Kaayguru.Marathi

शुक्रवार, मार्च ३०, २०१८

ऊन म्हणे...

आली आता माझी स्वारी
तुम्ही घ्यावी खबरदारी
उरका प्रातः सायं काम
बाराच्या आत या हो घरी ||१||
दिवसाकाठी प्यावे तुम्ही
लिंबू शरबत ताक पाणी
कपडे वापरा सैलघोळ
सुती वस्त्रे मला प्यारी ||२||
तहान लागता जीवाला
माठाचे पाणी घ्या गारेगार
कामाला जाता डोक्याला टोपी
चेह-यावरी बांधा रुमाल ||३||
ऊन्हात बाहेर फिरणे
तुम्ही नक्कीच टाळा
दारे खिडक्या ठेवा बंद
घरात असू द्या वाळा ||४||
एसी कार थांबवून तुम्ही
बिनधास्त झोपू नका
विंडोज् ठेवा जरा उघडी
नाहीतर जीव जाई फुका ||५||
अती मांसाहार-मद्यपान
उन्हाळ्यात हो करु नका
कोल्ड्रिंक्स अन् जंकफूड
तुम्ही दूर कराया  शिका ||६||
उलटी मळमळ डोकेदुखी
अन् ठोके वाढता छातीला
हे तर उष्माघाताचे लक्षण
रुग्णालयी न्यावे रुग्णाला ||७||

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...