Kaayguru.Marathi

बुधवार, ऑक्टोबर ०९, २०१९

अन्नपूर्णा माता मंदिर म्हसावद येथे नवरात्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रम संपन्न.

नवरात्रीचे नऊ रंग असून प्रत्येक रंगाचे एक वेगळेपण असते.त्यातून सामाजिक एकोपा निर्माण होतो . पण आमच्या पोलीस विभागाचा एकच रंग असतो, तो म्हणजे खाकी. खाकीची आब राखण्याचा हा उत्सव तुम्ही विविध स्पर्धा आयोजित करुन शांततेत साजरा करीत आहात हा आमचा सन्मान होय. असे प्रतिपादन म्हसावद पोलीस स्टेशनचे एपीआय धनराज निळे यांनी केले. त्यांचा प्रमुख उपस्थितीत म्हसावदच्या अन्नपूर्णा माता मंदिर मंडळाद्वारे  पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी किशोर सोमजी पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पुरूषोत्तम पटेल यांनी केले. व्यासपीठावर मधुकर पाटील, अंबालाल देविदास पाटील, मधुकर गोविंद पाटील, प्रकाश एकनाथ चौधरी, अंबालाल रतिलाल पाटील उपस्थित होते.
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील अन्नपूर्णा माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी व संध्याकाळी आरती, प्रसाद वाटप आणि दररोज रात्री गरबा-दांडीया नृत्य आयोजित करण्यात आले. दररोज सामान्य ज्ञानावर आधारित चालता बोलता प्रश्नोत्तरे कार्यक्रम घेण्यात आले. त्यात कल्पेश पाटील, हर्ष पाटील, पुष्पा पटेल, यांना चांदीचा शिक्का भेट देण्यात आला.
संगीत खुर्ची स्पर्धा : मुलीसाठी - प्रथम क्रमांक सेजल हेमराज चौधरी, द्वितीय क्रमांक -ईशा अर्जुन कुवर यांना तर, मुलाच्या लहान गटात प्रथम क्रमांक - अंकित युवराज पवार, द्वितीय क्रमांक - पियुष पाटील यांना देण्यात आले. मोठा गट प्रथम क्रमांक - भावेश प्रविण पाटील, द्वितीय क्रमांक - रितेश विजय चौधरी यांनी मिळवला. मडकी फोड स्पर्धा प्रथम क्रमांक - पियुष विलास पाटील, द्वितीय क्रमांक - हेमलता देविदास चौधरी यांना देण्यात आले. बाल गटात बिस्किट तोडणे स्पर्धा - प्रथम क्रमांक - कृष्णा जगदीश पाटील, द्वितीय क्रमांक - पियुष किशोर पाटील
लिंबु-चमचा शर्यत - प्रथम क्रमांक - आरजु श्रीकांत पाटील, द्वितीय क्रमांक - प्रज्ञा दिपक पाटील, आणि स्लो सायकल चालविणे प्रथम क्रमांक - कृष्णा जगदीश पाटील, द्वितीय क्रमांक - कबिर श्रीकांत पाटील यांना देण्यात आला. वेशभूषा स्पर्धा प्रथम क्रमांक - किंजल अमोल पाटील, द्वितीय क्रमांक - सृष्टी विलास पाटील, उत्तेजनार्थ - सेजल हेमराज चौधरी यांना देण्यात आले. सर्व स्पर्धांचे परीक्षण रेखा पाटील, प्रा. पुरुषोत्तम पटेल, कैलास भिमा पाटील, शितल पाटील, चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचा प्लॅस्टिक वापरावर बंदी आणि मतदार जागृती अभियान अंतर्गत जनप्रबोधनार्थ रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यात प्रथम क्रमांक - अस्मिता भगवान चौधरी व दक्षा अंबालाल पाटील यांना विभागून तर द्वितीय क्रमांक कृपा सुर्यवंशी यांना देण्यात आला.
नवरात्रोत्सवात प्रा. पुरुषोत्तम पटेल यांनी मतदान विषयक व शांतता व स्वच्छता आणि प्लॅस्टिक वापरावर बंदी या विषयी मार्गदर्शन करुन स्वच्छ पर्यावरण राखण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन व आभार रेखा सुरेश पटेल यांनी मानले. प्रसंगी कार्यक्रमात स्त्री - पुरुष, युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यशस्वीतेसाठी यशवंत एकनाथ पाटील, विठ्ठल मदन पाटील, विलास किशोर पाटील, रुपल चौधरी, भावेश पाटील, अनुराग चौधरी, मलय पाटील, चेतन चौधरी, कुणाल पाटील, कृष्णा पाटील, यांनी परीश्रम घेतले.

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...