आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते आहे. त्यामुळे वृक्षांवर अवलंबीत सृष्टीतील अनंत जीवांचा, प्रजातींचा ह्रास होत आहे. पर्यावरणीय संतुलन बिघडते आहे. या सर्वांचा दुष्परिणाम आज मानवजातीला भोगावा लागतो आहे.
प्राचीन व अर्वाचीन ऋषीमुनींनी वृक्षांचे सानिध्य मान्य केले होते. म्हणून ते दिर्घायू होते. शिवरायांनी आज्ञापत्रात वृक्षांचे महत्व सांगितले आहे. याच अनुषंगाने महाराष्टृ सरकारने ५० कोटी वृक्षलागवडीचा निर्धार केला आहे. चला आपणही यात सहभाग घेऊन सृष्टी वृक्षलतांनी समृद्ध करु या..!

वृक्षारोपन( कविता)
लावू वृक्ष शतकोटी
करु नवा निर्धार
जगवू वृक्ष रानोमाळी
धरा करु हिरवीगार ||१||
करु नवा निर्धार
जगवू वृक्ष रानोमाळी
धरा करु हिरवीगार ||१||
वृक्षवल्ली आम्हा सोयरी
शिकवी तुकाची गाथा
वृक्ष अंगी वसती देव
ज्ञान देई कृष्ण गीता ||२||
शिकवी तुकाची गाथा
वृक्ष अंगी वसती देव
ज्ञान देई कृष्ण गीता ||२||
वृक्ष देतसे पानं
अन् फूलं नी फळं
लाभे समस्त जीवा
जणू कुबेराचं धन ||३||
अन् फूलं नी फळं
लाभे समस्त जीवा
जणू कुबेराचं धन ||३||
वृक्ष देतसे छाया
अन् खगांसी निवारा
थकल्या पांथस्थावरी
वृक्ष घालीतसे वारा ||४||
अन् खगांसी निवारा
थकल्या पांथस्थावरी
वृक्ष घालीतसे वारा ||४||
वृक्ष लाविता एक
कूळ वंश होय धन्य
अगाध महिमा वृक्षांचा
लाभे शतजन्माचे पुण्य ||५||
कूळ वंश होय धन्य
अगाध महिमा वृक्षांचा
लाभे शतजन्माचे पुण्य ||५||
म्हणे पुरुषोत्तम ऐका
तुम्ही सारे सृजन जन
जगवू कोटी कोटी वृक्ष
अर्पुया आपुले तन-मन ||६||
तुम्ही सारे सृजन जन
जगवू कोटी कोटी वृक्ष
अर्पुया आपुले तन-मन ||६||
© प्रा. पुरुषोत्तम पटेल
mhasawad.blogspot.in
Patelpm31@gmail.com
mhasawad.blogspot.in
Patelpm31@gmail.com