Kaayguru.Marathi

रविवार, मार्च १४, २०२१

आई

आई तू माझा आधार
आई तू प्रेम सागर
करितो तुज मी
आई वंदन  त्रिवार ||१||
आई तू माझा भाव
आई तू माझा देव
करितो तुज मी
आई वंदन त्रिवार ||२||
आई तुच मजसी
वाटे पावन गंगौघ
करितो तुज मी
आई वंदन त्रिवार ||३||
आई तुझा आशिष
मज जगण्याचे बळ
करितो तुज मी
आई वंदन त्रिवार ||४||
आई तू माझा गुरु
आई तूच कल्पतरु
सुसंस्काराची ठेव
आई वंदन त्रिवार ||५||
©प्रा.पुरुषोत्तम पटेल
म्हसावद

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...