्ती एका दिवसात दररोज किमान २ विमलपुडी खात असेल तर एका महिन्यात ती व्यक्ती रु.२६ × दिवस ३०= ७८० रुपये खर्च करीत असतो.
आणि एका वर्षांचा हिशोब केला तर रु. ७८० × १२ महिने = ९३६०/- रु. खर्च करतो.
🔽समजा एका व्यक्तीचे वय १८ वर्ष आहे.ती व्यक्ति वयाच्या ६० वर्षापावेतो किती रुपये विमलच्या पुडीवर खर्च करेल ?
🔹तर उत्तर आहे 👇
६० - १८ = ४२ वर्ष
४२ वर्ष × ९३६० रु खर्च. = ३९३१२०/- रुपये
अक्षरी रूपये : तीन लाख त्र्यान्नव हजार एकशे वीस.
समजा ही रक्कम LIC मध्ये गुंतवणूक केली तर माणूस वयाच्या साठाव्या वर्षी समाधानकारक आयकर मुक्त रक्कम घेऊन समाधानी होईल.
🔸आजच विमल पानमसाला पूडीची सवय सोडा आणि करोडपती व्हा..!
🔽 मंत्र - २
चित्रपटगृहांच्या पडद्यावर दाखवण्यात येणा-या ३ सेकंदाच्या तंबाखूविरोधी जाहिराती खरोखरचं लोकांवर प्रभाव पाडतात का, याबाबत सिने जगतात वेगवेगळे मतप्रवाह आहेत़
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक प्रियदर्शन अशा जाहिरातींचा परखडपणे विरोध करतात. अशा जाहिरातींनी धूम्रपान करणा-यांचे काहीही भले होणार नाही. यामुळे नव्या पिढीला धूम्रपान न करण्याची प्रेरणा कदाचित मिळेलही; पण धूम्रपानाला सरावलेल्या लोकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही. खरा परिणाम साधायचा तर विडी,सिगारेटची ,पानमसाला व दारुची विक्री बंद करायला हवी, असे ते म्हणतात.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाने ‘ वर्ल्ड लंग फाऊंडेशन ’ आणि भारताच्या सहकार्याने २०१२-२०१३ मध्ये तंबाखूविरोधी जाहिरातींची सुरुवात केली होती. ‘ वर्ल्ड लंग फाऊंडेशन ’ने चित्रपटांपूर्वी दाखविण्यासाठी ‘ स्पंज ’आणि ‘ मुकेश ’ या दोन जाहिराती तयार केल्या होत्या. या दोन्ही जाहिराती २ ऑक्टोबर २०१३ पर्यंत चित्रपटगृहात दाखविण्यात आल्या. यानंतर ‘चाईल्ड ’ आणि ‘ धुआं ’ या दोन नव्या जाहिराती आल्या. या सर्व जाहिरातींमध्ये तंबाखू सेवनाचे अनेक दुष्परिणाम दाखवले, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करण्याचे आवाहन केले आहे.
आपण हा लेख वाचून व्यसनांपासून दूर जाऊन आपले आरोग्य व कुटुंबाचे आरोग्य निश्चितच जोपासाल ! हा विश्वास मनात बाळगून लेखाला पूर्णविराम देतो.
© प्रा.पुरुषोत्तम एम.पटेल
म्हसावद ता.शहादा जि. नंदुरबार
Blog :- mhasawad.blogspot.in
Mail :- patelpm31@gmail.com