Kaayguru.Marathi

शुक्रवार, मे ०४, २०१८

गुरु महात्म्य

विश्वविजयाचीच्छा असणारा सिकंदर माहिती नाही. असे सांगणारी एकही अभ्यासू व्यक्ती जगात नाही.
प्रसिध्द ग्रिस तत्ववेत्ता अॅरिस्टॉटल हा सिकंदराचा गुरु. हे गुरु - शिष्य एके दिवशी घनदाट जंगलातून गप्पा करित मार्गक्रमण करीत होते. चालता चालता मार्गावर एक खाडी लागली. खोल खाडीतून पाण्याचा प्रवाह जोरात सुरू होता. अॅरिस्टॉटल खाडी पार करण्यासाठी चालू लागताच सिकंदराने त्यांना अडवले. म्हणाला," गुरुदेव आधी ही खाडी तुम्ही नव्हे तर मी पार करीन!" दोघांत बराच हट्ट चालला. सिकंदर ऐकत नाही हे पाहून निरेच्छेने का होईना अॅरिस्टॉटल थांबला. प्रथम सिकंदर खोल खाडीच्या वाहत्या प्रवाहात उतरला. व नंतर अॅरिस्टॉटलने खाडी पार केली. अॅरिस्टॉटल सिकंदरला म्हणाला, "अरे, मी तुझा गुरु आहे. तरी तू माझा अगोदरच खाडी पार करणे हा माझा अपमान नव्हे का?"
सिकंदरने विनम्र प्रणाम करित म्हटले, "गुरुदेव, मी आपला अपमान करणे मला कधीही शक्य नाही. मी आधी खाडीत उतरणं एक शिष्य म्हणून माझे आद्य कर्तव्य केले आहे." अॅरिस्टॉटल म्हणाले, "यात कसले कर्तव्य? "
सिकंदर पुन्हा विनम्र होत म्हणाला," गुरुदेव, खाडीत पहिला उतरणार त्याला काहीच माहिती नसणार; खाडी किती खोल आहे ते. बुडण्याची शक्यताच अधिकम्हणून आधी मी गेलो. आणि... गुरुदेव, अॅरिस्टॉटल वाचला तर लाखो सिकंदर निर्माण होतील पण सिकंदर वाचला तर एकही अॅरिस्टॉटल निर्माण होणार नाही. म्हणून मी असे वागलो."
अॅरिस्टॉटलने सिकंदरचे कौतुक केले.
"धन्य ते गुरु। धन्य ते शिष्य |"
©प्रा.पुरूषोत्तम पटेल

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...