Kaayguru.Marathi

रविवार, मे ०५, २०१९

आई-वडीलांना कमी लेखू नका...!

आईवडीलांना कमी लेखू नका  !

---------------------------------------

...मध्यमवर्गीय घरातील एका मुलगा १० वीच्या परीक्षेत ९०% गुण मिळवून उत्तीर्ण झाला. वडील खुषीने गुणपत्रिका न्याहाळत आपल्या पत्नीला,

अग... छान लापशी बनव! तुझ्या लाडक्याला ९०% गुण मिळालेत.शालांत परीक्षेत..!आई स्वयंपाकघरातून आनंदाने पळत पळत येत म्हणाली, ".. बघुया मला दाखवा...!

... मुलगा पटकन बोलला ..." बाबा तिला कुठे रीझल्ट दाखवताय ?... तिला काय लिहता वाचता येते का ? अशिक्षित आहे ती...!" मुलाचे शब्द ऐकताच

भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली.

ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली...! मुलाला कळू न देता ते मुलाच्या संवादात भर टाकून म्हणाले... " हो रे ! ते पण खरच आहे...! "

... तू पोटात असताना तिला दूध अजिबातच आवडत नसताना तू सुदृढ जन्माला यावास म्हणून नऊ महीने ती रोज दूध पित होती...

अशिक्षित होती ना…

 तुला सकाळी सात वाजता शाळेत जावं लागायच म्हणून स्वतः सकाळी पाच वाजता उठुन तुझ्या आवडीचा नाष्ता आणि डबा बनवायची व न विसरता तुझ्या दप्तरात ठेवायची......

अशिक्षित होती ना…

 तू रात्री अभ्यास करता करता झोपून जायचा, तेव्हा ती स्वतः जागत राहायची. तुझी वह्या पुस्तक बरोबर भरुन आणि तुझ्या अंगावर पांघरुन टाकून नंतरच झोपायची...!

अशिक्षित होती ना...

 तू लहानपणी बहुतेकवेळा आजारी असायचास... तेव्हा रात्र-रात्र  जागुन तुझी आई तुझी सुश्रुता करायची. अन् परत सकाळी सर्वांअगोदर उठून तिची कामं चोख करायची....!

अशिक्षित होती ना...

 तुला ब्रॅन्डेड कपडे घेउन द्या म्हणून माझ्या मागे रेटा लावायची. आणि स्वतः मात्र जुन्या साड्या व कपड्यांवर  वर्षे चालवायची...!

अशिक्षित होती ना....

 बाळा.... चांगली शिकलेले लोकं आधी स्वतःचा स्वार्थ आणि मतलब बघतात.. पण तुझ्या आईने आजवर कधीच तो बघितला नाही...!

अशिक्षित आहे ना ती...

 ती जेवण बनवुन आपल्याला गरम गरम  वाढता वाढता कधी कधी स्वतः जेवायला विसरुन जायची... म्हणून  मी अभिमानाने सांगतो की, ' तुझी आई अशिक्षित आहे...! '

हे सगळ ऐकुन मुलाला अश्रु आवरता येईना.  तो रडत रडत आईला बिलगुन बोलला, "आई मी तर फक्त परीक्षेच्या पेपरवर ९०% मार्क मिळवलेत. पण माझ्या जीवनाच्या परीक्षेत १००%  मार्क मिळवून देणारी तू पहिली मार्गदर्शक शिक्षिका आहेस. आणि जी मूलं ९०% मार्क मिळवतात.. त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा मी कधी विचारच केला नाही. आई आज मला ९०% मार्क्स मिळवूनही मी अशिक्षितच आहे.  कारण…जीवनविद्या परीक्षेत मी नापास झालोय.

... आणि आई, तुझ्याकडे जगात शोधूनही सापडणार नाही अशी सर्वोत्तम,सर्वोच्च आणि विद्यापिठापलीकडची पदवी-डीग्री  आहे. कारण मी आज तुझ्या  रुपात डॉक्टर, शिक्षक, वकिल, माझे कपड्यांना टाके घालणारी- शिवणारी, माझ्या जगण्याला सुयोग्य आकार देणारी शिल्पकार ह्या सगळ्यांच दर्शन मी घेतलं. जे आज मला माझ्या बाबांमुळे गवसलंय .....!

क्षमा कराआई-बाबा..! 🙏

तात्पर्य :- ... प्रत्येक मुला- मुलीनी, जे आईवडिलांचा अपमान करतात, पाणउतारा करतात, शुल्लक कारणावरुन रागावतात. त्यांनी शांतपणे विचार करावा. आपल्यासाठी काय काय सोसलयं आईवडिलांनी त्याची जाणीव ठेवावी.

संकलन :- प्रा.पुरुषोत्तम एम. पटेल

mhasawad.blogspot.in

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...